Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kitchen Budget Hike : देवा रे देवा… किचनमधील गोडवा तर महागला; पाठोपाठ ‘या’ वस्तूंच्या किमतीही कडाडल्या

Kitchen Budget Hike : बाजारात गेल्या काही दिवसांपासून साखरेच्या दरातील चढ-उतारावर सर्वांचे लक्ष टिकून आहे. पण त्या गडबडीत सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील इतर महत्त्वाच्या वस्तूंचे भाव गुपचूप वाढले आहेत. या वाढीमुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट पुन्हा एकदा कोलमडले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 26, 2026 | 02:46 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • किचनमधील गोडवा तर महागला
  • पाठोपाठ ‘या’ वस्तूंच्या किमतीही कडाडल्या
  • नेमक्या कोणत्या गोष्टींचे दर वाढले?
Kitchen Budget Hike : ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या किमती कडाडल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावरील भार वाढणार आहे. पण एकीकडे हा भार वाढत असताना सगळीकडे गोंधळ सुरु आहे. पण हा या सगळ्यात हळूच स्वयंपाकघरातील इतर जीवनावश्यक वस्तूंच्या देखील किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किचनमधील रोजच्या वापरातल्या वस्तू कडाडल्यामुळे सामान्यांवर मोठा भार पडणार आहे. नेमक्या कोणत्या वस्तूंच्या किमती वाढल्यात? ज्यामुळे तुमचं किचनचं गणित बिघडणार आहे. जाणून घेऊयात सगळीच यादी. ( Kitchen Budget Hike ) 

Anil Agarwal Success Story : 16 लाख उधार घेत सुरु केला व्यवसाय, आज 3600000000000 चे मालक! अनिल अग्रवाल यांनी कसा बदलला गेम?

साखरेनंतर कांद्याने खाल्ला भाव

साखरेनंतर, सगळ्यात जास्त चर्चेत असलेला घटक म्हणजे कांदा. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात प्रकर्षाने वापरला जाणारा घटक म्हणजे कांदा. त्यामुळे याचे वाढते दर तुमच्या रोजच्या जीवनातील गणित बिघडवत आहे. त्यामुळे तुमच्या खर्चावर परिणाम होत आहे. २४ ऑगस्ट रोजी, देशभरात कांद्याचा सरासरी किरकोळ भाव प्रति किलो ४३.५३ रुपये झाला. म्हणजे हा भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत ५९ टक्क्यांनी वाढला आहे. जो मागील वर्षी प्रति किलो २७.३७ रुपये इतका होता.

चेन्नईमध्ये किरकोळ भाव प्रति किलो ६० रुपये, दिल्लीत ५५ रुपये आणि कोलकातामध्ये ५३ रुपये होता. पण सरकारने सुरु केलेल्या ‘कांदा एक्सप्रेस’ मुळे बिघडणारी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न होत आहे. सरकार साठा किरकोळ दरात विकण्याचे धोरण आखत आहे, ज्यामुळे कांद्याच्या किमतीत घट होऊ शकते. आता पुढील काळात नेमके किती दर आटोक्यात ठेवता येतात? परिस्थितीनुसार स्पष्ट होईल.

साखरेसोबत गुळाचा गोडवा महागला

माध्यमांच्या वृत्तानुसार, साखरेसोबतच गुळाच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात घरातील गोडवा गायब होणार असल्याचं चित्र दिसू लागलं आहे. गेल्या १५ दिवसांत, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशसारख्या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये दरात जवळपास २५ टक्क्यांनी वाढले आहेत. ज्यामुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी मिठाई महाग झाली आहे. किरकोळ बाजारात त्याचा सरासरी भाव ६५ रुपये प्रति किलो इतका झाला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या घरात जल्लोषाऐवजी हिशोबाची गणित सोडवली जाणार आहेत अशी परिस्थिती आहे.

फोडणीतील महत्त्वाच्या घटकाचा दर वाढला

आगामी सणासुदीच्या काळात वाढलेली मागणी आणि जागतिक बाजारपेठेतील वाढलेल्या आयातीमुळे खाद्य तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात खाद्य तेलाच्या किमती सुमारे १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे किरकोळ विक्रीचा दर २०० रुपये प्रति लिटरच्या वर गेले आहेत. उद्योग तज्ज्ञांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, सणासुदीच्या काळात किमती आणखी वाढू शकतात.

महागाईचा झटका अंड्यांनाही

अंडी हे प्रथिनांचा सर्वोत्तम आणि सर्वात स्वस्त स्रोत मानले जातात. त्यामुळे त्यांच्याकडे पौष्टिक म्हणून पाहिलं जातं. राष्ट्रीय अंडी समन्वय समितीच्या (NECC) अहवालानुसार, गेल्या वर्षभरात अंड्यांच्या दरात तब्बल ३५% ते ४०% नी वाढ झाली आहे. एक्स-फार्ममधील दर आता प्रति अंडे अंदाजे ₹७ वर पोहोचले आहेत. किरकोळ दर ₹८.५० ते ₹९ च्या दरम्यान आहेत. त्यामुळे देशभरात वाढलेल्या महागाईचा परिणाम सगळ्यात गोष्टींवर दिसून येत आहे.

Multibagger Penny Stock : ‘या’ शेअरमध्ये तुफान तेजी! गुंतवणूकदारांचे पैसे झाले डबल? कंपनीने दिला 2 वेळा बोनस

Web Title: Kitchen budget hike as essential grocery items become expensive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • ganeshostav
  • High Inflation Rate
  • Sugar Price

संबंधित बातम्या

Kitchen Budget Inflation : महागाईच्या झळा आणखीनच तीव्र… कांदा, तेल LPG  सगळंच कडाडलं! घरचा स्वयंपाक 10 टक्क्यांनी महागला
1

Kitchen Budget Inflation : महागाईच्या झळा आणखीनच तीव्र… कांदा, तेल LPG सगळंच कडाडलं! घरचा स्वयंपाक 10 टक्क्यांनी महागला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.