Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

परदेशातील मंदीचा भारतीय आयटी क्षेत्रावर परिणाम

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 27, 2022 | 11:32 AM
परदेशातील मंदीचा भारतीय आयटी क्षेत्रावर परिणाम
Follow Us
Close
Follow Us:

 

नवी दिल्ली : देशाच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) आघाडीच्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे बोनस घटवले आहेत किंवा काही काळासाठी बोनस देणे लांबणीवर टाकले आहे. या कंपन्यांच्या अमेरिका आणि युरोपातील ग्राहक कंपन्यांनी आपले व्यवसायविषयक अंदाजपत्रकाला कात्री लावली आहे. या दोन्ही प्रदेशांमध्ये मंदीचे सावट असल्यामुळे तेथील अनेक कंपन्यांनी तंत्रज्ञानाधिष्ठित व्यवसायविस्तार लांबणीवर टाकला आहे. त्याचा परिणाम म्हणून भारतातील आयटी कंपन्यांच्या उत्पन्नावर ताण येत आहे.

अमेरिका आणि युरोप येथील कंपन्यांना कोरोना काळात मोठा फटका बसल्यानंतर आता कुठे या कंपन्या नफा अनुभवत होत्या. मात्र, भूराजकीय अशांतता आणि यामुळे निर्माण होऊ घातलेल्या मंदीमुळे या कंपन्यांच्या नफ्यावर सध्या विपरित परिणाम होत आहे. परिणामी इन्फोसिस आणि विप्रो या आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या ‘व्हेरिएबल पे’मध्ये कपात केली आहे. काही भारतीय कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतन पॅकेजचा भाग म्हणून व्हेरिएबल पे देतात. हा व्हेरिएबल पे संबंधित कर्मचारी आणि संबंधित कंपनीच्या वर्षभरातील कामगिरीवरून ठरवला जातो. असे व्हेरिएबल पे कमी केल्याचे तसे संदेश या कंपन्यांच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे पाठवल्याचे एका वृत्तसंस्थेने नमूद केले आहे.

कंपन्यांकडून खर्च कमी करण्याचा प्रयत्न
आगामी काळात जागतिक मंदी येणार असून त्यासाठी आपण तयारीत रहायला हवे, ही भावना सध्या उद्योगजगतामध्ये वाढत आहे. त्यामुळे कंपन्या सर्वप्रथम आपले खर्च कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत. यामुळे साहजिकच व्यवसायविस्तार लांबणीवर टाकला जाण्याची किंवा त्यासाठी तंत्रज्ञानविषयक खर्चाला कात्री लावली जाण्याची दाट शक्यता आहे. असे प्रकार जगभरातील कंपन्यांकडून सुरू झाले आहेत, असे निरीक्षण एव्हरेस्ट ग्रुप या अमेरिकेतील सल्लागार संस्थेचे मुख्य कार्यकारी यांनी नोंदवले आहे.

Web Title: Impact of overseas recession on indian it sector nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2022 | 11:32 AM

Topics:  

  • India news
  • Navrashtra
  • navrashtra news
  • updated news

संबंधित बातम्या

Delhi Blast Photos: बॉम्बस्फोटानंतर हादरली दिल्ली, मेट्रोच्या खिडक्या तुटल्या, वाहनांचे तुकडे झाले… फोटो पाहून तुमचाही उडेल थरका
1

Delhi Blast Photos: बॉम्बस्फोटानंतर हादरली दिल्ली, मेट्रोच्या खिडक्या तुटल्या, वाहनांचे तुकडे झाले… फोटो पाहून तुमचाही उडेल थरका

Delhi Blast: दिल्ली किल्ल्याजवळ पुन्हा एकदा झाला मोठा ब्लास्ट! आतापर्यंत कधी – कधी हादरली दिल्ली? वाचा संपूर्ण घटनाक्रम
2

Delhi Blast: दिल्ली किल्ल्याजवळ पुन्हा एकदा झाला मोठा ब्लास्ट! आतापर्यंत कधी – कधी हादरली दिल्ली? वाचा संपूर्ण घटनाक्रम

Kolhapur : आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाचं महत्वपूर्ण पाऊल; इचलकरंजीमध्ये ईएसआय मल्टिस्पेशालिटी रुग्णालय
3

Kolhapur : आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाचं महत्वपूर्ण पाऊल; इचलकरंजीमध्ये ईएसआय मल्टिस्पेशालिटी रुग्णालय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.