Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra budget session 2025 Live: चार चाकी वाहनांची किंमत वाढली ते 70 टक्के सर्वसामान्यांचे वीज बील शून्य

Maharashtra Assembly Budget Session 3rd March 2025 Live Updates : अर्थमंत्री अजित पवार आज (10 मार्च) ११ व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. जनतेला बजेटमधून काय अपेक्षित?

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 10, 2025 | 04:24 PM
Maharashtra Assembly Budget Session Live

Maharashtra Assembly Budget Session Live

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra Assembly Budget Session 2025 Live : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आज २०२५-२६ चा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प आहे. शुक्रवारी सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर ७.३ टक्के राहण्याचा अंदाज आहे. शुक्रवारी विधानसभेत सादर केलेल्या सरकारच्या पूर्व-अर्थसंकल्पीय आर्थिक सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, डिसेंबर २०२४ पर्यंत लाडकी बहीण योजनेच्या २.३८ कोटी महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात १७,५०५.९० कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार विक्रमी ११ व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

#थेटप्रसारण
उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री @AjitPawarSpeaks विधानसभेत #अर्थसंकल्प२०२५ सादर करीत आहेत.#LIVE#Budget2025
https://t.co/P90Obvqay9
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 10, 2025
The liveblog has ended.
  • 10 Mar 2025 03:16 PM (IST)

    10 Mar 2025 03:16 PM (IST)

    सार्वजनिक बांधकाम- इमारती विभागास 1 हजार 367 कोटी रुपये

    सन 2025-26 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरीता सार्वजनिक बांधकाम- इमारती विभागास 1 हजार 367 कोटी रुपये, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागास 3 हजार 159 कोटी रुपये, सामान्य प्रशासन विभागास 2 हजार 899 कोटी रुपये, मराठी भाषा विभागास 225 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.

  • 10 Mar 2025 03:10 PM (IST)

    10 Mar 2025 03:10 PM (IST)

    चारचाकी गाड्या महागणार

    चारचाकी गाड्यांवर 1 टक्क्यांनी करवाढ करण्यात येणार आहे.

  • 10 Mar 2025 03:07 PM (IST)

    10 Mar 2025 03:07 PM (IST)

    नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी नमामि गोदावरी अभियान

    नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी नमामि गोदावरी अभियान करण्यात येणार आहे.

  • 10 Mar 2025 03:03 PM (IST)

    10 Mar 2025 03:03 PM (IST)

    क्रीडा स्पर्धांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ

    छत्रपति शिवाजी महाराज चषक कबड्डी तसेच व्हॉलीबॉल स्पर्धा, स्वर्गीय खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा, भाई नेरुरकर चषक खो-खो स्पर्धा या चार राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करुन ते प्रत्येकी 75 लाखावरुन 1 कोटी रुपये करण्यात येणार आहे.

  • 10 Mar 2025 03:01 PM (IST)

    10 Mar 2025 03:01 PM (IST)

    उत्पादन शुल्क विभागास 153 कोटी रुपये

    सन 2025-26 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरीता गृह-पोलीस विभागास 2 हजार 237 कोटी रुपये, उत्पादन शुल्क विभागास 153 कोटी रुपये, विधी व न्याय विभागास 759 कोटी रुपये व महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयास 547 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.

  • 10 Mar 2025 02:56 PM (IST)

    10 Mar 2025 02:56 PM (IST)

    राज्यात 18 न्यायालयं उभारली

    राज्यात 18 न्यायालयं उभारली जाणार आहेत.

  • 10 Mar 2025 02:51 PM (IST)

    10 Mar 2025 02:51 PM (IST)

    लाडकी बहीणसाठी आतापर्यंत 33 हजार 232 कोटी खर्च

    लाडकी बहीणसाठी आतापर्यंत 33 हजार 232 कोटी खर्च  झाल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे.

  • 10 Mar 2025 02:48 PM (IST)

    10 Mar 2025 02:48 PM (IST)

    नळजोडणीसाठी 3200 कोटींचा निधी मंजूर

    नळजोडणीसाठी 3200 कोटींचा निधी मंजूर करण्यात येणार आहे.

  • 10 Mar 2025 02:47 PM (IST)

    10 Mar 2025 02:47 PM (IST)

    0 ते 100 युनिट वी वापरणाऱ्यांना छतावरील सौरवीज योजना

    0 ते 100 युनिट वी वापरणाऱ्यांना छतावरील सौरवीज योजना आणण्यात आले आहे.

  • 10 Mar 2025 02:45 PM (IST)

    10 Mar 2025 02:45 PM (IST)

    1 लाख 48 हजार कामे मार्च 2026 पर्यंत कामे पूर्ण करणार

    1 लाख 48 हजार कामे मार्च 2026 पर्यंत कामे पूर्ण करण्यात येणार आहे.

  • 10 Mar 2025 02:43 PM (IST)

    10 Mar 2025 02:43 PM (IST)

    अन्न आणि नागरी पुरवठा विभागाला 526 कोटींची तरतूद

    अन्न आणि नागरी पुरवठा विभागाला 526 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

  • 10 Mar 2025 02:41 PM (IST)

    10 Mar 2025 02:41 PM (IST)

    आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरण लवकरच जाहीर

    आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

  • 10 Mar 2025 02:40 PM (IST)

    10 Mar 2025 02:40 PM (IST)

    कृषि विभागासाठी 9 हजार 710 कोटींची तरतूद

    कृषि विभागासाठी 9 हजार 710 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

  • 10 Mar 2025 02:38 PM (IST)

    10 Mar 2025 02:38 PM (IST)

    एक तालुका एक बाजार समिती योजना राबवणार - अजित पवार

    एक तालुका एक बाजार समिती योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.

  • 10 Mar 2025 02:37 PM (IST)

    10 Mar 2025 02:37 PM (IST)

    परिवहन विभागासाठी 3 हजार 610 कोटी रुपयांची तरतूद

    परिवहन विभागासाठी 3 हजार 610 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

  • 10 Mar 2025 02:35 PM (IST)

    10 Mar 2025 02:35 PM (IST)

    45 लाख कृषिपंपांना मोफत वीज पुरवली जातेय

    45 लाख कृषिपंपांना मोफत वीज पुरवली जाते असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.

  • 10 Mar 2025 02:34 PM (IST)

    10 Mar 2025 02:34 PM (IST)

    तापी महापुनर्भरण महत्त्वाकांक्षी योजना

    तापी महापुनर्भरण महत्त्वाकांक्षी योजना असून पर्यटन केंद्रे, तीर्थक्षेत्रे,गड, किल्ले, अभयारण्ये रस्त्याने जोडण्यात येणार आहे.

  • 10 Mar 2025 02:33 PM (IST)

    10 Mar 2025 02:33 PM (IST)

    पुण्यात दुसऱ्या टप्प्यात दोन मेट्रो मार्ग उभारणार

    पुण्यात दुसऱ्या टप्प्यात दोन मेट्रो मार्ग उभारण्यात येणार आहे.

  • 10 Mar 2025 02:29 PM (IST)

    10 Mar 2025 02:29 PM (IST)

    एसटी महामंडळाच्या 6000 डिझेल बसेसचं CNG परिवर्तन करणार

    येत्या वर्षात पुण्यात 23.2 किमी मेट्रोचे मार्ग सुरु होणार असून एसटी महामंडळाच्या 6000 डिझेल बसेसचं CNG परिवर्तन करण्यात येणार आहे.

  • 10 Mar 2025 02:28 PM (IST)

    10 Mar 2025 02:28 PM (IST)

    मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्गाने जोडणार

    मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्गाने जोडण्यात येणार आहे.

  • 10 Mar 2025 02:23 PM (IST)

    10 Mar 2025 02:23 PM (IST)

    उद्योग विभागास कार्यक्रम खर्चासाठी 1021 कोटींची तरतूद

    उद्योग विभागास कार्यक्रम खर्चासाठी 1021 कोटींची तरतूद करण्यात आली.

  • 10 Mar 2025 02:23 PM (IST)

    10 Mar 2025 02:23 PM (IST)

    नोव्हेंबर 2028 पर्यंत 3 लाख 58 हजारांची उत्पाने निर्यात

    2030 पर्यंत वाढवण बंदर  सुरू करण्याचं लक्ष्य असून नोव्हेंबर 2028 पर्यंत 3 लाख 58 हजारांची उत्पाने निर्यात होणार असल्याचे यावेळी अर्थमंत्र्यांनी सांगितले.

  • 10 Mar 2025 02:21 PM (IST)

    10 Mar 2025 02:21 PM (IST)

    मुंबईतलं तिसरं विमानतळ वाढवण बंदराजवळ

    यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली असून मुंबईतलं तिसरं विमानतळ वाढवण बंदराजवळ असणार आहे.

  • 10 Mar 2025 02:20 PM (IST)

    10 Mar 2025 02:20 PM (IST)

    पाच वर्षात 50 लाख नवे रोजगारनिर्मितीचं उद्दिष्ट

    पाच वर्षात 50 लाख नवे रोजगारनिर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती अर्थमंत्र्यांकडून देण्यात आले आहे.

  • 10 Mar 2025 02:18 PM (IST)

    10 Mar 2025 02:18 PM (IST)

    पर्यटनाला बंदर करातून सूट

    सूक्ष्म व लघु उद्योग धोरण जाहीर करण्यात आले असून पर्यटनाला बंदर करातून सूट देण्यात आली आहे.

  • 10 Mar 2025 02:16 PM (IST)

    10 Mar 2025 02:16 PM (IST)

    मायक्रोसॉफ्टकडून महिलांना एआयचं प्रशिक्षण

    मायक्रोसॉफ्टकडून महिलांना एआयचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

  • 10 Mar 2025 02:16 PM (IST)

    10 Mar 2025 02:16 PM (IST)

    नवी मुंबईत नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी उभारणार

    नवी मुंबईत नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे.

  • 10 Mar 2025 02:14 PM (IST)

    10 Mar 2025 02:14 PM (IST)

    महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशनची स्थापना

    महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशनची स्थापना होणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.

  • 10 Mar 2025 02:12 PM (IST)

    10 Mar 2025 02:12 PM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यातल्या रस्त्याच्या कामांसाठी 500 कोटींची तरतूद

    गडचिरोली जिल्ह्यातल्या रस्त्याच्या कामांसाठी 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

  • 10 Mar 2025 02:12 PM (IST)

    10 Mar 2025 02:12 PM (IST)

    सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापारी केंद्रे उभारणार

    सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापारी केंद्रे उभारण्यात येणार आहे.

  • 10 Mar 2025 02:10 PM (IST)

    10 Mar 2025 02:10 PM (IST)

    16 लाख नवे रोजगार निर्माण होतील- अजित पवार

    नवे कामगार नियम तयार करण्यात येणार आहे. तसेच 16 लाख नवे रोजगार निर्माण होतील अशी माहिती यावेळी अर्थमंत्र्यांनी दिली आहे.

     

     

  • 10 Mar 2025 02:09 PM (IST)

    10 Mar 2025 02:09 PM (IST)

    महाराष्ट्राचं नवं औद्योगिक धोरण लवकरच जाहीर करणार - अजित पवार

    महाराष्ट्राचं नवं औद्योगिक धोरण लवकरच जाहीर करणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी यावेळ केली आहे.

  • 10 Mar 2025 02:07 PM (IST)

    10 Mar 2025 02:07 PM (IST)

    राज्यात देशी परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात

    राज्यात देशी परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्यात रोजगार देखील वाढत आहे.

  • 10 Mar 2025 02:06 PM (IST)

    10 Mar 2025 02:06 PM (IST)

    लाडक्या बहिणी मिळाल्या म्हणून धन्य झालो- अजितदादा 

    अर्थमंत्री अजित पवार महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी लाडक्या बहिणी मिळाल्या म्हणून धन्य झालो, असं म्हटलं आहे.

  • 10 Mar 2025 12:58 PM (IST)

    10 Mar 2025 12:58 PM (IST)

    आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करणार

    महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पापूर्वी खूप अपेक्षा आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आज विधानसभेत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करणार असल्याने, राज्य सरकार आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करेल आणि आर्थिक मदत वाढवेल अशी अपेक्षा आहे.

  • 10 Mar 2025 12:40 PM (IST)

    10 Mar 2025 12:40 PM (IST)

    विक्रमी ११ वे अर्थसंकल्प

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार सोमवारी दुपारी २ वाजता राज्याचा अकरावा अर्थसंकल्प सादर करतील. यासह, ते दुसऱ्यांदा जास्तीत जास्त वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री बनतील. सर्वाधिक विक्रम काँग्रेसचे माजी अर्थमंत्री शेषराव वानखेडे यांच्या नावावर आहे, ज्यांनी तेरा वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.

  • 10 Mar 2025 12:31 PM (IST)

    10 Mar 2025 12:31 PM (IST)

    महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू

    महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पुन्हा सुरू झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे कधीही राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यास तयार आहेत. अधिक अपडेट्ससाठी आणि कोणत्या विभागाला काय मिळाले याबद्दलच्या सर्व कव्हरेजसाठी आमच्यासोबत रहा.

  • 10 Mar 2025 12:30 PM (IST)

    10 Mar 2025 12:30 PM (IST)

    राजकोषीय तूट २.४% असण्याचा अंदाज

    २०२४-२५ साठी राज्याचा महसुली खर्च ५,१९,५१४ कोटी रुपये इतका अंदाज आहे, तर २०२३-२४ साठी सुधारित खर्चाचा अंदाज ५,०५,६४७ कोटी रुपये आहे. २०२४-२५ साठी राजकोषीय तूट २.४% असण्याचा अंदाज आहे, तर महसुली तूट ०.४% असण्याचा अंदाज आहे.

  • 10 Mar 2025 12:30 PM (IST)

    10 Mar 2025 12:30 PM (IST)

    खर्चात ३०% कपात होईल

    महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करताना पवार म्हणाले, “सुमारे २ लाख कोटी रुपयांची राजकोषीय तूट आणि निवडणुकीपूर्वीच्या लोकप्रिय खर्चामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. परिणामी, नियोजित खर्चाच्या फक्त ७०% खर्च होईल, खर्चात ३०% कपात होईल.

  • 10 Mar 2025 12:06 PM (IST)

    10 Mar 2025 12:06 PM (IST)

    लाडकी बहीण योजना सुरूच..

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच स्पष्ट केले की लाडकी बहीण योजना सुरूच राहील आणि त्याअंतर्गत आर्थिक मदत घेणाऱ्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी त्यांचे सरकार काम करत आहे असे सांगितले.

  • 10 Mar 2025 12:05 PM (IST)

    10 Mar 2025 12:05 PM (IST)

    परकीय गुंतवणुकीचा विक्रम

    डीपीआयआयटीच्या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या (२०२४-२५) केवळ नऊ महिन्यांत महाराष्ट्राने गेल्या १० वर्षातील सर्वाधिक वार्षिक थेट परकीय गुंतवणुकीचा विक्रम पार केला आहे. ते म्हणाले की, २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत एकूण १,३९,४३४ कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक आली आहे.

  • 10 Mar 2025 12:04 PM (IST)

    10 Mar 2025 12:04 PM (IST)

    महाराष्ट्राचा अर्थसंकल्प लवकरच सादर होणार

    अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी आहे. ते म्हणाले, “हे बजेट जनतेसाठी आहे. हे सरकार जनतेसाठी आहे. आम्ही या अडीच वर्षात लोकांसाठी काम केले आहे. आम्ही लोकांच्या विकासासाठी, त्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी काम केले. पुढील पाच वर्षांतही असेच काम केले जाईल.”

Web Title: Maharashtra budget session 2025 live updates in marathi assembly deputy cm ajit pawar parliament session mahayuti government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2025 | 11:58 AM

Topics:  

  • ajit pawar
  • BJP
  • devendra fadnavis
  • Maharashtra Assembly Budget Live
  • Maharashtra State Budget 2025 Session

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
2

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
3

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
4

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.