Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Life Insurance Council: ‘इन्शुरन्स फॉर ऑल’ला चालना; जीवन विम्यावर आधारित कॉमिक बुक मालिकेचे प्रकाशन

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI)चे अध्यक्ष अजय सेठ यांच्या हस्ते जीवन विम्यावरील ग्राहक जागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या कॉमिक बुक मालिकेचे प्रकाशन करण्यात आले. 'इन्शुरन्स फॉर ऑल' उपक्रमाला बळ देण्यासाठी लाईफ इन्शुरन्स कौन्सिल आणि जीवन विमा कंपन्यांनी हा उपक्रम राबवला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 31, 2026 | 06:04 PM
'इन्शुरन्स फॉर ऑल'ला चालना; जीवन विम्यावर आधारित कॉमिक बुक मालिकेचे प्रकाशन

'इन्शुरन्स फॉर ऑल'ला चालना; जीवन विम्यावर आधारित कॉमिक बुक मालिकेचे प्रकाशन

Follow Us
Follow Us:
  • जीवन विमा समजावण्यासाठी कॉमिक बुक मालिका
  • IRDAI चा ग्राहक जागृतीसाठी नवा उपक्रम
  • जीवन विम्यावर आधारित कॉमिक बुक मालिकेचे प्रकाशन
मुंबई: भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI)चे अध्यक्ष अजय सेठ यांच्या हस्ते ग्राहक जागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या जीवन विम्यावरील कॉमिक बुक मालिकेचे प्रकाशन करण्यात आले. ‘इन्शुरन्स फॉर ऑल’ या राष्ट्रीय उपक्रमाला अधिक बळकटी देण्यासाठी जीवन विमा क्षेत्रातील प्रमुख कंपन्या आणि लाईफ इन्शुरन्स कौन्सिल यांनी संयुक्तपणे हा उपक्रम राबवला आहे.

सोप्या भाषेत जीवन विम्याची माहिती

जीवन विम्याशी संबंधित गुंतागुंतीच्या संकल्पना सर्वसामान्य नागरिकांना सहज समजाव्यात, यासाठी ही कॉमिक बुक मालिका तयार करण्यात आली आहे. यात MWP (Married Women’s Property Act), Waiver of Premium (WoP) आणि Critical Illness Rider यांसारख्या महत्त्वाच्या संकल्पना दैनंदिन जीवनातील प्रसंग आणि कथांद्वारे स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

Sterling Green Power: तळेगावात स्टर्लिंग ग्रीन पॉवर सोल्यूशन्सचा अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प; डिझेल जनरेटर निर्मितीला वेग

राष्ट्रीय विमा जागृती दिनानिमित्त परिसंवाद

राष्ट्रीय विमा जागृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘India Asks: Why Prioritise Life Insurance?’ या विषयावर विशेष परिसंवादही आयोजित करण्यात आला. या चर्चेत आर्थिक नियोजनात जीवन विम्याचे महत्त्व, आर्थिक सुरक्षितता आणि विमा साक्षरतेबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

जीवन विमा क्षेत्राची दमदार वाढ

कार्यक्रमात देण्यात आलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये जीवन विमा क्षेत्रातील नव्या व्यवसायाच्या प्रीमियममध्ये 15.7 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच या कालावधीत 2.83 कोटींहून अधिक नवीन जीवन विमा पॉलिसी जारी करण्यात आल्या.

प्रमुख मान्यवरांचे मत, कमलेश राव, अध्यक्ष, IAC-Life म्हणाले, “‘इन्शुरन्स फॉर ऑल’चे उद्दिष्ट प्रत्येक भारतीय कुटुंबाच्या आर्थिक नियोजनात आर्थिक संरक्षणाला कायमचे स्थान मिळवून देणे आहे.”

आदित्य गुप्ता, महासचिव, लाईफ इन्शुरन्स कौन्सिल म्हणाले, “ग्राहक जागृतीसाठी तयार करण्यात आलेली ही कॉमिक बुक मालिका कथाकथनाच्या माध्यमातून जीवन विम्याचे महत्त्व अधिक प्रभावीपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवेल.”

आर्थिक साक्षरतेकडे महत्त्वाचे पाऊल

कॉमिक बुकच्या माध्यमातून जीवन विम्याबाबतची जागरूकता वाढवणे, विम्याविषयीचे गैरसमज दूर करणे आणि प्रत्येक कुटुंबाला आर्थिक संरक्षणाचे महत्त्व पटवून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ‘इन्शुरन्स फॉर ऑल’ हे लक्ष्य साध्य करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे.

RBI Rules Change: बँकांची मनमानी नाही चालणार! रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; आता 1 ऑक्टोबरपासून FD चे नियम बदलणार

Web Title: Irdai launches life insurance comic book series insurance for all

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 06:04 PM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

प्राचीन भारतातील या ऐतिहासिक युद्धकला तुम्हाला माहित आहेत का? कलरीपयट्टू ते मर्दानी खेळ; हे आहेत मार्शल आर्ट्स सारख्या खेळांचे जनक
1

प्राचीन भारतातील या ऐतिहासिक युद्धकला तुम्हाला माहित आहेत का? कलरीपयट्टू ते मर्दानी खेळ; हे आहेत मार्शल आर्ट्स सारख्या खेळांचे जनक

CJP आंदोलनातील मोठा खुलासा! RAF जवानाने चालवली पेलेट गन? सात राऊंड फायरिंगनंतर पाच आंदोलनकर्ते जखमी
2

CJP आंदोलनातील मोठा खुलासा! RAF जवानाने चालवली पेलेट गन? सात राऊंड फायरिंगनंतर पाच आंदोलनकर्ते जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.