Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gold Rate : सोन्याचे दर आणखी कोसळतील? आतापर्यंत 25 टक्क्यांची घसरण… तज्ज्ञांनी काय दिला सल्ला?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत आतापर्यंतच्या उच्चांकावरून २५ टक्क्यांनी घसरली आहे. दहा वर्षांपूर्वी, जानेवारी महिन्यात सोन्याने प्रति औंस ५,५९५ डॉलर्सचा विक्रमी उच्चांक गाठला होता. या आठवड्याच्या अखेरीस देशांतर्गत आणि परदेशात सोन्याच्या दरात किंचित वाढ दिसून आली. पण सध्याची परिस्थिती पाहता दरांवर काय परिणाम होणार?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 14, 2026 | 08:05 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत आतापर्यंतच्या उच्चांकावरून २५ टक्क्यांनी घसरली आहे. दहा वर्षांपूर्वी, जानेवारी महिन्यात सोन्याने प्रति औंस ५,५९५ डॉलर्सचा विक्रमी उच्चांक गाठला होता. या आठवड्याच्या अखेरीस देशांतर्गत आणि परदेशात सोन्याच्या दरात किंचित वाढ दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारात किंचित वाढ होऊन भाव प्रति औंस ४,२२२ डॉलर्सवर बंद झाला. MCX या कमोडिटी एक्सचेंजवरही भाव १.१७ टक्क्यांनी वाढून प्रति १० ग्रॅम १,५०,६७५ रुपयांवर बंद झाला. तथापि, बाजार तज्ज्ञांच्या मते, आणखी वाढ होण्याची शक्यता कमी असून भावात आणखी घसरण होऊ शकते.

पश्चिम आशियात तणाव, तरीही भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! विकास दर जगात अव्वल; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा खुलासा

सोन्याच्या किमतींवर आणखी दबाव

मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, स्टेट स्ट्रीट इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटचे कमोडिटी विश्लेषक आकाश दोशी म्हणतात की, यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीची अपेक्षा आणि डॉलरचे मजबूत होणे यामुळे सोन्याच्या किमतींवर आणखी दबाव येऊ शकतो. त्यांच्या मते, पश्चिम आशियातील तणाव पूर्णपणे संपुष्टात आल्यावर आणि कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ८० डॉलर्सपर्यंत खाली आल्यावरच सोन्याच्या दरात वाढ अपेक्षित आहे.

सोन्याच्या किमतीत घसरण

ब्रोकरेज फर्म यूबीएसच्या मते, अल्प कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस ३,८५०-४,००० डॉलरपर्यंत घसरू शकते. जर अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदर वाढवले, तर सोन्यावर दबाव येईल. तज्ज्ञांच्या मते, महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी फेडरल रिझर्व्ह यावर्षी व्याजदर वाढवू शकते. दरम्यान, डॉलर निर्देशांकाच्या मजबुतीचाही सोन्यावर परिणाम होत आहे. मजबूत डॉलरमुळे इतर चलनांमध्ये सोने खरेदी करणे महाग होते, ज्यामुळे सोन्याची मागणी कमी होते.

मध्यवर्ती बँका देईल आधार

मध्यवर्ती बँकांच्या सोन्याच्या खरेदीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. गेल्या काही वर्षांपासून सोन्याच्या किमतींमध्ये मध्यवर्ती बँकांच्या खरेदीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यूबीएसच्या अंदाजानुसार, मध्यवर्ती बँकांकडून ७५०-१,००० टन सोन्याची खरेदी होऊ शकते. जर सोन्याची किंमत प्रति औंस ३,८५०-४,००० डॉलरच्या पातळीवर पोहोचली, तर ही खरेदीची एक चांगली संधी असू शकते.

आता डॉलरची दादागिरी संपणार? रुपयाचा भाव वाढवण्यासाठी RBI ने कसली कंबर; काय आहे नेमका प्लॅन?

Web Title: Gold rate falls 25 percent from peak expert advice buying opportunity marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 08:05 PM

Topics:  

  • Business News
  • Gold Rate
  • Gold Rate Today
  • Gold-Silver Rate
  • Marathi News
  • RBI
  • Today's Gold Rate

संबंधित बातम्या

Satara News: सत्तेची हवा नाही! वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर
1

Satara News: सत्तेची हवा नाही! वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर

Satara News: साताऱ्यातील शेनवडी जि. प. शाळा झाली ‘डिजिटल’! कदम दांपत्याकडून १ लाख १६ लाखांचा स्मार्ट पॅनल बोर्ड भेट
2

Satara News: साताऱ्यातील शेनवडी जि. प. शाळा झाली ‘डिजिटल’! कदम दांपत्याकडून १ लाख १६ लाखांचा स्मार्ट पॅनल बोर्ड भेट

भारताच्या तरुणांमध्ये वाढतोय मानसिक तणाव? 49.5% जण स्वतःच सामना करतात, फक्त 9.2% घेतात प्रोफेशनल मदत; ‘एमपॉवर 2026’ सर्वेक्षणातील
3

भारताच्या तरुणांमध्ये वाढतोय मानसिक तणाव? 49.5% जण स्वतःच सामना करतात, फक्त 9.2% घेतात प्रोफेशनल मदत; ‘एमपॉवर 2026’ सर्वेक्षणातील

Ranveer Singh New Brand Ambassador: ‘धुरंधर’नंतर रणवीर सिंह यांचा नवा अंदाज! बनला महागड्या गाडीचा अॅम्बेसिडर
4

Ranveer Singh New Brand Ambassador: ‘धुरंधर’नंतर रणवीर सिंह यांचा नवा अंदाज! बनला महागड्या गाडीचा अॅम्बेसिडर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.