अहिल्यानगर शहरातील श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघाची जागा हडपल्याचा आरोप ठाकरेंचे पक्षाचे अहिल्यानगर शहरप्रमुख किरण काळे यांनी केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या कथित कार्यालयाच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे सातत्याने आरोप करत आहेत. काळे यांनी जैन संघाच्या विश्वस्तांविरोधात नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या अनुषंगाने या जागेसंदर्भातील वस्तुस्थिती सांगण्यासाठी सकल जैन समाजाचे शिष्टमंडळ तसेच श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघाचे पदाधिकारी आज जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेतली व कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल केलेली तक्रार ट्रस्टला केवळ बदमान करण्यासाठी व खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी तक्रार केल्याचे शिष्टमंडळाने सांगितले आहे.