Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ITR Verification:करदात्यांनो, सावधान! ITR फाइल केलं, पण व्हेरिफाय नाही? जाणून घ्या ‘या’ Steps

ITR Verification: देशभरात आयकर विवरणपत्र (ITR) भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून लाखो करदाते वेळेत रिटर्न दाखल करत आहेत. मात्र, ITR सबमिट केल्यानंतर ई-व्हेरिफिकेशन करणे ही अंतिम आणि अत्यावश्यक प्रक्रिया आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 23, 2026 | 01:05 PM
ई-व्हेरिफिकेशन (E-verification) (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

ई-व्हेरिफिकेशन (E-verification) (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ITR भरल्यानंतर ई-व्हेरिफिकेशन अनिवार्य
  • ऑनलाइन अनेक सोपे पर्याय उपलब्ध
  • व्हेरिफिकेशन न केल्यास अडचणी
ITR E-Verification Guide: आयकर विवरणपत्र (ITR) भरण्याचा हंगाम सुरू असून देशभरातील लाखो करदाते आपले रिटर्न वेळेत दाखल करत आहेत. मात्र, अनेकांना असे वाटते की ITR सबमिट केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण झाली. प्रत्यक्षात तसे नसते. रिटर्न भरल्यानंतर त्याची ई-व्हेरिफिकेशनद्वारे (E-verification) पडताळणी करणे तितकेच महत्त्वाचे असते. ही अंतिम प्रक्रिया पूर्ण न झाल्यास तुमचे ITR वैध मानले जात नाही.

यामुळे भविष्यात अनावश्यक अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणूनच ITR भरल्यानंतर ई-व्हेरिफिकेशन झाले आहे की नाही, याची खात्री करणे प्रत्येक करदात्याचे पाहिले काम आहे. (ITR Verification)

ई-व्हेरिफिकेशन (E-verification) का आहे इतके महत्त्वाचे?

आयकर विभागाच्या नियमांनुसार, ITR दाखल केल्यानंतर ठराविक कालावधीत त्याची ऑनलाइन पडताळणी करणे बंधनकारक आहे. जर ही प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली नाही, तर रिटर्न अपूर्ण समजले जाऊ शकते.

अनेक करदाते रिटर्न भरल्यानंतर आपले काम संपले असं समजतात, मात्र हे दर्लुक्ष पुढे पहिल्यापासूनची सुरुवात असू शकते.त्यामुळे रिटर्न सबमिट केल्यानंतर ई-व्हेरिफिकेशनला प्राधान्य देणे गरजेचे आहे.

काही मिनिटांत पूर्ण होते संपूर्ण प्रक्रिया

ई-व्हेरिफिकेशन करण्यासाठी कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. आपल्या मोबाईल किंवा संगणकाच्या मदतीने काही मिनिटांत ही प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करता येते. करदात्यांच्या सोयीसाठी आयकर विभागाने अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या सुविधेनुसार योग्य पद्धतीची निवड करू शकतो.

आधार OTP हा सर्वात सोपा पर्याय

सर्वाधिक वापरली जाणारी पद्धत म्हणजे आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर येणारा वन-टाइम पासवर्ड (OTP). यासाठी पॅन आणि आधार एकमेकांशी लिंक असणे तसेच आधारशी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. OTP टाकताच काही सेकंदांत ई-व्हेरिफिकेशन पूर्ण होते. ही पद्धत जलद, सुरक्षित आणि वापरण्यास सोपी मानली जाते.

Stock Market: IPO बाजारात पुन्हा उत्साह! आज तीन मोठ्या कंपन्यांची एंट्री; गुंतवणूकदारांचे लक्ष कुठे? 

Stock Market: IPO बाजारात पुन्हा उत्साह! आज तीन मोठ्या कंपन्यांची एंट्री; गुंतवणूकदारांचे लक्ष कुठे?

नेट बँकिंग (Net Banking) आणि EVC चा पर्यायही उपलब्ध

ज्यांच्याकडे इंटरनेट बँकिंग सेवा सुरू आहे, ते आपल्या बँकेच्या खात्यात लॉगिन करून थेट आयकर विभागाच्या पोर्टलवर जाऊन ई-व्हेरिफिकेशन करू शकतात. मात्र, बँक खाते आणि पॅनची माहिती योग्यरीत्या नोंदलेली असणे आवश्यक आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड (EVC) वापरूनही पडताळणी करता येते. हा कोड नोंदणीकृत बँक खाते किंवा इतर अधिकृत माध्यमातून मिळतो. कोड पोर्टलवर भरल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होते.

काही करदाते डिमॅट खात्याच्या माध्यमातूनही ही सुविधा वापरू शकतात. तसेच व्यावसायिक आणि काही संस्थांसाठी डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट (DSC) वापरण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

ई-व्हेरिफिकेशन कसे करावे?

सर्वप्रथम आयकर विभागाच्या अधिकृत ई-फायलिंग पोर्टलवर लॉगिन करावे. त्यानंतर ई-व्हेरिफिकेशनचा पर्याय निवडून आवश्यक माहिती भरावी. यामध्ये पॅन क्रमांक, मूल्यांकन वर्ष (Assessment Year), रिटर्नचा पोच क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील भरल्यानंतर पडताळणी पूर्ण करता येते.

काही प्रकरणांमध्ये लॉगिन न करताही केवळ पोच क्रमांकाच्या मदतीने ही प्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.

शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहू नका

करतज्ज्ञांच्या मते, ITR भरल्यानंतर ई-व्हेरिफिकेशन पुढे ढकलणे टाळावे. अनेकजण ही प्रक्रिया विसरतात किंवा अंतिम तारखेची वाट पाहतात. त्यामुळे नंतर रिटर्नशी संबंधित अडचणी निर्माण होण्याची शक्यता वाढते.

 Elon Musk ला एका दिवसात तब्बत $44000000000 नुकसान, धाडकन कोसळले Tesla आणि SpaceX चे शेअर्स! 

वेळेत पडताळणी केल्यास रिटर्नची प्रक्रिया सुरळीत पूर्ण होते आणि पुढील टप्प्यांमध्ये कोणताही अडथळा येत नाही. त्यामुळे ITR दाखल केल्यानंतर ई-व्हेरिफिकेशन पूर्ण झाले आहे याची खात्री करणे ही प्रत्येक करदात्याची महत्त्वाची जबाबदारी आहे.

Web Title: How to verify your income tax return online after filing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 01:05 PM

Topics:  

  • Business News
  • ITR File

संबंधित बातम्या

SPJIMR FT MiM Ranking : जगभरातील टॉप 50 बिझनेस स्कूल्समध्ये भारतीय संस्थांचा डंका! SPJIMR ने मिळवले 26 वे स्थान; पाहा काय आहे खास?
1

SPJIMR FT MiM Ranking : जगभरातील टॉप 50 बिझनेस स्कूल्समध्ये भारतीय संस्थांचा डंका! SPJIMR ने मिळवले 26 वे स्थान; पाहा काय आहे खास?

भारतात AI चा तुफान वापर ! कंपन्यांचा मोठा विश्वास… 2027 पर्यंत IT बजेटचा 20% हिस्सा AI कडे जाणार; सर्व्हिसनाऊच्या अहवालात काय?
2

भारतात AI चा तुफान वापर ! कंपन्यांचा मोठा विश्वास… 2027 पर्यंत IT बजेटचा 20% हिस्सा AI कडे जाणार; सर्व्हिसनाऊच्या अहवालात काय?

ASUS इंडियाचा मोठा निर्णय! MSME क्षेत्रासाठी राजीव तलरेजा यांची ‘Mentor’ म्हणून नियुक्ती
3

ASUS इंडियाचा मोठा निर्णय! MSME क्षेत्रासाठी राजीव तलरेजा यांची ‘Mentor’ म्हणून नियुक्ती

Inspiring Story: अपंगत्वाला हरवून ‘या’ फळांच्या शेतीतून कोट्यवधींची कमाई! ६२ वर्षीय शेतकऱ्याला राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री
4

Inspiring Story: अपंगत्वाला हरवून ‘या’ फळांच्या शेतीतून कोट्यवधींची कमाई! ६२ वर्षीय शेतकऱ्याला राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.