Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis : SMA Type 1 ग्रस्त यशश्रीच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी थांबवला ताफा; उपचारांसाठी दिले मदतीचे निर्देश

Devendra Fadnavis : SMA Type 1 आजाराने ग्रस्त यशश्री चितळकरच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उल्हासनगर दौऱ्यात ताफा थांबवून पालकांची भेट घेतली. उपचारांसाठी 11 कोटींची गरज असून आतापर्यंत 51 लाख रुपये जमा झाले आहेत.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 22, 2026 | 08:18 PM
Devendra Fadnavis : SMA Type 1 ग्रस्त यशश्रीच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी थांबवला ताफा; उपचारांसाठी दिले मदतीचे निर्देश

Devendra Fadnavis : SMA Type 1 ग्रस्त यशश्रीच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी थांबवला ताफा; उपचारांसाठी दिले मदतीचे निर्देश

Follow Us
Follow Us:
  • यशश्री दुर्मिळ आजाराने ग्रस्त
  • आतापर्यंत फक्त 51 लाखच जमा
  • दानशूर व्यक्तींच्या मदतीची नितांत गरज
 

साई सावंत, उल्हासनगर

Devendra Fadnavis : रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उल्हासनगरच्या दौऱ्यावर होते. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या एका दाम्पत्यावर त्यांची नजर गेली व त्यांनी आपला ताफा थांबवला. हे दाम्पत्य होते, SMA Type 1 या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या यशश्री चितळकरचे आई-वडिल.
आपल्या मुलीच्या उपचारासाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी चितळकर कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांकडे मदतीची याचना केली. मुख्यमंत्र्यांनीही संवेदनशीलता दाखवत संबंधित अधिकाऱ्यांना सर्वोतोपरी चितळकर कुटुंबियांना मदतीचे निर्देश दिले.

यशश्री दुर्मिळ आजाराने ग्रस्त

यशश्रीला SMA Type 1 हा दुर्मिळ आणि गंभीर आजार झाला आहे. तिच्यावरील उपचारासाठी तब्बल तब्बल ११ कोटी रुपयांची गरज आहे. अशात आपल्या लेकीला वाचवण्यासाठी तिच्या आई-वडिल संघर्ष करताना दिसत आहेत. ट्रस्ट, मंदिर व दानशूर व्यक्तींच्या गाठीभेटी घेण्यासाठी त्यांनी सुरुवात केली आहे.
काहीही करून आपल्या लेकीला या आजारातून बरं करायचं असा निश्चिय त्यांनी केला असून दिवस-रात्र ते आर्थिक मदतीसाठी तहान भूक विसरून धडपड करत आहेत.

अभिमानास्पद! अडचणी आल्या, पण जिद्द सोडली नाही; मीरा-भाईंदरच्या रेश्मा कुटे बनल्या पहिल्या महिला फुल आयर्नमॅन

आतापर्यंत फक्त 51 लाखच जमा

यशश्रीच्या आई-वडिलांच्या प्रयत्नांना यश येत आहे, पण आतापर्यंत मदत मोहिमेत दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून फक्त 51 लाख रुपयेच जमा झाले आहेत. म्हणजेच अद्याप त्यांना साडे दहा कोटींची नितांत गरज आहे. ती रक्कम खूप मोठी वाटत असली तरी देव काही तरी मार्ग काढेल या आशेने त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत.
मुख्यमंत्री उल्हासनगरला येणार असल्याचे कळताच त्यांनी सकाळपासूनच रखरखत्या उन्हात आपल्या लेकीसह त्यांची वाट पाहिली. मुख्यमंत्र्यांनीही सहानभूती दाखवत आपला ताफा थांबवला व त्यांच्या कडून यशश्रीच्या आजाराबाबत माहिती जाणून घेतली.

Ramayan Movie Controversy : रामायण सिनेमावरून राजकारण तापलं! काँग्रेसचा RSS, विश्व हिंदू परिषदेवर हल्लाबोल

त्या काही मिनिटांमध्ये यशश्रीच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्र्यांना आपल्याजवळील कागदपत्रासमवेत आवश्यक असलेली मदत आणि सद्य परिस्थिती मांडली. मुख्यमंत्र्यांनीही परिस्थिती जाणून घेत तातडीने यशश्रीच्या उपचारासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः ताफा थांबवून या कुटुंबाची भेट घेतल्याने यशश्रीच्या उपचारासाठी मदतीची आशा निर्माण झाली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: यशश्री चितळकरला कोणता आजार झाला आहे?

    Ans: यशश्रीला SMA Type 1 हा दुर्मिळ आणि गंभीर आजार झाला आहे.

  • Que: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशश्रीच्या कुटुंबीयांची भेट कुठे घेतली?

    Ans: उल्हासनगर दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवून यशश्रीच्या आई-वडिलांची भेट घेतली.

  • Que: मुख्यमंत्र्यांनी यशश्रीच्या उपचारांसाठी काय निर्देश दिले?

    Ans: यशश्रीच्या उपचारांसाठी आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.

Web Title: Cm devendra fadnavis stops convoy to help yashashri sma type 1 treatment rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 08:16 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • health
  • Ulhasnagar

संबंधित बातम्या

Ulhasnagar Crime News : उल्हासनगरमध्ये विदेशी पिस्तुलासह २३ वर्षीय तरुणाला अटक; विठ्ठलवाडी पोलिसांची कारवाई
1

Ulhasnagar Crime News : उल्हासनगरमध्ये विदेशी पिस्तुलासह २३ वर्षीय तरुणाला अटक; विठ्ठलवाडी पोलिसांची कारवाई

Ulhasnagar Politics : मुख्यमंत्र्यांच्या उल्हासनगर दौऱ्यात भाजप-शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर! महापौरांना निमंत्रणच नाही; मेट्रोबाबतह
2

Ulhasnagar Politics : मुख्यमंत्र्यांच्या उल्हासनगर दौऱ्यात भाजप-शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर! महापौरांना निमंत्रणच नाही; मेट्रोबाबतह

Cabinet Decisions : राज्य सरकारचे मोठे निर्णय! शिक्षण क्षेत्रातही होणार महत्त्वाचे बदल, जाणून घ्या चार महत्वाचे निर्णय
3

Cabinet Decisions : राज्य सरकारचे मोठे निर्णय! शिक्षण क्षेत्रातही होणार महत्त्वाचे बदल, जाणून घ्या चार महत्वाचे निर्णय

चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर संताप; मुख्यमंत्री फडणवीसांवरील आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर
4

चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर संताप; मुख्यमंत्री फडणवीसांवरील आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.