Amazon Pay आणि Pahle India चा मोठा रिपोर्ट - (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Digital Credit and Inclusion Index 2026: डिजिटल पेमेंटमध्ये भारताने जगाला मागे टाकलंय आहे. पण आता डिजिटल कर्ज म्हणजे लोन घेण्याच्या बाबतीत पण एक मोठा बदल होतोय. यावरच Pahle India Foundation आणि Amazon Pay ने मिळून देशातला पहिला Digital Credit and Inclusion Index म्हणजेच DCII 2026 लॉन्च केला आहे. हा रिपोर्ट सांगतो की भारतात डिजिटल कर्ज कोण घेतंय, कसं घेतंय आणि त्याचा फायदा होतोय का. 20 राज्यातल्या 100 शहरात 5000 पेक्षा जास्त लोकांशी बोलून हा रिपोर्ट बनवला आहे. यातून एक गोष्ट एकदम क्लियर झाली आहे .मोठ्या शहरांपेक्षा आपली छोटी शहरं म्हणजे Tier 2 शहरे डिजिटल लोन घेण्यात सगळ्यांच्या पुढे आहेत.
रिपोर्टनुसार Tier 2 शहरांचा स्कोअर आहे 58.64. तर Tier 1 मुंबई, दिल्ली सारख्या मोठ्या शहरांचा स्कोअर फक्त 53.1 आहे. Tier 3 शहरांचा 55.7 आहे. कोइंबतूर, सुरत, नागपूर, इंदूर, प्रयागराज, रांची, लुधियाना सारखी शहरं आता डिजिटल क्रेडिटमध्ये लीड करत आहेत. एवढंच नाही तर या छोट्या शहरांमध्ये बायका पण मागे नाहीत. इथे पुरुष आणि महिलांमधला फरक फक्त 2.8 पॉइंट्सचा आहे. तर मोठ्या शहरांमध्ये हाच फरक 9.1 पॉइंट्सचा आहे. लहान शहरात सगळ्यांना समान संधी मिळतेय.
55.85. याचा अर्थ भारत आता “इमर्जिंग अँड सर्व्हड” कॅटेगरीत आलाय. पोहोच म्हणजे Access चा स्कोअर सगळ्यात जास्त 61.24 आहे, लोकांपर्यंत हे पोहोचलंय. पण याचा खरा फायदा होतोय का याचा Impact स्कोअर थोडा कमी म्हणजे 49.16 आहे.
या रिपोर्टमधली सगळ्यात छान गोष्ट ही आहे की, नोकरी करणाऱ्या महिला. सगळीकडे पुरुषांचा स्कोअर जास्त असताना, पगार घेणाऱ्या बायकांनी पुरुषांना मागे टाकलं. पगारदार महिलांचा स्कोअर आहे 62.0 आणि पुरुषांचा 60.2. म्हणजे जेव्हा बाईला स्वतःचा पगार असतो तेव्हा ती डिजिटल कर्ज पण जास्त चांगलं वापरते.
18 ते 29 वयाच्या तरुणांमध्ये मुला-मुलींमधला फरक फक्त 2.9 पॉइंट आहे. तर 60 वर्षांवरील लोकांमध्ये 4.6 आहे. यावरून कळतंय की नवीन पिढी याबाबतीत जास्त बरोबरी करतेय.लोकांना माहिती आहे पण विश्वास कमी94.4% लोकांना डिजिटल क्रेडिट म्हणजे काय हे माहिती आहे. म्हणजे अवेअरनेसचा प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम आहे विश्वासाचा. डिजिटल पेमेंटवर लोकांचा विश्वास 69.7 आहे पण डिजिटल कर्जावर फक्त 52.5. लोकांना अजूनही वाटतं ऑनलाईन लोन घेणं रिस्की आहे.
48.2% लोक त्यांची सेव्हिंग वापरतात. फक्त 6.9% लोक लोन ॲप वापरतात आणि 3.4% लोक BNPL म्हणजे Buy Now Pay Later वापरतात. म्हणजे अजूनही लोकांना अडचणीच्या वेळी डिजिटल लोन हा पहिला पर्याय वाटत नाही.अजूनही सगळ्यांपर्यंत पोहोचलं नाहीरिपोर्ट सांगतो की गृहिणी, गिग वर्कर, रोजंदारी कामगार, विद्यार्थी यांचा स्कोअर पगारदार लोकांपेक्षा 11 पॉइंटने कमी आहे. कारण त्यांच्याकडे प्रॉपर इन्कम प्रूफ नसतो. त्यामुळे त्यांना लोन मिळत नाही. आता काळ बदललाय, फक्त पगाराची स्लिप न बघता लोकांचा डिजिटल व्यवहार, त्यांचा कॅश फ्लो बघून लोन दिलं पाहिजे.आणि लोक लोन कशासाठी घेतात? 59% लोक मोबाईल, टीव्ही, फ्रिज घ्यायला घेतात. धंद्यासाठी किंवा प्रॉपर्टीसाठी लोन घेण्याचा स्कोअर फक्त 43.2 आहे. पण जे लोक नेहमी लोन घेतात त्यातले 64% लोक धंद्यासाठी वापरतात. म्हणजे एकदा सवय लागली की लोक हुशारीने वापरतात.
DILRMP 3.0: जमीनाचाही आता ‘Aadhaar Number’, सरकारच्या ‘या’ निर्णयावर प्लॉट खरेदीदार होणार खुश
Pahle India चे अध्यक्ष राजीव कुमार म्हणाले, आर्थिक समावेशन हे फक्त किती लोकांपर्यंत पोहोचलं यावरून नाही तर त्याचा खरा फायदा होतोय का यावरून मोजायला हवं.Amazon Pay इंडियाचे CEO विकास बंसल म्हणाले, आमचे 75% ग्राहक Tier 2 आणि Tier 3 मधले आहेत. हा रिपोर्ट आम्हाला त्यांच्यासाठी अजून चांगली प्रोडक्ट बनवायला मदत करेल. आणि भारत 2047 पर्यंत विकसित होणार आहे, त्यात डिजिटल क्रेडिटचा मोठा रोल असणार आहे.






