Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर प्रतीक्षा संपली! भारताच्या पहिल्या स्वदेशी Bullet Train ची Trial Date ठरली; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

India First Bullet Train Trial : भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक नवा सुवर्णध्याय लिहिला जाणार आहे. भारताच्या पहिल्या संपूर्ण स्वदेशी बुलेट ट्रेनची पहिली चाचणी पुढील वर्षी मे-जून महिन्यात घेतली जाईल, अशी मोठी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 08, 2026 | 06:36 PM
Bullet Train Trial ( सौजन्य - सोशल मीडिया )

Bullet Train Trial ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • अखेर प्रतीक्षा संपली!
  • भारताच्या पहिल्या Bullet Train ची Trial Date ठरली
  • रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा
India First Bullet Train Trial : भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक नव्या सुवर्ण अध्याय लिहीला जाणार आहे. भारताची पहिली संपूर्ण स्वदेशी बुलेट ट्रेन सज्ज होणार आहे. याच्या पहिल्या चाचणीचा मुहुर्त ठरला आहे. याबाबत स्वतः रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली आहे. नेमकी काय आहेत वैशिष्ट्ये, कधी ठरलाय मुहुर्त? सगळं सविस्तर जाणून घेऊयात. ( India First Bullet Train Trial ) 

Govt New Scheme : ‘जेव्हा पैसे असतील तेव्हा भरा, आणि Pension मिळवा!’ केंद्र सरकार आणतेय भन्नाट योजना!

स्वदेशी बुलेट ट्रेनच्या चाचण्या पुढील वर्षी मे आणि जूनमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे, असे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी सांगितले. चाचण्या सुरू झाल्यानंतर दोन ते चार महिन्यांत ही ट्रेन सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुली केली जाईल, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली. वडोदरा येथे ‘नमो फॉर विकासित भारत’ कार्यक्रमाला संबोधित करताना ही माहिती देण्यात आली. हाय-स्पीड ट्रेनच्या पहिल्या बॉडी फ्रेमचे काम नुकतेच पूर्ण झाले असून ती स्क्वीझ टेस्टिंगसाठी पाठवण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

बुलेट ट्रेनची चाचणी कधी होणार?

बुलेट ट्रेनच्या चाचणीबाबत बोलताना वैष्णव म्हणाले, “पुढील वर्षी मे किंवा जूनपर्यंत भारताची स्वतःची बुलेट ट्रेन चाचणीसाठी रुळांवर येईल. २-४ महिन्यांच्या चाचणीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बुलेट ट्रेनचे उद्घाटन करतील.” केंद्रीय मंत्री म्हणाले की, हा प्रकल्प ‘आत्मनिर्भर भारत’च्या संकल्पनेअंतर्गत तयार केला जात आहे आणि यामुळे वडोदरा व मुंबई दरम्यानच्या प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. ते म्हणाले, “जेव्हा तुम्ही वडोदरा येथून बुलेट ट्रेनने प्रवास कराल, तेव्हा तुम्ही फक्त दीड तासात मुंबईला पोहोचाल इतका सहज प्रवास होणार आहे.”

कॉरिडॉरचे बांधकाम वेगाने सुरू

वैष्णव यांनी सांगितले की, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे बांधकाम वेगाने सुरू असून, सुरत-वापी विभाग या वर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. रेल्वे क्षेत्रातील मोठ्या सुधारणांचा उल्लेख करत त्यांनी सरकार रेल्वेची कार्यप्रणाली, आरक्षण प्लॅटफॉर्म आणि बांधकाम नियमांचे आधुनिकीकरण करत असल्याचीही माहिती दिली.

36000 किलोमीटरचा नवीन रेल्वेमार्ग

वैष्णव यांनी स्पष्ट केले की, अलिकडच्या वर्षांत अनेक प्रलंबित रेल्वे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. त्यांनी चिनाब पूल आणि मिझोरमला राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कशी जोडणाऱ्या रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचा उल्लेख केला. केंद्रीय मंत्र्यांच्या मते, २८० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला असून ३६,००० किलोमीटरचा नवीन रेल्वेमार्ग टाकण्यात आला आहे. ते पुढे म्हणाले की, वंदे भारत तंत्रज्ञानावर आधारित मालगाड्याही विकसित केल्या जात आहेत. ते म्हणाले की, कोविड-१९ महामारीच्या आव्हानांना न जुमानता रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासाचा वेग वाढला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, २०२० मध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्याच्या कामाला गती मिळाली.

SPJIMR FT MiM Ranking : जगभरातील टॉप 50 बिझनेस स्कूल्समध्ये भारतीय संस्थांचा डंका! SPJIMR ने मिळवले 26 वे स्थान; पाहा काय आहे खास?

Web Title: Indias first indigenous bullet train trial in may june railway minister announcement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 06:36 PM

Topics:  

  • Bullet Train
  • india
  • Indian Railway

संबंधित बातम्या

Mumbai News: मध्य रेल्वेच्या १५ स्थानकांवर किराणा स्टोअर! चहा, कॉफीच्या विक्रीला बंदी, दैनंदिन गरजेच्या वस्तू स्टोअरवर मिळणार
1

Mumbai News: मध्य रेल्वेच्या १५ स्थानकांवर किराणा स्टोअर! चहा, कॉफीच्या विक्रीला बंदी, दैनंदिन गरजेच्या वस्तू स्टोअरवर मिळणार

India Diesel Demand : देशात नक्की घडतंय काय? डिझेलच्या मागणीत अचानक वाढ! 15 दिवसांत तब्बल 36.5 लाख टन इंधनाचा वापर
2

India Diesel Demand : देशात नक्की घडतंय काय? डिझेलच्या मागणीत अचानक वाढ! 15 दिवसांत तब्बल 36.5 लाख टन इंधनाचा वापर

Central Government Festive Bonus : कर्मचाऱ्यांना लॉटरी… दिवाळीपूर्वी मिळणार तब्बल 60 दिवसांचा घसघशीत बोनस; कोणाला होणार फायदा?
3

Central Government Festive Bonus : कर्मचाऱ्यांना लॉटरी… दिवाळीपूर्वी मिळणार तब्बल 60 दिवसांचा घसघशीत बोनस; कोणाला होणार फायदा?

Railway Recruitment 2026: रेल्वेत नोकरीची मोठी संधी! ‘इतक्या’ पदांसाठी मेगा भरती; असा कराल अर्ज
4

Railway Recruitment 2026: रेल्वेत नोकरीची मोठी संधी! ‘इतक्या’ पदांसाठी मेगा भरती; असा कराल अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.