Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Japan Trade : डॉलरला बायबाय? आता थेट रुपया-येनमध्ये होणार व्यवहार? भारत-जपानचा नवा फॉर्म्युला

India-Japan Trade : जपानच्या पंतप्रधान साने ताकाइची १६ व्या भारत-जपान शिखर परिषदेसाठी तीन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी त्या पंतप्रधान मोदींसोबत रुपया-येनमझध्ये व्यापारासंदर्भात मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 01, 2026 | 10:56 AM
India-Japan Trade

India-Japan Trade

Follow Us
Follow Us:
  • भारत-जपानमध्ये रुपया-येनमध्ये व्यापाराची तयारी
  • PM मोदी आणि ताकाइची बैठकी घोषणा होणार?
  • जाणून घ्या सविस्तर
India-Japan Trade News in Marathi : नवी दिल्ली/टोकियो : भारत आणि जपानमधील आर्थिक सहकार्याला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही देश अमेरिकन डॉलरऐवजी थेट भारतीय रुपया आणि जपानी येनमध्ये व्यापार करण्याची तयारी करत आहे. जपानच्या पंतप्रधान साने ताकाइची तीन दिवसीय भारत दौऱ्यावर १६ व्या भारत-जपान वार्षिक परिषदेसाठी येणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यापाराविषयी महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे.

India Indonesia Relations : चीनला झटका! इंडोनिशायाची भारताच्या डिजिटल मॉडेलला पसंती; PM मोदींच्या दौऱ्यात होणार ऐतिहासिक करार?

साने ताकाइची यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे. त्या १६ व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी येत असून या परिषदेत व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सेमीकंडक्टर्स, कृत्रिम बुद्धमत्ता (AI) ऑटोमोबाइल्स, पुरवठा साखळी आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

रुपया-येनमध्ये थेट व्यापार सुरु होणार

भारत आणि जपानमधील व्यापार रुपया-येनमध्ये सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास दोन्ही देशांत स्थानिक तलनात व्यवहारासाठी औपचारिक यंत्रणा उभारली जाईल. यानुसार, जपानी कंपन्या थेट रुपये आणि येनमध्ये व्यवहारासाठी भारतीय बँकांमध्ये विशेष खाती उघडू शकते. यामुळे डॉलर किंवा तिसऱ्या देशाच्या बँकेची गरज भासणार नाही.

यामुळे परकीय तलन विनिमयाचा खर्चही कमी होईल, व्यवहार जलद गतीने होईल. यामुळे दोन्ही देशांतील व्यावसायिकांचे वेळ आणि खर्च दोन्ही वाचेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याचा उद्देश 

या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास आंतरराष्ट्रीय व्यापारात डॉलरवरील अवलंबित्व कमी करुन स्थानिक चलनांचा वापर वाढविण्याचा दोन्ही देशांचा उद्देश आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला बळ मिळेल अशी आशा आहे.

२०२५ मध्ये पायाभरणी

या प्रस्तावावर ऑगस्ट २०२५ मध्ये पंतप्रधान मोदींच्या जपान दौऱ्यात सहमती देण्यात आली होती. दोन्ही देशांनी दहा वर्षांसाठी दोन्ही देश संयुक्त दृष्टीकोन पत्र जाहीर करत स्थानिक चलनातील व्यापाराला चालना देण्यावर भर दिला होता. आता पंतप्रधान ताकाइची यांच्या भारत दौऱ्यावर याच्या अंमलबजावणीच्या तयारीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

भारत-जपान व्यापार

जपान हा भारतातील पाचवा सर्वात मोठा गुतंवणूकदार आहे. भारत आणि जपानमधील व्यापाराला गेल्या काही काळात गती मिळाली असून २०२५-२६ वर्षात आर्थिक द्विपक्षीय व्यापार २७.५ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. भारतात सुमारे १,४०० जपानी कंपन्या कार्यरत आहेत.

जपानने येत्या काळात भारतात ६१ अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जपान मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासह अनेक मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्येही गुंतवणूक करत आहे.

भारताचे रुपयात व्यापार वाढवण्याचे लक्ष्य

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सध्या ३० देशांतील १२३ परदेशी बँकासाठी भारतातील २६ बँकांमध्ये १५६ विशेष रुपया वोस्त्रो खाती उघडण्यात आली आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकने २०२२ पासून स्पेशल रुप वोस्त्रो खातीची व्यवस्थाही सुरु केली आहे. याचा हेतू रुपयातील आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देणे आहे.

Pak-Afghan Conflict : पाक-अफगाण तणाव शिगेला! हल्ले-प्रतिहल्ले सुरुच; तालिबानकडून ISIS च्या ठिकाणांना लक्ष्य?

Web Title: India japan trade rupee yen local currency deal pm modi sane takaichi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 10:48 AM

Topics:  

  • Japan
  • Trade News
  • World news

संबंधित बातम्या

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू
1

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू

World News :आता तरी युद्ध थांबेल का ? इराणचा पुन्हा अमेरिकेला कतार मार्फत शांततेचा प्रस्ताव
2

World News :आता तरी युद्ध थांबेल का ? इराणचा पुन्हा अमेरिकेला कतार मार्फत शांततेचा प्रस्ताव

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
3

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत
4

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.