पुणे: पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका हॉटेलपासून ५०० ते ७०० मीटर अंतरावर एका पुरुषाच्या कापलेला डाव्या पायाचा अर्धा भाग आढळून आला आहे. इंदापूर तालुक्यातील कळंब गावाच्या हद्दीत कळंब निमसाखर रोडवर ही घटना घडली आहे. पोलिसांपुढे हा पाय कोणाचा आहे हे शोधन आता आवाहन आहे.
तलवार, बंदुकीचा धाक दाखवून भरदिवसा सोन्याचे दुकान लुटले; तोंड बंद कर नाहीतर…
बुधवारी सकाळी कळंब गावाच्या हद्दीत निमसाखर रोडवर नागरिक फिरायला गेले होते. तेव्हा लोकांना अर्धा कापलेला पाय आढळला. लोकांना या घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा तपास सुरु केला. हा अर्धा पाय एका पुरुषाचा असल्याचे समोर आले आहे. पायात मोजे देखील घातले होते. पोलिसांना अद्याप हा पाय कोणाचा आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. पोलीस याचा तपास करत आहे.
स्थानिकांनी काय सांगितले
स्थानिकांनी सांगितले की, सकाळी लोक फिरायला बाहेर पडले होते तेव्हा त्यांना हॉटेलच्या बाहेर एक तुटलेला पाय दिसला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. पायात मोजे घातले होते. डाव्या बाजूच्या पायाचा गुडघ्यापासून खालील हा भाग असून तो वाहतुकीच्या रस्त्यावर पडलेला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मित्रांनीच व्यावसायिक मित्राला गोळीवबार करत संपवलं; कारण काय?
पुणे येथील पिंपरी चिंचवडयेथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मित्रांनीच एका व्यावसायिक मित्रावर गोळीबार केल्याचे समोर आले आहे. यात ३७ वर्षीय नितीन शंकर गिलबिले यांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड मधील चऱ्होली अलंकापुराम चौकाजवळ ही घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अलंकापुरम 90 फुटी रोडवर श्री साई रोड कॅरिअर इथे साडेपाच ते ६ वाजण्याच्या दरम्यान ही गोळीबाराची घटना घडली. या ठिकाणी काळ्या रंगाच्या फॉर्च्यूनर गाडीत बसलेले असताना नितीन शंकर गिलबिले यांच्यावर त्यांचेच मित्र अमित जीवन पठारे आणि विक्रांत ठाकूर यांनी गोळीबार केला. या गोळीबारात नितीन गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मृतक नितीन गिलबिले यांचे अमित पाठारे, आणि विक्रांत ठाकूर हे मित्र आहेत. हे तिघेही जमिनीच्या प्लॉटिंगचा व्यवसाय करत होते. याच व्यवसायामधील व्यवहाराच्या वादातून हा गोळीबार केला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गोळीबारानंतर अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांचा शोध घेतला जात असून पोलीसांनी या घटनेबाबत अधिक तपास सुरू केला आहे.
Solapur Crime: तरुण वकिलाचा राहत्या घरी गळफास घेत टोकाचा निर्णय; चिठ्ठीत आईला ठरवलं जबाबदार
Ans: इंदापूर
Ans: डावा
Ans: पोलीस






