सोन्याचे भाव कडाडले! ( सौजन्य - सोशल मीडिया )
सणासुदीच्या काळात सोना – चांदीच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. आज, १९ सप्टेंबर २०२६ रोजी, भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात लक्षणीय वाढ दिसून येत आहे. २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १.५४ लाख रुपयांच्या पुढे गेला आहे. दरम्यान, २२-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १.४४ लाख रुपये आहे. नेमके शहरांमध्ये काय आहेत तर सविस्तर जाणून घेऊयात.
| शहर | २४-कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम ) | २२-कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) |
|---|---|---|
| दिल्ली | ₹१,५४,५८० | ₹१,४४,८५० |
| मुंबई | ₹१,५४,४३० | ₹१,४४,३५० |
| बंगळूर | ₹१,५४,४२० | ₹१,४४,३०० |
| चेन्नई | ₹१,५४,४३० | ₹१,४१,५६० |
आज चांदीच्या दरातही वाढ दिसून येत आहे. तिचा सरासरी दर प्रति किलोग्राम सुमारे ₹२,५०,१०० राहिला आहे. मजबूत जागतिक ट्रेंडच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी वायदे बाजारात चांदीचे दर १.२५% नी वाढून प्रति किलोग्राम ₹२,४१,१८३ झाले. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर, डिसेंबर डिलिव्हरीसाठीच्या चांदीचा भाव २७ रुपयांनी, म्हणजेच १.२५ टक्क्यांनी वाढून २,४१,१८३ रुपये प्रति किलो झाला. ३,०८२ लॉट्सची उलाढाल नोंदवली गेली.
एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, बाजार विश्लेषकांनी सांगितले की, देशांतर्गत बाजारातील मजबूत ट्रेंडमुळे व्यापाऱ्यांनी नवीन पोझिशन्स खरेदी केल्याने चांदीच्या फ्युचर्सच्या किमती वाढल्या.
सामान्यतः, जेव्हा देशांतर्गत स्पॉट मार्केटमध्ये मागणी मजबूत असते, तेव्हा एमसीएक्ससारख्या कमोडिटी एक्सचेंजवरील व्यापारी पुढील भाववाढीच्या अपेक्षेने नवीन खरेदी सुरू करतात, ज्यामुळे फ्युचर्सच्या किमतींना थेट आधार मिळतो. जागतिक स्तरावर, न्यूयॉर्कमध्ये चांदीच्या किमती २.३९ टक्क्यांनी वाढून $६६.७८ प्रति औंस झाल्या.
मध्यपूर्वेतील सध्याचा तणाव, तेल शुद्धीकरण कारखाने आणि पाइपलाइनवरील अलीकडील हल्ले आणि सुरू असलेल्या जागतिक शुल्क युद्धामुळे बाजारातील अनिश्चितता वाढली आहे. वाढत्या जोखमीच्या काळात, गुंतवणूकदार आपले भांडवल सुरक्षित ठेवण्यासाठी सोन्याकडे एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून वळतात, ज्यामुळे मागणी वाढते आणि किमती वाढतात.
जागतिक बाजारात सोन्याच्या किमतींना गोल्डमन सॅक्स, भारतातील आरबीआय आणि चीनसारख्या देशांसह जगभरातील मध्यवर्ती बँकांकडूनही महत्त्वपूर्ण पाठिंबा मिळत आहे. जगातील मध्यवर्ती बँका त्यांच्या परकीय चलन साठ्याचे अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अधिकाधिक सोन्याची खरेदी करत आहेत. यामुळेही किमती वाढत आहेत.
PepsiCo India चा 36000 शेतकऱ्यांना दिलासा; ‘pep+’ उपक्रमांतर्गत शाश्वत शेती आणि जलसंवर्धनाला गती






