Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana Bihar: 10 हजार रुपयांच्या योजनेमुळे बदलले बिहारचे राजकीय गणित? नितीश कुमारांची गेम-चेंजर योजना!

 नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत 'M' फॅक्टर म्हणजेच महिला मतदारांनी एनडीएला भरघोस मतांनी जिंकवले. कशी ठरली नितीश कुमारांची योजना गेम-चेंजर..या योजनेमुळे महागठबंधनचा पराभव झाला. जाऊन घेऊया सविस्तर.. 

  • By Priti Hingane
Updated On: Nov 16, 2025 | 12:15 PM
Mukhyamantri Mahila Rojgar Yojana

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana

Follow Us
Close
Follow Us:
  • बिहार सरकारची जीविका निधी योजना ठरली गेम-चेंजर
  • महिलांच्या खात्यात योजनेअंतर्गत 10 हजार रुपये हस्तांतरित
  • ‘M’फॅक्टरमुळे निवडणुकीत NDAचा ऐतिहासिक विजय

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana Bihar: नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत ‘M’ फॅक्टर म्हणजेच महिला मतदारांनी एनडीएला भरघोस मतांनी जिंकवले. बिहार सरकारने बिहार निवडणुकीपूर्वी महिलांसाठी जीविका निधी योजनेअंतर्गत 10 हजार रुपये महिलांच्या खात्यात हस्तांतरित केले. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीत NDAचा ऐतिहासिक विजय झाल्याचे म्हंटले जात आहे. या निवडणुकीत महागठबंधनचा दारुण पराभव झाला.

एनडीए या निवडणूक विजयी होणार अशी कल्पना होती मात्र, इतक्या विशाल त्सुनामीची कल्पना कोणी सुद्धा करू शकले नाही. एनडीएच्या या बहुमताचे अनेक पैलूंचा अभ्यास करण्यात येत आहे. महिलांचे मतदान हा महत्वाचा मुद्दा या निवडणुकीत मानण्यात येत आहे. पहिल्यांदाच बिहारमध्ये पुरुषांपेक्षा महिलांनी जास्त मतदान केले आहे.

हेही वाचा : Gautam Adani : बिहार निवडणुकीत अदानींचे नाव चर्चेत, निकालानंतर फायदा झाला की तोटा?

‘M Factor’ ने पलटला खेळ!

बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या निकालाने सिद्ध केले की ‘M’ फॅक्टर म्हणजेच महिला फॅक्टर चालतो. बिहारमध्ये एनडीएच्या विजयाचे श्रेय पूर्णपणे महिला मतदारांना जाते. कारण या निवडणुकीत महिला मतदारांच्या मतदानामुळे निवडणुकीत पूर्ण खेळच पलटला. महिलांसाठी जीविका निधी योजनेअंतर्गत 10 हजार रुपयांच्या योजनेने महत्वाची भूमिका निभावली. जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन या योजनेने एनडीएला पाठिंबा देण्यासाठी महिलांना भाग पाडले.

मुख्यमंत्री महिला रोजगार योजना 

बिहारमधील नितीश कुमार सरकारने राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्राप्रमाणे बिहार मुख्यमंत्री रोजगार योजना घोषित केली. या योजने अंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा हेतु होता. बिहार सरकारने महिलांना स्वतःचे लहान-सहान व्यवसाय सुरू करता यावे म्हणून 10 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले. 2 लाख रुपयेपर्यंत अनुदानाची मर्यादा आहे. निवडणुकीच्या काही महिन्यांआधीच त्याअंतर्गत 7.5 दशलक्ष महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये खात्यात जमा करण्यात आले. बिहार सरकारने 18 प्रकारच्या लघु व्यवसायांमध्ये या योजनेअंतर्गत मदत केली. एखाद्या महिलेने व्यवसाय सहा महिन्यांपर्यंत सुरू ठेवले तर 2 लाख रुपयांपर्यंत मदत देण्याची सुद्धा या योजनेत तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा : SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! ३० नोव्हेंबरपासून ही सेवा होणार बंद

नीतीश कुमार यांनी सत्तेत असताना अनेक महिलांसाठी विविध उपोययोगी योजना काढल्या. ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांसाठी 50% आरक्षणाची हमी सुद्धा दिली. NDA ने आश्वासन देऊन ती पूर्ण केली. मात्र, महागठबंधनने आश्वासन देऊन ते पूर्ण केले नाही.

Web Title: Has the political math of bihar changed due to the mukhyamantri mahila rojgar yojana scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 12:15 PM

Topics:  

  • bihar assembly election
  • bihar assembly elections 2025
  • majhi Ladki Bahin yojna
  • narendra modi
  • NDA government
  • Nitish Kumar

संबंधित बातम्या

Bihar Election 2025: नितीश अडले, भाजपाला नडले; बिहारात नवीन सरकार स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर
1

Bihar Election 2025: नितीश अडले, भाजपाला नडले; बिहारात नवीन सरकार स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर

Bihar Assembly Election 2025:  रोहिणी आचार्य यांचा RJD ला रामराम; तेजस्वी यादवांच्या दोन सहकाऱ्यांवर गंभीर आरोप
2

Bihar Assembly Election 2025: रोहिणी आचार्य यांचा RJD ला रामराम; तेजस्वी यादवांच्या दोन सहकाऱ्यांवर गंभीर आरोप

Bihar Election Result Market Impact: बिहारमध्ये NDA चा ‘विजयी’ झेंडा..! तरीही, शेअर बाजार का लाल रंगात? गुंतवणूकदार झाले सावध
3

Bihar Election Result Market Impact: बिहारमध्ये NDA चा ‘विजयी’ झेंडा..! तरीही, शेअर बाजार का लाल रंगात? गुंतवणूकदार झाले सावध

Bihar Election Result 2025 : नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री होणार! महिला रोजगार योजनेमुळे बिहारमध्ये वारं फिरलं?
4

Bihar Election Result 2025 : नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री होणार! महिला रोजगार योजनेमुळे बिहारमध्ये वारं फिरलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.