
साखर-कांद्याच्या किमतींना आळा घालण्यासाठी सरकारचा 'नवा प्लॅन', परिणाम होणाऱ्या खाद्यपदार्थांची यादी वाचाच
मागील काही दिवसांमध्ये खाद्य पदार्थांच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर बसत आहे. अचानक वाढलेल्या खाद्यपदार्थांच्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट विस्खलित झाले आहे. दरवाढ केवळ साखरेपुरती मर्यादित नसून गहू, तेल आणि डाळींच्या दरातसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, १ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट दरम्यान केवळ कांद्याच्या दरात ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशीच वाढ साखरेच्या दरात सुद्धा झाली आहे. अनेक ठिकाणी साखरेचे भाव ६०-७० रुपये प्रति किलोपर्यंत आहेत.(फोटो सौजन्य – istock)
झुकरबर्गचा AI प्लॅन फसला! 60% कर्मचारी कपातीपासून यू-टर्नपर्यंत, काय होता ‘Project OT’?
ऑगस्ट महिन्यात तांदळाच्या दरात २.१ टक्क्यांची वाढ झाल्याचे नोंदवण्यात आले आहे.
डाळींच्या दरातही ०.४ ते ०.६ टक्क्यांची वाढ
खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये ०.९% ते १.६% ची वाढ
ऑगस्ट महिन्यात साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याचे नोंदवण्यात आले आहे.
मागील महिन्याच्या तुलनेमध्ये साखरेच्या दरात ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांनंतर साखरेच्या दरात १८ टक्क्यांनी घट झाली आहे.
मागील काही दिवसांपासून पश्चिम आशियात वाढलेल्या तणावांमुळे अनेक खाद्यपदार्थांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला. खाद्यतेलाच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. बदलत्या हवामानाचा परिणाम पीक उत्पादनावर झाला आहे. संयुक्त राष्ट्राने पश्चिम आशियातील तणावाला प्रमुख कारण मानून जागतिक अन्न सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. यावर आरबीआयने म्हंटले आहे की, वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे इंधनाच्या किमती आणि पुरवठा साखळीवर दबाव कायम आहे.
साखरेच्या किमतींसोबतच कांद्याच्या वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार बफर स्टॉकमधून कांदा वितरित करत आहे. यासाठी कांदा एक्सप्रेस सुद्धा चालवली जाते. ही एक्स्प्रेस देशभरातील विविध शहरांमध्ये प्रवास करून कमी किमतीत कांदा पुरवते. तसेच देशातील साखरेचा साठा कमी झालेला नाही, असे सुद्धा सरकारने सांगितले आहे. साखरेचा पुरवठा सामान्य करण्यासाठी आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी ब्राझीलमधून साखर खरेदी केली जाणार आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परदेशात निर्यात होणारी ३,५०,००० टन साखर रिफायनर्स देशांतर्गत बाजारात वळवतील, असे सुद्धा म्हंटले आहे.