Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किया इंडियाची मे महिन्यात विक्रमी विक्री; 27,586 वाहनांची नोंद, वार्षिक वाढ 23.6%

देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम वाहन उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या किया इंडियाने स्थापनेपासूनचा मे महिन्यातील सर्वोच्च विक्रीचा विक्रम नोंदवला आहे. कंपनीने मे 2026 मध्ये एकूण 27,586 वाहनांची घाऊक विक्री (Wholesale) केली असून, मे 2025 मधील 22,315 वाहनांच्या तुलनेत 23.6 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 01, 2026 | 05:42 PM
किया इंडियाची मे महिन्यात विक्रमी विक्री; 27,586 वाहनांची नोंद, वार्षिक वाढ 23.6%
Follow Us
Follow Us:

मुंबई, 1 जून 2026 : देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम वाहन उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या किया इंडियाने स्थापनेपासूनचा मे महिन्यातील सर्वोच्च विक्रीचा विक्रम नोंदवला आहे. कंपनीने मे 2026 मध्ये एकूण 27,586 वाहनांची घाऊक विक्री (Wholesale) केली असून, मे 2025 मधील 22,315 वाहनांच्या तुलनेत 23.6 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली आहे. कंपनीच्या विविध मॉडेल्सना ग्राहकांकडून मिळणारा चांगला प्रतिसाद आणि भारतीय बाजारातील मजबूत उपस्थितीमुळे ही वाढ शक्य झाल्याचे कंपनीने सांगितले.

वर्षाच्या सुरुवातीपासून विक्रीत 14.6% वाढ
2026 मध्ये कंपनीची दमदार वाढ कायम राहिली असून, वर्षाच्या सुरुवातीपासून (YTD) 139,197 वाहनांची विक्री झाली आहे. 2025 मधील याच कालावधीत ही संख्या 121,514 इतकी होती, म्हणजेच कंपनीने 14.6 टक्क्यांची वाढ साधली आहे.

Kia Motors कडून ‘या’ खास Next-Gen कारची तयारी सुरु, केव्हापर्यंत होईल …

सेल्टॉस आणि सोनेटची दमदार कामगिरी
कंपनीच्या वाढीत नवीन सेल्टॉस आणि सोनेट या लोकप्रिय SUV मॉडेल्सचा मोठा वाटा आहे. जानेवारीत लॉन्च झाल्यानंतर सेल्टॉसने सलग प्रत्येक महिन्यात 10,000 हून अधिक युनिट्सची विक्री केली आहे. आकर्षक डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान आणि BNCAP मधील 5-स्टार सुरक्षा रेटिंगमुळे सेल्टॉसची लोकप्रियता अधिक वाढली आहे.

सोनेटलाही कॉम्पॅक्ट SUV विभागात मोठी मागणी असून, पेट्रोल आणि डिझेल प्रकारांमध्ये अधिक ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय उपलब्ध केल्याने ग्राहकांचा प्रतिसाद वाढला आहे.

Carens Clavis आणि Syros ला चांगला प्रतिसाद
कंपनीच्या Carens Clavis, Clavis EV आणि MY26 Syros या मॉडेल्सनाही ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः, सुधारित फीचर्स, आरामदायी सीटिंग व्यवस्था आणि कुटुंबासाठी उपयुक्त पर्याय म्हणून या वाहनांची लोकप्रियता वाढत आहे.

इलेक्ट्रिक वाहनांसाठी BaaS उपक्रम
इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी अधिक सुलभ करण्यासाठी किया इंडियाने Battery-as-a-Service (BaaS) उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे ग्राहकांना ईव्ही मालकीचा खर्च कमी करण्यास मदत होणार असून, इलेक्ट्रिक मोबिलिटी अधिक सहज उपलब्ध होईल.

Kia : आता एका क्लिकवर मिळणार तुमच्या गाडीची माहिती, किया इंडियाचा …

देशभरात मजबूत नेटवर्क
किया इंडियाचे देशभरात 402 शहरांमध्ये 891 टचपॉइंट्स आहेत. तसेच 130 सर्टिफाइड प्री-ओन्ड आउटलेट्सच्या माध्यमातून ग्राहकांना विक्री, सेवा आणि वाहन एक्स्चेंजची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

कंपनीबाबत थोडक्यात
किया इंडियाने 2017 मध्ये आंध्र प्रदेश सरकारसोबत करार करून अनंतपूर जिल्ह्यात उत्पादन प्रकल्प उभारला. ऑगस्ट 2019 मध्ये उत्पादन सुरू झाले. कंपनीची वार्षिक उत्पादन क्षमता 3 लाख वाहनांची आहे. सध्या कंपनीने भारतीय बाजारात Seltos, Syros, Sonet, Carens, Carnival, EV6, EV9, Carens Clavis आणि Carens Clavis EV अशी नऊ मॉडेल्स सादर केली आहेत.

Web Title: Kia india records remarkable sales in may business sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 05:41 PM

Topics:  

  • automobile
  • Business
  • cars
  • india
  • kia
  • kia sonet

संबंधित बातम्या

या आहेत जगातील ‘सर्वात वेगवान’ सुपरकार! स्पीड रेकॉर्ड पाहून व्हाल थक्क
1

या आहेत जगातील ‘सर्वात वेगवान’ सुपरकार! स्पीड रेकॉर्ड पाहून व्हाल थक्क

देहविक्री करणाऱ्या महिलांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; ‘त्या’ ७० वर्षे जुन्या कायद्याची केली मोठी व्याख्या
2

देहविक्री करणाऱ्या महिलांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; ‘त्या’ ७० वर्षे जुन्या कायद्याची केली मोठी व्याख्या

7,000 आलिशान आणि दुर्मिळ कारचा संग्रह! हे आहे जगातील सर्वात मोठे कारचे कलेक्शन!
3

7,000 आलिशान आणि दुर्मिळ कारचा संग्रह! हे आहे जगातील सर्वात मोठे कारचे कलेक्शन!

जेन झी जनरेशनच्या ‘या’ आहेत टॉप पाच आवडत्या आणि ट्रेंडी बाईक्स!
4

जेन झी जनरेशनच्या ‘या’ आहेत टॉप पाच आवडत्या आणि ट्रेंडी बाईक्स!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.