भारतीय टेनिस प्लेयर सानिया मिर्झा मागील काही काळात आपल्या घटस्फोटामुळे फार चर्चेत राहिली. पाकिस्तानी माजी क्रिकेटर कर्णधार शोएब मलिकसोबत सानियाने 2010 मध्ये लग्न केलं, 2018 मध्ये त्यांच्या मुलाचा इजहान मिर्झा मलिक जन्म झाला. पण लग्नाच्या 14 वर्षांनंतर दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाची बातमी येण्याआधीच शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न उरकलं होत. त्यांचे लग्नाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर सानिया-शोएबच्या घटस्फोटाची बातमी समोर आली. सानियाने याआधी आपल्या घटस्फोटाविषयी कधीही भाष्य केले नाही पण एका शोमध्ये नुकतेच तिने काही मोठे खुलासे केले आहेत.
" पाकिस्तानी नवऱ्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर सानिया मिर्झाने पहिल्यांदाच केला मोठा खुलासा

युट्यूबवरील 'सर्व्हिंग इट अप विथ सानिया' या टाॅक शोमध्ये पहिल्याच भागात फराह खानला आमंत्रित करण्यात आलं. सानिया आणि फराहने मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि अनेक गोष्टी उघड केल्या.

सानियाने सांगितलं की, घटस्फोटानंतर तिला पॅनिक अटॅक येऊ लागले होते. तिच्या या वाईट काळात प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि तिची जीवलग मैत्रीण फराह खानने तिला फार मदत केली.

फराह खानसोबत बोलताना सानियाने म्हटलं की, मी हे सांगायचं नाही असं ठरवलं होत पण तो काळ माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता. जेव्हा तू माझ्या सेटवर आली आणि मला एक लाईव्ह शो करायचा होता. मी अक्षरशः त्यावेळी थरथरत होते. तू त्यावेळी आली नसतीस तर मी तो शो केला नसता. तू मला म्हणाली होतीस की काहीही झालं तरी तुला हा शो करायचा आहे

यावर फराह खाननेही उत्तर देत म्हटलं की मी सानियाला इतकं घाबरताना पाहून खूप अस्वस्थ झाले होते. त्या दिवशी मला शूटिंग होत पण बाकी सर्व बाजूला करुन मी पायजमा चप्पल घालून तिच्याजवळ पोहचले. मला त्यावेळी फक्त माझ्या मैत्रिणीसोबत राहयचं होतं.

या शोदरम्यान सानियाने हे देखील स्पष्ट केलं की, घटस्फोटानंतरचा काळ तिच्यासाठी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या फार कठीण राहिला. मिडियाच्या दडपणात आणि वेगाने पसरत जाणऱ्या अफवांमुळे तिला स्वतःला सावरणं कठीण जात होतं. पण काळासोबत सानियाने स्वतःला सावरलं आणि आपला पुढचा प्रवास सुरु केला. करीयरसोबतच ती आपल्या मुलालाही सांभाळत आहे.






