Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घर खरेदीदारांना मोठा दिलासा! सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, ताबा मिळाल्यानंतरही बिल्डरविरोधात तक्रार करता येणार

घर खरेदीदारांसाठी सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. फ्लॅटचा ताबा मिळाल्यानंतरही विलंब किंवा सेवेतील त्रुटींविरोधात ग्राहक मंचात तक्रार करून नुकसानभरपाई मागण्याचा अधिकार कायम असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयाने दिला आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 27, 2026 | 09:33 PM
LAWYER

LAWYER

Follow Us
Follow Us:
  • ताबा मिळाल्यानंतरही घर खरेदीदारांना ग्राहक मंचात तक्रार करण्याचा अधिकार कायम राहणार.
  • विलंब झाल्यास बिल्डरकडून नुकसानभरपाईची मागणी करता येणार.
  • ग्राहकांचे हक्क मर्यादित करणाऱ्या करारातील अटींना सर्वोच्च न्यायालयाने दुजोरा दिलेला नाही.
 

घर खरेदीदारांसाठी सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय दिला आहे. अनेकदा बिल्डरकडून फ्लॅटचा ताबा वर्षानुवर्षे उशिरा दिला जातो. ताबा मिळाल्यानंतर तक्रार करता येणार नाही, अशी धारणा अनेकांची होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, फ्लॅटचा ताबा मिळाल्यानंतरही विलंब किंवा सेवेतील त्रुटींविरोधात ग्राहक मंचात तक्रार करून नुकसानभरपाईची मागणी करता येईल.

न्यायालयाने राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाचा (NCDRC) यापूर्वीचा निर्णय रद्द करत ग्राहकांच्या अधिकारांना प्राधान्य दिले आहे. तसेच, बिल्डर आणि ग्राहक यांच्यातील कोणताही करार ग्राहकांच्या कायदेशीर हक्कांवर मर्यादा आणू शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

22 वर्षांच्या विलंबानंतर या प्रकरणात ऐतिहासिक निकाल

हा निर्णय एका अशा प्रकरणात देण्यात आला, ज्यामध्ये घर खरेदीदाराला तब्बल 22 वर्षांनंतर फ्लॅटचा ताबा मिळाला होता. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि व्ही. महना यांच्या खंडपीठाने खरेदीदाराच्या बाजूने निकाल देत, ताबा मिळाल्यानंतरही नुकसानभरपाई मागण्याचा अधिकार कायम असल्याचे नमूद केले.

Income Tax Return : सावधान! जुलैच्या या 3 तारखा तुमच्या खिशावर पडू शकतात भारी, वेळेत पूर्ण करा ही कामे

सदर खरेदीदाराने एनसीआरमधील द्वारका येथे फ्लॅट खरेदी केला होता. ताबा देण्यास झालेल्या मोठ्या विलंबामुळे त्याने ग्राहक मंचात दाद मागितली होती. न्यायालयाने स्पष्ट केले की, ग्राहकांनी ताबा स्वीकारला म्हणून त्यांचे नुकसानभरपाईचे हक्क संपत नाहीत.

NCDRC चा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने का रद्द केला?

यापूर्वी NCDRC ने असा निर्णय दिला होता की, जर घर खरेदीदाराने ताबा मिळण्यापूर्वी विलंबाबाबत तक्रार केली नसेल, तर ताबा घेतल्यानंतर तो नुकसानभरपाई मागू शकत नाही.

मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हा दृष्टिकोन चुकीचा ठरवत सांगितले की, ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे हे न्यायव्यवस्थेचे कर्तव्य आहे. त्यामुळे ताबा मिळाल्यानंतरही ग्राहकांना न्याय मिळण्याचा मार्ग खुला राहील.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर सर्वात मोठे अपडेट, Fitment Factor बाबत मागण्या होणार पूर्ण?

घर खरेदीदारांसाठी या निर्णयाचा काय फायदा?

या निर्णयामुळे वेळेवर ताबा न देणाऱ्या बिल्डर्सना मोठा धक्का बसणार आहे. आता घर खरेदीदारांना पुढील अधिकार मिळणार आहेत:

  • ताबा मिळाल्यानंतरही विलंबाबद्दल तक्रार दाखल करता येईल.
  • बिल्डरकडून नुकसानभरपाईची मागणी करता येईल.
  • करारातील अटी ग्राहकांच्या कायदेशीर हक्कांवर मर्यादा आणू शकणार नाहीत.

Web Title: Home buyers relief supreme court allows complaint after possession builder delay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 09:33 PM

Topics:  

  • Business News
  • Home loan
  • property deal
  • Supreme Court of India

संबंधित बातम्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
1

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Supreme Court News: सत्र न्यायालयांच्या अधिकारांना सर्वोच्च न्यायालयाची कात्री! जन्मठेपेच्या शिक्षेबाबत दिला ऐतिहासिक निकाल
2

Supreme Court News: सत्र न्यायालयांच्या अधिकारांना सर्वोच्च न्यायालयाची कात्री! जन्मठेपेच्या शिक्षेबाबत दिला ऐतिहासिक निकाल

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा
3

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ
4

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.