
toll-new-rules
सोने-चांदीच्या किमतीत मोठी वाढ; ट्रम्प टॅरिफमुळे धमाका!, पाहा तुमच्या शहरातील नवे दर…
सध्याच्या नियमांनुसार, जर तुमच्या वाहनात वॅलिड FASTag नसेल किंवा FASTag काम करत नसेल, तर नियमित टोलच्या दुप्पट चार्जेस आकारले जातात. जे लोक UPI द्वारे पेमेंट करतात त्यांना त्यांच्या गाडीच्या कॅटेगरीनुसार 1.25 पट टॅक्स भरावा लागतो.
याबाबत अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय की, ‘नोव्हेंबरमध्ये रोख पेमेंट कमी करण्याचा पर्याय म्हणून UPI द्वारे पेमेंट सुरू करण्यात आले होते, जे त्यावेळी एकूण टोल संकलनाच्या सुमारे 2 टक्के होते. आत्तापर्यंत, रोख पेमेंट 1 टक्क्यांने कमी झाले आहे. जे काही महिन्यांपूर्वी रोख पद्धतीने जमा झालेल्या पेमेंटच्या निम्मे आहे. सर्व टोल प्लाझावर पेमेंट करण्यासाठी UPI प्रणाली आहे.
महामार्गावरील जाम आणि लांबच लांब रांगा यापासून दिलासा मिळावा म्हणून सरकारने हा नियम आणला आहे. बऱ्याच वेळा रोख पेमेंटला जास्तसाठी वेळ लागतो कारण पैशांच्या व्यवहारात, बदल देणे किंवा घेणे आणि पावत्या कापण्यात बराच वेळ जातो. अशा स्थितीत टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. डिजिटल पेमेंटमुळे महामार्गावरून वाहने न थांबता पुढे जाऊ शकतात. त्यामुळे प्रवास सोयीचा होतो. एकीकडे, यामुळे वापरकर्त्यांना महामार्गावरून प्रवास करणे सोपं होईल आणि दुसरीकडे टोल व्यवहारातही पारदर्शकता येईल. टोल चुकवणे किंवा इतर कोणताही त्रास होण्याची शक्यताही पूर्णपणे संपून जाईल.
एका रिपोर्टनुसार टोल प्लाझावर डिजिटल पेमेंट पद्धतीमुळे देशाचे वार्षिक ८७००० कोटी रुपयांची बचत होईल. अनेक वेळा टोल ओव्हरवर वाहनचालक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याचे प्रकारही घडले आहेत या समस्या देखील डिजिटल प्रणालीमुळे पूर्णपणे दूर होतील.
बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! ‘या’ योजनेसाठी सरकार देतंय बंपर सबसिडी; जाणून घ्या फायदे!