Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: चॉकलेटचे आमिष दाखवून सात वर्षांच्या मुलीशी गैरवर्तन; नागपुरात ४७ वर्षीय भाडेकरूला अटक

नागपुरात सात वर्षांच्या मुलीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून ४७ वर्षीय भाडेकरूला अटक करण्यात आली आहे. शाळेत सुरक्षित-असुरक्षित स्पर्शाबाबत जनजागृती सुरू असताना मुलीने शिक्षिकेला आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 16, 2026 | 03:50 PM
Crime News: चॉकलेटचे आमिष दाखवून सात वर्षांच्या मुलीशी गैरवर्तन; नागपुरात ४७ वर्षीय भाडेकरूला अटक

Crime News: चॉकलेटचे आमिष दाखवून सात वर्षांच्या मुलीशी गैरवर्तन; नागपुरात ४७ वर्षीय भाडेकरूला अटक

Follow Us
Follow Us:
  • सात वर्षांच्या मुलीशी गैरवर्तन; ४७ वर्षीय भाडेकरूला अटक
  • ‘सुरक्षित-असुरक्षित स्पर्श’ जनजागृतीत मुलीने शिक्षिकेला सांगितली आपबिती
  • पॉक्सोअंतर्गत गुन्हा; आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी
 

नागपूर : लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी ४७ वर्षीय भाडेकरूला अटक केली आहे. चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीशी गैरवर्तन केल्याचा आरोप संबंधित व्यक्तीवर आहे. शाळेत सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्शाबाबत जनजागृती सुरू असताना मुलीने शिक्षिकेला आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

शिक्षिकेसमोर मुलीने सांगितली आपबिती

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजेश कनोजिया हा मुलीच्या कुटुंबाच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होता. त्याने चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास मुलीच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद असल्याची माहिती आहे.

हेही वाचा: Crime News: पुणे पोलीस भरतीत कुराशच्या बनावट प्रमाणपत्रांचा खेळ; १९ जणांवर बडतर्फीची कारवाई

‘सुरक्षित-असुरक्षित स्पर्शा’च्या जनजागृतीत प्रकार उघड

शाळेत मुलांना सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्शाबाबत माहिती दिली जात असताना मुलीने शिक्षिकेकडे आपली व्यथा मांडली. शिक्षिकेने तत्काळ मुलीच्या पालकांना शाळेत बोलावून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी मुलीशी संवाद साधला आणि संपूर्ण प्रकार समोर आला.

पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

मुलीच्या पालकांनी या प्रकरणी पाचपावली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. बालकाचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह पॉक्सो कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पाचपावली पोलीस करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा प्रकार कसा उघडकीस आला?

    Ans: शाळेत सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्शाबाबत जनजागृती सुरू असताना मुलीने शिक्षिकेला आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.

  • Que: आरोपीवर कोणत्या कायद्यानुसार कारवाई झाली?

    Ans: भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Nagpur child abuse case seven year old girl tenant arrested sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • child
  • Nagpur Case
  • Nagpur Crime News
  • POCSO
  • Sexual Assault Case

संबंधित बातम्या

Beed Crime: शाळा सुटली की सुरू व्हायचा शिक्षकाचा काळा खेळ; चौथीच्या मुलींच्या छळाने बीड हादरले
1

Beed Crime: शाळा सुटली की सुरू व्हायचा शिक्षकाचा काळा खेळ; चौथीच्या मुलींच्या छळाने बीड हादरले

Chhatrapati Sambhajinagar: मुलीवर अत्याचाराचा गुन्हा मिटवण्यासाठी आईनेच मागितले ३९ लाख; २५ हजार घेताना रंगेहात अटक
2

Chhatrapati Sambhajinagar: मुलीवर अत्याचाराचा गुन्हा मिटवण्यासाठी आईनेच मागितले ३९ लाख; २५ हजार घेताना रंगेहात अटक

Crime News: आई-वडील जेवायला गेले अन् सहा वर्षांच्या चिमुरडीसोबत घडला धक्कादायक प्रकार
3

Crime News: आई-वडील जेवायला गेले अन् सहा वर्षांच्या चिमुरडीसोबत घडला धक्कादायक प्रकार

Crime News: नाशिकमध्ये बाल लैंगिक शोषणाचे २५० व्हिडिओ व्हायरल; दीड वर्षांपासून सुरू होता प्रकार…
4

Crime News: नाशिकमध्ये बाल लैंगिक शोषणाचे २५० व्हिडिओ व्हायरल; दीड वर्षांपासून सुरू होता प्रकार…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.