Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market: IPO बाजारात पुन्हा उत्साह! आज तीन मोठ्या कंपन्यांची एंट्री; गुंतवणूकदारांचे लक्ष कुठे?

Stock Market: शेअर बाजारातील प्राथमिक बाजारपेठेत आज पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, तीन मोठ्या कंपन्यांचे IPO गुंतवणुकीसाठी खुले झाले आहेत. मजबूत ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) आणि आकर्षक लिस्टिंग गेनच्या अपेक्षेमुळे गुंतवणूकदारांचे लक्ष या IPO कडे लागले आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 23, 2026 | 12:09 PM
IPO (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

IPO (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • एकाच दिवशी 3 मेनबोर्ड IPO खुले
  • शेअर बाजारातील अस्थिरतेतही गुंतवणूकदारांचा उत्साह कायम
  • GMP आणि लिस्टिंग गेनवर सर्वांचे लक्ष
 

Share Market News:  शेअर बाजारात Stock Market अस्थिरतेचे वातावरण कायम असले तरी (IPO) बाजारातील उत्साह कमी झालेला दिसत नाही. देशांतर्गत आणि जागतिक आर्थिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवरही गुंतवणूकदार नव्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 23 जुलै रोजी एकाच दिवशी तीन मेनबोर्ड कंपन्यांचे IPO खुले झाल्याने शेअर बाजारात एक नवी चर्चा सुरु झाली आहे.

इंडो-एमआयएमच्या IPO कडे सर्वाधिक लक्ष

आजपासून गुंतवणुकीसाठी उपलब्ध झालेल्या IPOमध्ये इंडो-एमआयएम(Indo-MIM), लोहिया कॉर्प (Indo-MIM) आणि एक्सट्रानेट टेक्नॉलॉजीज (Extranet Technology) या तीन कंपन्यांचा समावेश आहे. या तिन्ही कंपन्या वेगवेगळ्या उद्योगांमध्ये कार्यरत असल्यामुळे गुंतवणूकदारांसाठी विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत.

यापैकी इंडो-एमआयएमचा IPO सर्वाधिक चर्चेत आहे. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीच्या समभागांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीने प्रति शेअर 461 ते 485 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला असून, या इश्यूद्वारे मोठ्या प्रमाणावर निधी उभारण्याची योजना आहे. याशिवाय काही विद्यमान भागधारकही आपल्या मालकीतील समभाग विक्रीसाठी आणत आहेत.

ग्रे मार्केटमध्ये मजबूत प्रीमियम

सध्याच्या ग्रे मार्केटमधील अंदाजानुसार इंडो-एमआयएमच्या IPOला सुमारे 180 रुपयांचा प्रीमियम मिळत आहे. हा कल कायम राहिल्यास कंपनीचा शेअर सुमारे 665 रुपयांच्या आसपास सूचीबद्ध होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे अल्पकालीन परताव्याची अपेक्षा असलेल्या गुंतवणूकदारांचे लक्ष या इश्यूवर केंद्रित झाले आहे.

लोहिया कॉर्पचा इश्यूही चर्चेत

लोहिया कॉर्पनेही आजपासून आपला IPO खुला केला आहे. या इश्यूचा एकूण आकार सुमारे 1,101 कोटी रुपये आहे. कंपनीने प्रति शेअर 404 ते 425 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे.

या IPOचे वैशिष्ट्य म्हणजे यात कोणतेही नवीन समभाग जारी केले जाणार नाहीत. विक्रीसाठी उपलब्ध असलेले सर्व समभाग विद्यमान भागधारकांकडून ऑफर फॉर सेल (OFS) स्वरूपात आणले गेले आहेत. त्यामुळे या व्यवहारातून मिळणारी रक्कम कंपनीऐवजी संबंधित भागधारकांकडे जाणार आहे.

Elon Musk ला एका दिवसात तब्बत $44000000000 नुकसान, धाडकन कोसळले Tesla आणि SpaceX चे शेअर्स!

लोहिया कॉर्पला सकारात्मक संकेत

ग्रे मार्केटमध्ये लोहिया कॉर्पच्या समभागांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या या IPOला सुमारे 35 रुपयांचा प्रीमियम मिळत असल्याची चर्चा आहे. त्यानुसार कंपनीचा शेअर सूचीबद्ध होताना जवळपास 460 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. इंडो-एमआयएमच्या तुलनेत प्रीमियम कमी असला तरी बाजारातील एकूण वातावरण या इश्यूसाठी सकारात्मक मानले जात आहे.

एक्सट्रानेट टेक्नॉलॉजीजचा विकासावर भर

आयटी क्षेत्रात (IT) कार्यरत असलेल्या एक्सट्रानेट टेक्नॉलॉजीजनेही आज आपला IPO गुंतवणूकदारांसाठी खुला केला आहे. या सार्वजनिक इश्यूद्वारे कंपनी सुमारे 166 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा प्रयत्न करणार आहे.

या इश्यूमध्ये संपूर्ण निधी नवीन समभागांच्या माध्यमातून उभारला जाणार असल्याने मिळणारी रक्कम थेट कंपनीच्या विस्तार आणि विकासासाठी वापरली जाईल. कंपनीच्या माहितीनुसार हा निधी कर्जफेड, आधुनिक तंत्रज्ञान आणि हार्डवेअर खरेदी, दैनंदिन व्यावसायिक गरजा तसेच इतर कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी खर्च केला जाणार आहे. या IPOसाठी प्रति शेअर 120 ते 127 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.

ग्रे मार्केटमध्ये या समभागाला सध्या सुमारे 17 रुपयांचा प्रीमियम मिळत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सूचीबद्धतेच्या दिवशी शेअरची किंमत अंदाजे 144 रुपयांपर्यंत जाऊ शकते.

फुटबॉल विश्वचषक अंतिम सामन्याच्या रात्री भारतात स्नॅक्सची मोठी मागणी; इन्स्टामार्टने जाहीर केली रंजक आकडेवारी

गुंतवणुकीपूर्वी सखोल अभ्यास आवश्यक

आज खुले झालेले तिन्ही IPO वेगवेगळ्या क्षेत्रांतील असल्यामुळे गुंतवणूकदारांना विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत. ग्रे मार्केटमधील सकारात्मक संकेत उत्साहवर्धक असले तरी केवळ त्यावर आधारित गुंतवणुकीचा निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. कंपनीची आर्थिक स्थिती, व्यवसायाची ताकद, भविष्यातील वाढीची क्षमता आणि त्यातील जोखीम यांचा सखोल अभ्यास करूनच अंतिम निर्णय घेणे अधिक शहाणपणाचे ठरेल. योग्य माहितीच्या आधारे केलेली गुंतवणूकच दीर्घकालीन लाभ मिळवून देऊ शकते.

Web Title: Ipos of lohia corp indo mim and extranet technologies opened on 23 july 2026 know gmp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • Business News
  • Share Market Big Update
  • Stock market

संबंधित बातम्या

SPJIMR FT MiM Ranking : जगभरातील टॉप 50 बिझनेस स्कूल्समध्ये भारतीय संस्थांचा डंका! SPJIMR ने मिळवले 26 वे स्थान; पाहा काय आहे खास?
1

SPJIMR FT MiM Ranking : जगभरातील टॉप 50 बिझनेस स्कूल्समध्ये भारतीय संस्थांचा डंका! SPJIMR ने मिळवले 26 वे स्थान; पाहा काय आहे खास?

भारतात AI चा तुफान वापर ! कंपन्यांचा मोठा विश्वास… 2027 पर्यंत IT बजेटचा 20% हिस्सा AI कडे जाणार; सर्व्हिसनाऊच्या अहवालात काय?
2

भारतात AI चा तुफान वापर ! कंपन्यांचा मोठा विश्वास… 2027 पर्यंत IT बजेटचा 20% हिस्सा AI कडे जाणार; सर्व्हिसनाऊच्या अहवालात काय?

ASUS इंडियाचा मोठा निर्णय! MSME क्षेत्रासाठी राजीव तलरेजा यांची ‘Mentor’ म्हणून नियुक्ती
3

ASUS इंडियाचा मोठा निर्णय! MSME क्षेत्रासाठी राजीव तलरेजा यांची ‘Mentor’ म्हणून नियुक्ती

Inspiring Story: अपंगत्वाला हरवून ‘या’ फळांच्या शेतीतून कोट्यवधींची कमाई! ६२ वर्षीय शेतकऱ्याला राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री
4

Inspiring Story: अपंगत्वाला हरवून ‘या’ फळांच्या शेतीतून कोट्यवधींची कमाई! ६२ वर्षीय शेतकऱ्याला राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.