Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टीवर दबाव राहण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिला ‘या’ शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला

Share Market Update: जागतिक घडामोडींचा परिणाम आता भारतीय शेअर बाजारावरही दिसून येत आहे. अमेरिका-इराण शांतता चर्चेमुळे गुंतवणूकदार सावध झाले असून आज शेअर बाजारात मोठी चढ-उतार पाहायला मिळू शकते. तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना काही शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 29, 2026 | 08:34 AM
Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टीवर दबाव राहण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिला ‘या’ शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टीवर दबाव राहण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिला ‘या’ शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका-इराण चर्चांमुळे आज २९ मे रोजी भारतीय शेअर बाजारात अस्थिरता आणि गॅप-डाउन सुरुवातीची शक्यता वर्तवली जात आहे.
  • तज्ज्ञांनी आयडीएफसी फर्स्ट बँक, इंडियन हॉटेल्स, ओला इलेक्ट्रिक, जीएमआर पॉवर सह अनेक शेअर्स खरेदीसाठी सुचवले आहेत.
  • गुंतवणूकदारांनी आज रिलायन्स, आयआरईडीए, एशियन पेंट्स, इंडिगो आणि ग्लेनमार्क फार्मा सारख्या शेअर्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
India Share Market Update: अमेरिका-इराण शांतता कराराबाबत सुरु असलेल्या चर्चांमुळे गुंतवणूकदारांनी सावध भुमिका घेतली आहे. या परिस्थितीचा विचार करता आज शुक्रवारी, २९ मे रोजी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, अस्थिर राहण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-डाउन सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजिंगपेक्षा जवळपास १०९ पॉइंट्सच्या डिस्काउंटवर, सुमारे २३,८८७ च्या पातळीवर ट्रेड करत होता.

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरातील चढउतार सुरुच! 1 तोळा खरेदीसाठी करावा लागणार इतका खर्च

बकरी ईदमुळे गुरुवारी शेअर बाजाराला सुट्टी होती आणि बीएसई व एनएसई बंद होते. बुधवारी, भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रात घसरण झाली, मात्र बेंचमार्क निफ्टी ५० २३,९०० च्या पातळीच्या वर टिकून राहिला. सेन्सेक्स १४१.९० अंकांनी, म्हणजेच ०.१९ टक्क्यांनी घसरून ७५,८६७.८० वर बंद झाला, तर निफ्टी ५० ६.५५ अंकांनी, म्हणजेच ०.०३ टक्क्यांनी घसरून २३,९०७.१५ वर स्थिरावला. बुधवारी बँक निफ्टी २३९.०५ अंकांनी, म्हणजेच ०.४३% ने घसरून ५४,८५३.८५ वर बंद झाला.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

निओट्रेडरचे सह-संस्थापक आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे राजा व्यंकटरमण यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच शेअर्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड, कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड, इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड, नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड आणि प्रीमियर एनर्जीज लिमिटेड यांचा समावेश आहे. प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी निवडलेल्या स्टॉक्समध्ये जीएमआर पॉवर, पाइन लॅब्स आणि बीएफ युटिलिटीज यांचा समावेश आहे.

EPFO New Rules: नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! PF चे 100% पैसे UPI द्वारे काढता येणार? EPFO चे नवे नियम काय सांगतात?

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी वेल्सपन कॉर्प, ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी, ग्रॅन्युल्स इंडिया, चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि आयडीएफसी फर्स्ट बँक या स्टॉक्सची निवड केली आहे. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार एशियन पेंट्स, इंडिगो, ग्लेनमार्क फार्मा, एनएमडीसी, आयआरईडीए, रिलायन्स इंडस्ट्रीज, झायडस लाइफसायन्सेस, ऑईल इंडिया, अशोक लेलँड, गॉडफ्रे फिलिप्स इंडिया, पतंजली फूड्स, जीएमआर विमानतळ, फिजिक्सवाला, भारत डायनॅमिक्स या शेअर्सवर लक्ष ठेऊ शकतात.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Indian share market at 29 may 2026 open weak today experts suggest these stocks to buy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 08:34 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजारावर दबाव; कशी होणार आजची सुरुवात? जाणून घ्या सविस्तर
1

Share Market Today: जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजारावर दबाव; कशी होणार आजची सुरुवात? जाणून घ्या सविस्तर

Elon Musk ला एका दिवसात तब्बत $44000000000 नुकसान, धाडकन कोसळले Tesla आणि SpaceX चे शेअर्स!
2

Elon Musk ला एका दिवसात तब्बत $44000000000 नुकसान, धाडकन कोसळले Tesla आणि SpaceX चे शेअर्स!

Share Market Today: गिफ्ट निफ्टीचे नकारात्मक संकेत; इंट्राडे ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी केली ‘या’ शेअर्सची शिफारस
3

Share Market Today: गिफ्ट निफ्टीचे नकारात्मक संकेत; इंट्राडे ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी केली ‘या’ शेअर्सची शिफारस

Adani Enterprises निकालांची तारीख जाहीर! शेअरमध्ये येणार मोठा अॅक्शन?
4

Adani Enterprises निकालांची तारीख जाहीर! शेअरमध्ये येणार मोठा अॅक्शन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.