Mukhyamantri Mahila Rojgar Yojana (फोटो- सोशल मीडिया)
Mukhyamantri Mahila Rojgar Yojana Bihar: नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत ‘M’ फॅक्टर म्हणजेच महिला मतदारांनी एनडीएला भरघोस मतांनी जिंकवले. बिहार सरकारने बिहार निवडणुकीपूर्वी महिलांसाठी जीविका निधी योजनेअंतर्गत 10 हजार रुपये महिलांच्या खात्यात हस्तांतरित केले. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीत NDAचा ऐतिहासिक विजय झाल्याचे म्हंटले जात आहे. या निवडणुकीत महागठबंधनचा दारुण पराभव झाला.
एनडीए या निवडणूक विजयी होणार अशी कल्पना होती मात्र, इतक्या विशाल त्सुनामीची कल्पना कोणी सुद्धा करू शकले नाही. एनडीएच्या या बहुमताचे अनेक पैलूंचा अभ्यास करण्यात येत आहे. महिलांचे मतदान हा महत्वाचा मुद्दा या निवडणुकीत मानण्यात येत आहे. पहिल्यांदाच बिहारमध्ये पुरुषांपेक्षा महिलांनी जास्त मतदान केले आहे.
हेही वाचा : Gautam Adani : बिहार निवडणुकीत अदानींचे नाव चर्चेत, निकालानंतर फायदा झाला की तोटा?
‘M Factor’ ने पलटला खेळ!
बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या निकालाने सिद्ध केले की ‘M’ फॅक्टर म्हणजेच महिला फॅक्टर चालतो. बिहारमध्ये एनडीएच्या विजयाचे श्रेय पूर्णपणे महिला मतदारांना जाते. कारण या निवडणुकीत महिला मतदारांच्या मतदानामुळे निवडणुकीत पूर्ण खेळच पलटला. महिलांसाठी जीविका निधी योजनेअंतर्गत 10 हजार रुपयांच्या योजनेने महत्वाची भूमिका निभावली. जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन या योजनेने एनडीएला पाठिंबा देण्यासाठी महिलांना भाग पाडले.
मुख्यमंत्री महिला रोजगार योजना
बिहारमधील नितीश कुमार सरकारने राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्राप्रमाणे बिहार मुख्यमंत्री रोजगार योजना घोषित केली. या योजने अंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा हेतु होता. बिहार सरकारने महिलांना स्वतःचे लहान-सहान व्यवसाय सुरू करता यावे म्हणून 10 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले. 2 लाख रुपयेपर्यंत अनुदानाची मर्यादा आहे. निवडणुकीच्या काही महिन्यांआधीच त्याअंतर्गत 7.5 दशलक्ष महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये खात्यात जमा करण्यात आले. बिहार सरकारने 18 प्रकारच्या लघु व्यवसायांमध्ये या योजनेअंतर्गत मदत केली. एखाद्या महिलेने व्यवसाय सहा महिन्यांपर्यंत सुरू ठेवले तर 2 लाख रुपयांपर्यंत मदत देण्याची सुद्धा या योजनेत तरतूद करण्यात आली आहे.
हेही वाचा : SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! ३० नोव्हेंबरपासून ही सेवा होणार बंद
नीतीश कुमार यांनी सत्तेत असताना अनेक महिलांसाठी विविध उपोययोगी योजना काढल्या. ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांसाठी 50% आरक्षणाची हमी सुद्धा दिली. NDA ने आश्वासन देऊन ती पूर्ण केली. मात्र, महागठबंधनने आश्वासन देऊन ते पूर्ण केले नाही.






