
(फोटो सौजन्य: pinterest)
Unclaimed Assets Portal: जर तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे पैसे एखाद्या बँक खात्यात, विमा पॉलिसीमध्ये किंवा म्युच्युअल फंडात अडकले असतील आणि तुम्हाला ते पैसे काढायचे आहेत पण याबाबत तुम्हाला कोणतीही कल्पना नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अशा प्रकारे दावा न केलेले आर्थिक मालमत्तेचे शोध घेण्यास मदत करण्यासाठी सरकारने आता एक नवीन पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलचे नाव ‘Common Landing Portal for Unclaimed Financial Assets’ हे पोर्टल तुमच्यासाठी फार मदतपूर्ण ठरेल. या अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून, तुम्ही आता केवळ एका क्लिकवर अतिशय सहजपणे तुमचे किंवा तुमच्या कुटुंबाचे असे पैसे शोधू शकता, ज्यावर गेल्या अनेक वर्षांपासून कोणीही दावा केलेला नाही. या पोर्टलविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला येथेच उपलब्ध होईल.
दावा न केलेली मालमत्ता म्हणजे असा पैसा किंवा अशा गुंतवणूक, ज्यांच्यावर दीर्घकाळापासून कोणीही दावा केलेला नाही. यामध्ये बँक खात्यांमधील ठेवी, विमा पॉलिसींचे दावे, लाभांश शेअर्श, म्युच्युअल फंड गुंतवणुक यांचा समावेश असू शकतो.
‘Unclaimed Assets Portal’ द्वारे मिळणाऱ्या फायद्यांविषयी बोलायचे झाल्यास, हे पोर्टल व्यक्तींना त्यांच्या दावा न केलेल्या पैशांविषयी किंवा गुंतवणुकीविषयीची माहिती एकाच ठिकाणावरुन शोधण्याची सुविधा देते; ज्यामुळे त्यांना विविध स्वतंत्र संस्थांच्या संकेतस्थळांना भेट देण्याची गरज पडत नाही. यामुळे, स्वतःचे दावा न केलेले निधी किंवा गुंतवणुकीचा शोध घेण्याची प्रक्रिया लक्षणीयरीत्या सोपी आणि सुलभ होणार आहे. त्यासोबत ज्या प्रसंगी कुटुंबातील सदस्यांना एखाद्या दिवंगत व्यक्तीच्या गुंतवणुकीविषयी किंवा बँक खात्यांविषयीची माहिती मिळवणे शक्य होत नाही, अशा वेळी हे पोर्टल अत्यंत महत्त्वाची भूमिका मांडतं. दिवंगत व्यक्तीचे वारसदार देखील या पोर्टलचा वापर करून आपलाclaim दाखल करू शकतात, मात्र त्यासाठी त्यांच्याकडे आवश्यक ती पूरक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
www.unclaimedassetsportal.in या पोर्टलला भेट द्या. या पोर्टलवर तुम्ही तुमचे नाव, PAN, जन्मतारीख किंवा इतर आवश्यक तपशील भरा. त्यानंतर तुम्हाला ‘दावा न केलेल्या मालमत्ते’ बाबतची माहिती मिळवू शकते. त्यानंतर, संबंधित संस्थेमार्फत तुम्ही त्या निधीवर किंवा गुंतवणुकीवर आपला दावा दाखल करू शकता.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, देशभरातील बँका, विमा कंपन्या आणि वित्तीय संस्थांमध्ये सध्या हजारो कोटी रुपयांचा निधी दावाविना पडून आहे. असा निधी, ज्यावर आजवर कोणीही आपला दावा सांगितलेला नाही. हा पैसा त्याच्या खऱ्या मालकांपर्यंत पोहोचावा, हे सुनिश्चित करणे हेच सरकारचे उद्दिष्ट आहे.
पुन्हा वाढल्या… LPG सिलिंडरच्या किमती दुप्पट; जानेवारीपासून 7 वेळा दरवाढ, जाणून घ्या ताजे दर