
Crypto Market: क्रिप्टो मार्केटमध्ये मोठा बदल! - (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
आधीच्या लोकांना क्रिप्टो म्हणजे जुगार वाटायचा. आज पैसे टाकायचे उद्या डबल झाले तर विकून टाकायचे. पण आता चित्र बदललंय. लोक हुशार झाले आहेत. कॉईनडीसीएक्सने दिलेल्या नवीन रिपोर्टनुसार आता लोक मीम टोकनच्या मागे धावत नाहीत, तर चांगल्या आणि जुन्या क्रिप्टोमध्ये पैसे टाकत आहेत. ते पण SIP सारखं हळूहळू. Crypto Market:
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त कॉईनडीसीएक्सने हे आकडे जाहीर केले आहेत. यावरून एक गोष्ट कळते की भारतात आता क्रिप्टो फक्त मुंबई, दिल्ली, बेंगळुरुपुरतं राहिलं नाहीये. आता जयपूर, पाटणा, लखनौ सारखी शहरं पण यात पुढे आली आहेत.
कॉईनडीसीएक्सचे युजर्स आता 2.2 कोटीच्या वर गेले आहेत. 2024 पासून 80 लाख नवीन लोक जोडले गेलेत. यात सगळ्यात जास्त वाटा आहे जयपूर, पाटणा, लखनौ सारख्या शहरांचा. या शहरातल्या तरुणांना वाटतंय की सोनं, जमिनीपेक्षा डिजिटल ॲसेट पण एक चांगला पर्याय आहे. आणि हे लोक घाई करत नाहीत, SIP ने गुंतवणूक करत आहेत. त्यामुळेच कॉईनडीसीएक्सवर SIP करणाऱ्यांची संख्या 600% ने वाढली आहे. विचार करा, 600 टक्के म्हणजे खूप मोठा आकडा आहे.
सगळ्यात मोठा बदल कोणता झाला असेल तर लोकांनी मीम टोकनला टाटा केला आहे. आधी कुत्र्याचा फोटो असलेले कॉईन, बेडकाचा फोटो असलेले कॉईन लोक घेत होते. कारण ते स्वस्त होते आणि वाटायचं एकदम पैसा वाढेल.
रिपोर्ट सांगतो की एकूण ट्रेडिंगमध्ये मीम टोकन्सचा वाटा फक्त 12.17% राहिला आहे. तर चांगल्या आणि मोठ्या क्रिप्टो म्हणजे ज्याला ब्लू-चिप म्हणतात, त्यांचा वाटा 55% आहे. म्हणजे लोक आता बिटकॉईन, इथेरियम सारख्या मजबूत कॉईनवर जास्त विश्वास ठेवत आहेत. हे मार्केट मॅच्युअर होण्याचं लक्षण आहे.
2026 च्या पहिल्या सहा महिन्यात 26 ते 41 वयाचे नोकरी करणारे लोक सगळ्यात जास्त आले आहेत. हे लोक काहीही न वाचता पैसे टाकत नाहीत. ते आधी रिसर्च करतात, त्या कॉईनचा अभ्यास करतात आणि मगच गुंतवणूक करतात.
Amazon Pay आणि Pahle India चा मोठा रिपोर्ट – लहान शहरांनी मारली बाजी, डिजिटल कर्जात टॉपवर
यावर कॉईनडीसीएक्सचे को-फाउंडर सुमित गुप्ता म्हणाले, “आज साक्षरता म्हणजे फक्त वाचता लिहिता येणं नाही. तर डिजिटल जगात कसं वागायचं हे पण आलं. क्रिप्टो आता आपल्या आर्थिक चर्चेचा भाग बनलंय. त्यामुळे क्रिप्टो साक्षरता खूप गरजेची आहे. लोकांना जोखीम कळली पाहिजे.”
ते पुढे म्हणाले, “आमच्या प्लॅटफॉर्मवर चांगले बदल दिसत आहेत. लोक मीम पेक्षा चांगल्या कॉईनला पसंती देत आहेत, SIP करत आहेत आणि नवीन शहरांमधून लोक येत आहेत. 2025 मध्ये SIP धारकांमध्ये 600% वाढ झाली आहे, याचाच अर्थ लोक आता शिस्तीने गुंतवणूक करत आहेत. आम्हाला लोकांना अजून जास्त शिकवायचं आहे जेणेकरून ते हुशारीने निर्णय घेतील.” एकंदरीत काय तर क्रिप्टोमध्ये पण आता जुगार नाही तर समजदारीने गुंतवणूक सुरु झाली आहे. आणि यात आपली छोटी शहरं मोठ्या शहरांना टक्कर देत आहेत.