
फोटो सौजन्य - Social Media
ITC Limited च्या Candyman ब्रँडने आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार करत ‘Candyman Fruitee Fun Soft Chews’ हे नवीन उत्पादन बाजारात आणले आहे. बदलत्या ग्राहकवर्गाच्या, विशेषतः लहान मुलांच्या आवडी लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या या उत्पादनासाठी ब्रँडने नवी जाहिरात फिल्मही सादर केली आहे. या फिल्मद्वारे लोकप्रिय “कुछ भी करेगा फॉर Candyman!” मोहिमेचे पुनरागमन करण्यात आले असून, मऊ आणि सहज चघळता येणाऱ्या फ्रुटी टेक्स्चरवर भर देण्यात आला आहे.
ही जाहिरात FCB Ulka यांनी संकल्पित केली असून, कॅन्डीमॅन फ्रुटी फन सॉफ्ट च्यूजने भरलेल्या ट्रकभोवती कथा फिरते. प्रवासादरम्यान कांगारू ‘टोल कीपर्स’ ट्रक अडवतात आणि बदल्यात कॅन्डीमॅनची मागणी करतात. त्यानंतर कल्पनारम्य आणि मजेशीर घटनांची मालिका सुरू होते, जी अखेरीस ब्रँडच्या खेळकर आणि आकर्षक स्वभावाला अधोरेखित करते. “च्युव्ही, ज्युसी, फ्रुटी फन” आणि “कुछ भी करेगा फॉर कॅन्डीमॅन!” या सिग्नेचर ओळींसह फिल्मची सांगता होते.
या मोहिमेबद्दल बोलताना Subhash Balar यांनी सांगितले की, भारतीय कन्फेक्शनरी बाजारात चवीसोबतच अनुभवाला देखील मोठे महत्त्व मिळू लागले आहे. विशेषतः लहान ग्राहकांना लक्षात घेऊन अधिक कल्पनारम्य, मजेशीर आणि संवादात्मक अनुभव देण्याचा प्रयत्न या मोहिमेत करण्यात आला आहे. कथाकथनाच्या माध्यमातून मुलांना ब्रँडशी अधिक जोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. तर Rakesh Menon यांनी सांगितले की, या जाहिरातीद्वारे वास्तव आणि कल्पनाशक्ती यांचा संगम घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. उत्पादनाप्रमाणेच कथा देखील अनपेक्षित, खेळकर आणि मनोरंजक ठेवण्याचा उद्देश होता.
नव्या पिढीच्या बदलत्या अपेक्षा लक्षात घेऊन ITC Foods सातत्याने नाविन्यपूर्ण उत्पादनांमध्ये गुंतवणूक करत आहे. मऊ टेक्स्चर, फ्रुटी फ्लेवर्स आणि आकर्षक स्वरूपामुळे ‘कॅन्डीमॅन फ्रुटी फन सॉफ्ट च्यूज’ मुलांसाठी अधिक मजेशीर आणि सहज अनुभव देणारे उत्पादन ठरत आहे. पारंपरिक हार्ड कँडीच्या चौकटीपलीकडे जाऊन, अनुभवाधारित कन्फेक्शनरी श्रेणी निर्माण करण्याच्या ITC च्या धोरणाचे हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.