Pak-Afghan Conflict : पाक-अफगाण तणाव शिगेला! हल्ले-प्रतिहल्ले सुरुच; तालिबानकडून ISIS च्या ठिकाणांना लक्ष्य? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
तालिबान सरकारच्या म्हणण्यानुसार, अफगाणिस्तान नागरिकांवर हल्ल्याचा कट रचला जात अशल्याची माहिती त्यांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या हल्ल्यांत अनेक दहशतवाद्यांना ठार करण्यात आले असल्याचे तालिबानने म्हटले. तसेच नागरिकांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचेही तालिबानने सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, खैबर पख्तूनख्वा प्रदेशातील सरान परिसरात दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले करण्यात आल्याचा दावाही तालिबानने केला आहे.
दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेत घुसून हवाई हल्ले केले होते. पाकिस्तानने हा हल्ला कराचीवरील हल्ल्याला प्रत्युत्तर असल्याचे म्हटले. रविवारी (२९ जून) च्या मध्यरात्री तालिबानच्या दहशतवादी संघटनेविरोधात ही मोहिम राबवण्यात आली असल्याचे पाकिस्तानने म्हटले.
संयुक्त राष्ट्रांनी या हल्ल्यात किमान २८ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले तर, अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने ३८ जणांचा बळी गेल्याचे दावा केला आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आह.
पाकिस्ताने आरोप केला आहे की, अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार काही दहशतवादी संघटनांना आश्रय देत आहे. परंतु तालिबानने हे आरोप फेटाळत दहशतवाद ही पाकिस्तानची अंतर्दत समस्या असल्याचे म्हटले आहे. परंतु हा वाद नवीन नाही. गेल्या काही वर्षांपासून दोन्ही देशांत ड्युरंड रेषेवरुनही वाद सुरु आहे. सध्या नुकत्याच झालेल्या हल्लयानंतर हा तणाव आणखी वाढू शकतो ज्याचा सीमावर्ती भागातील परिस्थितीवर परिणाम होऊ शकतो.
भारताने अफगाण-पाकिस्तान हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अफगाणिस्तानवरील पाकिस्तानच्या हल्लयांचा निषेध केला. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, कोणत्याही सार्वभौम देशाच्या सीमेत घुसून केलेली कारवाई प्रादेशित स्थिरतेसाठी धोकादायक असल्याचे म्हटले.






