Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जोर का झटका…’, RBI कडून रेपो दरात वाढ, कार व गृहकर्ज पुन्हा महागणार; कसा फरक पडणार तुमच्या बजेटवर? वाचा…

रेपो रेट वाढल्याने याचा परिणाम गृहकर्ज, वाहन कर्ज यावर होणार आहे, तर वैयक्तिक कर्जाच्या EMI (हफ्ते) यावर देखील परिणाम जाणवणार आहे. त्यामुळं सामान्यांना झटका बसणार आहे. मे 2022 पासून रेपो रेटमध्ये आतापर्यंत 2.25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Feb 08, 2023 | 11:37 AM
‘जोर का झटका…’, RBI कडून रेपो दरात वाढ, कार व गृहकर्ज पुन्हा महागणार; कसा फरक पडणार तुमच्या बजेटवर? वाचा…
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई– आरबीयने पुन्हा एकदा सामान्यांना झटका दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikant Das) यांनी बुधवारी यंदाचं (8 फेब्रुवारी) पतधोरण जाहीर केलं आहे. या नव्या पतधोरणामुळे आता सर्वसामान्यांना ‘जोर का झटका…’ लागला आहे. आरबीआयने यंदा रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ केल्याची घोषणा केली आहे. रेपो रेटमध्ये (Repo Rate) सलग सहाव्यांदा दरवाढ केली आहे. यामुळे रेपो रेट आता 6.50 टक्के झाला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये (Repo Rate) 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये सलग सहाव्यांदा वाढ केली आहे. यानंतर रेपो रेट 6.25 टक्क्यांवरुन 6.50 टक्के झाला आहे. या धोरणाची घोषणा करताना आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, महागाई हा देशातील चिंतेचा विषय आहे. (Repo Rate Increase)

रेपो रेटचा बजेटवर फरक पडणार…

दरम्यान, रेपो रेट वाढल्याने याचा परिणाम गृहकर्ज, वाहन कर्ज यावर होणार आहे, तर वैयक्तिक कर्जाच्या EMI (हफ्ते) यावर देखील परिणाम जाणवणार आहे. त्यामुळं सामान्यांना झटका बसणार आहे. मे 2022 पासून रेपो रेटमध्ये आतापर्यंत 2.25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. रेपो रेट मध्ये वाढ झाल्याने कर्जाचा हफ्ताही महागतो. यामुळे जर तुम्ही फ्लोटिंग रेटवर गृह कर्ज किंवा इतर कोणतंही कर्ज घेतलं असेल तर त्याचा ईएमआय वाढेल. दुसरीकडे रेपो रेटमध्ये वाढ झाल्यांतर बँक एफडीसह इतर ठेवींवर अधिक व्याज देऊ शकतात म्हणजेच ठेवींचे दर वाढू शकतात.

रेपो रेट म्हणजे काय?

अनेकांना प्रश्न पडतो की, रेपो रेट म्हणजे काय? किंवा यामुळं आपल्या बजेटवर याचा काय परिणाम पडतो. ज्या दराने बँका रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेते त्या दराला रेपो दर (Repo Rate) म्हणतात. रेपो दर वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणे. तर, रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. याचाच अर्थ आरबीआयने रेपो दरात वाढ केली तर सामान्यांच्या कर्जात वाढ होते. अर्थात तुमच्या व्याजदरात व हफ्तामध्ये वाढ होते.

Web Title: Increase in repo rate from rbi car and home loans will become expensive again how will it affect your budget read

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2023 | 11:37 AM

Topics:  

  • Budget
  • RBI
  • Repo Rate

संबंधित बातम्या

ATM Safety Facts: एटीएममधील ‘Cancel’ बटण दोनदा दाबल्याने PIN सुरक्षित राहतो का? जाणून घ्या सत्य!
1

ATM Safety Facts: एटीएममधील ‘Cancel’ बटण दोनदा दाबल्याने PIN सुरक्षित राहतो का? जाणून घ्या सत्य!

UPI Payment Error: UPI पेमेंट फेल? नेटवर्क, सर्व्हर डाऊन की सुरक्षा अलर्ट — जाणून घ्या खरे कारण
2

UPI Payment Error: UPI पेमेंट फेल? नेटवर्क, सर्व्हर डाऊन की सुरक्षा अलर्ट — जाणून घ्या खरे कारण

Dormant Account Activation: तुमचे खाते बंद झालेय? पुन्हा सक्रिय करण्यासाठी वाचा ही माहिती
3

Dormant Account Activation: तुमचे खाते बंद झालेय? पुन्हा सक्रिय करण्यासाठी वाचा ही माहिती

How to open a Bank: बँक उघडण्यासाठी किती पैसे लागतात? एखादा उद्योगपती बँक उघडू शकतो का?
4

How to open a Bank: बँक उघडण्यासाठी किती पैसे लागतात? एखादा उद्योगपती बँक उघडू शकतो का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.