Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Credit Card वरील व्याजदर कमी होऊ शकतो? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून वाचवा तुमचे पैसे

क्रेडिट कार्ड्सवर ३० ते ४५ टक्क्यांच्या दरम्यान वार्षिक व्याजदर आकारला जातो. अनेक लोकांना असे वाटते की हा व्याजदर निश्चित असतो आणि त्यात कोणताही बदल करणे शक्य नसते. मात्र बँकेशी योग्य संवाद साधून तो कमी करता येऊ शकतो.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 10, 2026 | 03:20 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Credit Card वरील व्याजदर कमी होऊ शकतो?
  • बँका आपल्या मौल्यवान ग्राहकांना सवलती देतात
  • बँकेसोबत वाटाघाटी करण्याच्या पद्धती
Reduce Your Credit Card Interest Rate : लोक खरेदीपासून ते विजेची बिले भरण्यापर्यंत अशा प्रत्येक गोष्टीसाठी क्रेडिट कार्डचा वापर करतात. पण जर पैसे रिटर्न करण्याची वेळ येते तेव्हा ते वेळेवर भरली गेली नाहीत, तर त्यावर जमा होणारे व्याज अत्यंत अवाढव्य असू शकते. बहुतेक क्रेडिट कार्ड्सवर ३० ते ४५ टक्क्यांच्या दरम्यान वार्षिक व्याजदर आकारला जातो. अनेक लोकांना असे वाटते की हा व्याजदर निश्चित असतो आणि त्यात कोणताही बदल करणे शक्य नसते. मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की, बँकेशी योग्य संवाद साधून, आपण कमी व्याजदरासाठी वाटाघाटी करु शकतो. ते कसं काय? जाणून घेऊयात.

Home Loan Update: घराचं स्वप्न होणार साकार! होम लोनचे व्याजदर घटवले; कोणत्या बँकेत मिळेल सर्वात स्वस्त कर्ज?

बँका आपल्या मौल्यवान ग्राहकांना सवलती देतात

बँका आपल्या मौल्यवान ग्राहकांना काही विशिष्ट सवलती देतात. जर तुम्ही बऱ्याच काळापासून तुमच्या कार्डचा वापर करत असाल आणि सातत्याने वेळेवर रक्कम भरली असतील, तर बँक तुमच्या विनंतीचा विचार करण्यास तयार होण्याची शक्यता असते. पण प्रत्येक वेळीच असे होईल याची कोणतीही हमी नसते. एक भक्कम ‘क्रेडिट स्कोअर’ आणि रक्कम भरण्याची हिस्ट्री या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते.

व्याज कधी आणि कसा आकरला जातो?

तुमच्या बँकेकडून व्याजाचा दर कमी करून घेण्यासाठी, पहिली पायरी म्हणजे तुमच्या क्रेडिट कार्ड खात्याच्या स्थिती समजून घेणं. जर तुम्ही गेल्या ६ ते १२ महिन्यांत सातत्याने आणि वेळेवर payments भरली असतील, तर आता विनंती करण्यासाठी हीच सर्वात योग्य वेळ आहे. पण जर तुम्ही अलीकडेची रक्कम भरण्यात अयशस्वी ठरला असला तर तुमच्या खात्यावर मोठी थकबाकी असेल, तर बँक तुमची विनंती नाकारू शकते. एक ‘चांगला ग्राहक’ असण्याचा फायदा उठवा; बँकेला आठवण करून द्या की तुम्ही त्यांचे दीर्घकाळापासूनचे ग्राहक आहात आणि तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला आहे. अनेक बँका आपल्या दीर्घकालीन ग्राहकांना गमावण्यास नाखुश असतात; त्यामुळे, त्या ठराविक कालावधीसाठी तुमचा व्याजाचा दर कमी करण्यास संमती देऊ शकतात. हे लक्षात ठेवा की, बँक तुमचा व्याजाचा दर नक्कीच कमी करेल याची कोणतीही हमी नसली तरीही, या विषयावर त्यांच्याशी चर्चा करणे निश्चितच फायदेशीर ठरेल.

बँकेसोबत वाटाघाटी करण्याच्या पद्धती

बँकेशी संपर्क साधण्यासाठी, त्यांच्या Customer Care ला कॉल करा. Retention Team किंवा ‘रिलेशनशिप मॅनेजर’ यांच्याशी बोलण्याची विनंती करा. त्यांना स्पष्टपणे सांगा की, तुम्हाला असे वाटते की सध्याचा व्याजदर खूपच जास्त आहे. जर तुम्हाला दुसऱ्या एखाद्या बँकेकडून कमी व्याजदराची ऑफर मिळाली असेल, तर त्याबद्दल आवर्जून उल्लेख करा. जरी तुमचा बँक बदलण्याचा प्रत्यक्ष कोणताही विचार नसला, तरीही हा मुद्दा उपस्थित केल्याने बँकेवर दबाव निर्माण होतो. काही वेळा, बँका काही महिन्यांसाठी व्याजदर कमी करण्यास संमती देतात. काही बँका सध्याच्या कार्डचे रूपांतर कमी व्याजदर असलेल्या नवीन कार्डमध्ये करून घेण्याचा पर्यायही उपलब्ध करून देतात. याव्यतिरिक्त, जर तुमच्या कार्डवर मोठी रक्कम थकीत असेल, तर ती रक्कम EMIsमध्ये रूपांतरित करून घेण्याची सुविधाही तुम्हाला देऊ केली जाऊ शकते.

तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होणारा परिणाम

कमी व्याजदरासाठी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करताना, तुमच्या क्रेडिट स्कोअरची जाणीव ठेवा. वारंवार विनंत्या करणे किंवा रक्कम भरण्यास विलंब करणे यामुळे तुमच्या स्कोअरवर नेगेटिव्ह परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारची चर्चा सुरू करण्यापूर्वी, तुमची कोणतीही थकीत रक्कम वेळेवर पूर्णपणे चुकती करणे महत्त्वाचं ठरते. तुमच्या क्रेडिट कार्डचा वापर जबाबदारीने करा; जर तुम्ही तुमचे बिल दरमहा पूर्णपणे भरले, तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात व्याजाचा भुर्दंड सोसावा लागणार नाही. जर तुम्हाला संपूर्ण रक्कम भरणे शक्य नसेल, तरीही minimum required payment तुम्ही भरली जाईल याची खात्री करा.

जे क्रेडिट कार्ड मोठ्या प्रमाणावर वापरतात

तज्ञांच्या मते, कमी व्याजदर मिळवल्यास दीर्घकाळाच्या दृष्टीने मोठी आर्थिक बचत होऊ शकते. पण थकीत रक्कम साचूच न देणे हीच सर्वात उत्तम रणनीती ठरते. गरज भासल्यास, तुम्ही तुमच्या बँकेच्या websiteवरुन किंवा मोबाईल ॲपद्वारे व्याजदर कमी करून घेण्याचे पर्याय देखील तपासून पाहू शकता. ही पद्धत अशा व्यक्तींसाठी विशेषतः फायदेशीर ठरते, जे क्रेडिट कार्डचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात, परंतु त्यांना वाढीव व्याजदरामुळे निर्माण झालेल्या आर्थिक बोज्याचा सामना करावा लागतो. बँकेशी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने संवाद साधल्यास, तुम्हाला अनेकदा त्यांचे सहकार्य मिळवता येते. लक्षात ठेवा, बँका आपल्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यास नेहमीच उत्सुक असतात; त्यामुळे, जर तुमचा payment history उत्तम असेल, तर यासाठी प्रयत्न करणे नक्कीच फायदेशीर ठरेल. असे केल्याने तुमचे मासिक खर्च कमी होण्यास मदत होईल आणि तुमच्या क्रेडिट कार्डच्या वापराचे व्यवस्थापन करणे अधिकच सुलभ होईल.

Income Tax Saving: तुमची कारही वाचवू शकते टॅक्स! फार कमी लोकांना माहिती आहे पैसे वाचवण्याचं ‘हे’ सिक्रेट

Web Title: How to reduce credit card interest rate tips and tricks marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • bank RBI
  • Business News
  • Credit Card Rules
  • emi
  • Interest rate
  • Marathi News

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
2

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
4

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.