
Karan Tacker New Project:(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
अभिनेता करण टैकरने स्कॉटलंडमध्ये आपल्या नव्या प्रोजेक्टच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर शूटिंगची पहिली झलक शेअर करत त्याने चाहत्यांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा बिहाइंड द सीन्स फोटो पोस्ट करत करणने एक खास नोटही लिहिली आहे. Karan Tacker New Project:
फोटो शेअर करत करण म्हणाला, “एक नवा प्रोजेक्ट, एक नवं पर्व आणि एक मोठा रिस्क! सध्या जास्त काही सांगू शकत नाही, पण कधी कधी मोठे रिस्कच सर्वात रोमांचक प्रवासाची सुरुवात करतात. अजून बरंच काही समोर येणार आहे.”
करणच्या या पोस्टमधून नव्या प्रोजेक्टच्या शूटिंगची झलक पाहायला मिळाली. प्रोजेक्टबद्दल त्याने अद्याप सस्पेन्स कायम ठेवला असला, तरी त्याच्या कॅप्शनमधून या नव्या सुरुवातीसाठी तो चांगलाच उत्सुक असल्याचं स्पष्ट होतंय. स्कॉटलंडमध्ये कॅमेरा रोल झाला असून, यावेळी करण नेमकं काय नवं घेऊन येणार, याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
Edits Film Festival: इंस्टाग्रामच्या ‘एडिट्स’ अॅपमधून क्रिएटर्सनी दाखवली कमाल; तिघांनी पटकावला विजय
यावेळी करणचा लूकही एकदम बदललेला दिसतोय. वाढलेले केस आणि दाट दाढी, असा त्याचा रफ-टफ अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरतोय. नव्या प्रोजेक्टसोबतच त्याचा हा हटके लूकही चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. मात्र, प्रोजेक्टची कथा आणि इतर कलाकारांबद्दल अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर स्कॉटलंडमधील शूटिंगसोबतच करणच्या हातात आणखी काही प्रोजेक्ट्सही आहेत. त्यामुळे आगामी काळात करण चांगलाच बिझी असणार आहे. आता या नव्या प्रोजेक्टमधून तो कोणता सरप्राइज देणार, हे पाहण्यासाठी चाहत्यांना त्याच्या पुढच्या अपडेटची वाट पाहावी लागणार आहे. कारण सध्या तरी या नव्या प्रोजेक्टचे पत्ते करणने अगदी सेफ ठेवले आहेत!
Ans: करण टैकरच्या नव्या प्रोजेक्टचं शूटिंग स्कॉटलंडमध्ये सुरू आहे.
Ans: त्याने शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा बिहाइंड-द-सीन्स फोटो शेअर केला.
Ans: वाढलेले केस आणि दाट दाढी असलेला रफ-टफ लूक त्याने धारण केला आहे.