Lilavati Hospital Robotic O-Arm: (फोटो- सोशलमीडिया)
लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने मॅझोर एक्स स्टील्थ एडिशनसह एकीकृत नेक्स्ट-जनरेशन एआय-सक्षम रोबोटिक ओ-आर्म® लाँच केले आहे. लाँच करण्यात आलेले हे तंत्रज्ञान जागतिक दर्जाच्या क्लिनिकल पायाभूत सुविधांद्वारे नाविन्यता-संचालित, रुग्णकेंद्रित आरोग्यसेवा प्रदान करण्याप्रती हॉस्पिटलच्या कटिबद्धतेतील आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
हा एकात्मिक प्लॅटफॉर्म गुंतागुंतीच्या स्पाईन शस्त्रक्रियांदरम्यान सर्जन्सना साहाय्य करण्यासाठी रीअल-टाइम २डी आणि ३डी इंट्राऑपरेटिव्ह इमेजिंग, एआय-सहाय्यित सर्जिकल नियोजन, रोबोटिक मार्गदर्शन आणि प्रगत नेव्हिगेशन एकत्र आणतो. मणक्याची अंतर्गत रचना आपोआप ओळखून, रचनांचे मोजमाप करून आणि योग्य स्क्रू आकार, अचूक दिशा तसेच प्रत्यारोपणाची योग्य जागा सुचवून ही यंत्रणा सर्जिकल नियोजन अधिक सक्षम करते. तसेच, शस्त्रक्रियेदरम्यान सर्जनचे प्रत्येक क्लिनिकल निर्णयावर संपूर्ण नियंत्रण राहील याची खात्री देते. Lilavati Hospital Robotic O-Arm:
हे सॉफ्टवेअर व्हर्टिब्रा, पेडिकल्स, एंडप्लेट्स आणि मुख्य शारीरिक खुणा काही सेकंदांत अचूक ओळखण्यासाठी प्रगत अल्गोरिदमचा वापर करते. हजारो प्रमाणित सर्जिकल प्लॅनिंग पॅरामीटर्सचा संदर्भ घेऊन ते सर्जन्सना इम्प्लांटचे आकारमान आणि अचूक दिशा सुचवून मदत करते, जे क्लिनिकल अभ्यासाच्या आधारे स्वीकारले, बदलले किंवा नाकारले जाऊ शकते. शस्त्रक्रियेदरम्यान, रोबोटिक यंत्रणा उपकरणांच्या सातत्यपूर्ण ट्रॅकिंगसह नियोजित दिशा राखण्यास मदत करते, तर ओ-आर्म® रीअल-टाइम पडताळणीसाठी उच्च-रिझोल्यूशन इमेजिंग देते.
हे प्लॅटफॉर्म डीजनरेटिव्ह स्पाईन डिसऑर्डर, स्कोलियोसिस, कायफोसिस, स्पाईन ट्रॉमा, ट्यूमर, इन्फेक्शन्स आणि रिव्हिजन स्पाईन सर्जरींसह मणक्याशी संबंधित विकारांवरील उपचारांमध्ये साहाय्य करते. हे विशेषतः अधिक अचूकता आवश्यक असलेल्या मिनिमली इन्वेसिव्ह आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी अत्यंत मोलाचे ठरते. नेव्हिगेशन-सहाय्यित रोबोटिक तंत्रज्ञानाने क्लिनिकल लक्षणे आणि सर्जिकल स्वरूपानुसार स्पायनल इम्प्लांट आणि पेडिकल स्क्रू बसवण्यात ९५ ते ९९ टक्के अचूकता सिद्ध केली आहे.
या प्रसंगी मत व्यक्त करत लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे पर्मनंट ट्रस्टी श्री. राजीव मेहता म्हणाले, “लीलावती हॉस्पिटलमध्ये आम्ही करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये रुग्णांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देतो, तसेच क्लिनिकल उत्कृष्टता देणाऱ्या जागतिक स्तरावरील प्रगत तंत्रज्ञानामध्ये सातत्याने गुंतवणूक करतो.
मॅझोर एक्स स्टील्थ एडिशनसह एआय-सक्षम रोबोटिक ओ-आर्म®चा समावेश आमच्या सर्जन्सना उपलब्ध असणाऱ्या सर्वोत्तम आणि अत्याधुनिक टूल्सचा पुरवठा करण्याप्रती आमच्या कटिबद्धतेला निदर्शनास आणतो, ज्यामुळे अधिक अचूकता, सुव्यवस्थित सर्जिकल कार्यपद्धती आणि रुग्णांसाठी अधिक चांगले वैद्यकीय परिणाम साध्य करता येतील. ही गुंतवणूक भारतातील रुग्णांसाठी जागतिक दर्जाचे आरोग्यसेवा तंत्रज्ञान सहज उपलब्ध करून देण्याप्रती आमच्या दृष्टिकोनाला अधिक दृढ करते.”
लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर डॉ. रवींद्र करंजेकर म्हणाले, “रुग्णांसाठी हे तंत्रज्ञान स्पाईन सर्जरीच्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण प्रगती आहे. एआय-सहाय्यित नियोजन, रोबोटिक मार्गदर्शन आणि रीअल-टाइम इमेजिंगमुळे सर्जन्सना विशेषतः गुंतागुंतीच्या आणि मिनिमली इन्वेसिव्ह केसेसमध्ये अधिक आत्मविश्वासाने अत्यंत अचूक शस्त्रक्रिया करता येतात. इम्प्लांट अधिक अचूक बसवल्याने उतींना होणारा त्रास कमी होऊ शकतो, पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची शक्यता कमी होते, हॉस्पिटलमधील मुक्काम कमी होतो आणि रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. हे तंत्रज्ञान उत्कृष्ट मार्गदर्शन पुरवत असले, तरी शस्त्रक्रियेसंबंधी प्रत्येक निर्णय पूर्णपणे संबंधित सर्जनला घ्यावा लागतो, ज्यामुळे रुग्णाच्या उपचारांमध्ये क्लिनिकल तज्ज्ञतेला प्राधान्य दिले जाईल याची खात्री मिळते.”
एआय-सक्षम रोबोटिक ओ-आर्म® आणि मॅझोर एक्स स्टील्थ एडिशनच्या समावेशासह लीलावती हॉस्पिटलने अचूक वैद्यकीय उपचार पद्धतींना पुढे नेणाऱ्या, रुग्णांचे आरोग्य परिणाम सुधारणाऱ्या आणि भारतातील स्पाईन व न्यूरोसर्जिकल केअरमध्ये नवीन मापदंड प्रस्थापित करणाऱ्या अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात आपले अग्रगण्य स्थान अधिक दृढ केले आहे.






