Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Israel Iran War : तेल आणि गॅससाठी भारत इतर देशांवर किती अवलंबून ? २०२४-२५ च्या आकडेवारीवारी समोर

ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारत कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि एलपीजीच्या आयातीवर अधिकाधिक अवलंबून आहे. पूर्वी, भारत रशिया, इराक आणि कतारसारख्या देशांकडून हा पुरवठा आयात करत असे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 21, 2026 | 12:11 PM
तेल आणि गॅससाठी भारत इतर देशांवर किती अवलंबून ? २०२४-२५ च्या आकडेवारीवारी समोर

तेल आणि गॅससाठी भारत इतर देशांवर किती अवलंबून ? २०२४-२५ च्या आकडेवारीवारी समोर

Follow Us
Follow Us:

मध्यपूर्वेत इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलवाहू जहाजांच्या वाहतुकीवरील निर्बंध हे त्यापैकीच एक कारण आहे. याचा परिणाम भारतातही जाणवत आहे. २० मार्च रोजी, भारतात प्रीमियम पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ₹२.०९ ने वाढ करण्यात आली. ‘काळे सोने’ म्हणून ओळखले जाणारे तेल, दैनंदिन गरजांचा एक भाग आहे. त्याचा उपयोग स्वयंपाक, वाहनांसाठी इंधन आणि इतर अनेक कामांसाठी होतो. चला तर मग, भारताची तेलाची परिस्थिती आणि या गरजा कशा पूर्ण केल्या जातात? जाणून घ्या सविस्तर बातमी…

भारताच्या तेल आयातीत लक्षणीय बदल झाला आहे. फेब्रुवारीमध्ये, इराकने रशियाला मागे टाकून भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार बनण्याचा मान मिळवला. तथापि, तज्ञांच्या मते मार्चमध्ये रशिया पुन्हा अव्वल स्थान मिळवू शकतो. फेब्रुवारीमध्ये रशियाकडून होणारी तेल आयात ३२ टक्क्यांनी घटून दररोज अंदाजे १० लाख बॅरलवर आली. तसेच भारत आपल्या ऊर्जेच्या गरजांसाठी कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षातील नवीनतम आकडेवारीनुसार..

1 एप्रिलपासून ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलणार! ‘या’ बँकेने केले मोठे बदल

१. कच्च्या तेलाची आयात

आयातीवरील अवलंबित्व: भारत आपल्या एकूण कच्च्या तेलाच्या गरजेपैकी अंदाजे ८५% ते ८८% तेल परदेशातून आयात करतो. आयातीचे प्रमाण: २०२३-२४ या आर्थिक वर्षात, भारताने २३२.५ दशलक्ष मेट्रिक टन (एमएमटी) कच्च्या तेलाची आयात केली. दैनंदिन वापर: भारताचा दैनंदिन कच्च्या तेलाचा वापर अंदाजे ५.५ दशलक्ष बॅरल आहे. मुख्य पुरवठादार देश: भारत प्रामुख्याने रशिया (अंदाजे ३७-४०%), इराक (२१%), सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) कडून तेल खरेदी करतो.

२. नैसर्गिक वायूची आयात

एकूण वापर: भारताचा नैसर्गिक वायूचा एकूण वापर दररोज अंदाजे १८९ दशलक्ष घनमीटर आहे. आयातीवरील अवलंबित्व: भारताच्या वायूच्या गरजेपैकी ५०% पेक्षा जास्त गरज आयातीद्वारे (एलएनजीच्या स्वरूपात) पूर्ण केली जाते.

देशांतर्गत उत्पादन: देशांतर्गत दररोज अंदाजे ९७.५ दशलक्ष घनमीटर वायूचे उत्पादन होते.

एलएनजीचे मुख्य स्रोत: भारत आपल्या द्रवीकृत नैसर्गिक वायूच्या (एलएनजी) सुमारे ४७-५०% कतारमधून आयात करतो. संयुक्त अरब अमिरात (UAE), अमेरिका आणि ओमान हे देखील प्रमुख स्रोत आहेत.

३. द्रवीकृत वायू (एलपीजी) आयात

भारत आपल्या एलपीजी वापराच्या सुमारे ६०% आयात करतो. या आयातीपैकी सुमारे ९०% आयात होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे होते.

Todays Gold-Silver Price: खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सोने स्वस्त, चांदीही घसरली; खरेदीची संधी सोडू नका

Web Title: India energy import dependency crude oil gas lpg news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • crude oil
  • LPG
  • US-Israel Iran War

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.