डिजिटल अरेस्ट फसवणुकीशी संबंधित प्रकरणांमध्ये एजन्सीने एकाच वेळी दिल्ली-NCR, हरियाणा, राजस्थान, गुजरात, केरळ आणि पश्चिम बंगालमधील सुमारे 40 ठिकाणी छापे टाकले.
संशयितांच्या बँक खात्यांवरील 48 लाख रुपये गोठविण्यात आले. संशयित क्षितिज सुतार हा टोळीचा प्रमुख सूत्रधार असल्याचेही सांगण्यात आले. सुतार हा ऑनलाईन फसवणुकीचे नेटवर्क नियंत्रित करत होता.
पोलिस अधिकारी कधीही व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉलद्वारे जबाब नोंदवत नाहीत. कॉलदरम्यान पोलिस अधिकारी तुम्हाला धमकावत नाहीत किंवा पैसे किंवा वैयक्तिक माहिती देण्यास भाग पाडत नाहीत.