मोखाड्यात वैधपणे मद्य वाहतूक करणारी कार पोलिसांच्या ताब्यात
दीपक गायकवाड/मोखाडा: मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान गुप्त माहितीद्वारे मोखाडा चौफुलीवर नाकाबंदी केली असता, जव्हार बाजूकडून नाशिक बाजूकडे सफेद रंगाची i20 कार भरधाव वेगाने गेली. सदर कार अडवण्याचा मोखाडा पोलिसांनी आटोकाट प्रयत्न केला. परंतु पोलिसांना न जु्मानता कार चालक मुकेश परमार राहणार वापी याने कार तशीच पुढे नेली मात्र मोखाडा पोलिसांनी शर्तीचा पाठलाग करून सदरची कार निळमाती दरम्यान शिथाफिने पकडली आहे. यावेळी कार मध्ये 615990/-सहा लाख पंधरा हजार नवूशे नव्वद रुपयांचा मद्यसाठा जप्त करून चालक परमार याला मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.
मोखाडा पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मोखाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रेमनाथ ढोले यांना सफेद रंगाच्या कार मधून जव्हार कडून नाशिककडे अवैध मद्य साठा वाहतूक केली जाणार असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाल्यावरून ढोले यांनी विभागीय गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत दहिफळे यांना सदर खबरी बाबत अवगत करून मोखाडा चौफुली येथे नाकाबंदी करण्यास सांगितले. यावेळी दहिफळे यांच्या सोबत असलेले चालक बापू नागरे, पोलीस हवालदार शशिकांत भोये, काशिनाथ कव्हा असे चौघे नाकाबंदी करत असताना एक सफेद रंगाची i20 कार भरधाव वेगाने येताना दिसली. कार चालकाला थांबण्याचा इशारा केला परंतु कार थांबली नाही.तेव्हा नाकाबंदीवर असलेले अधिकारी, अंमलदार, हवालदार व प्रभारी अधिकारी ढोले यांनी सदर कारचा पाठलाग करून निळमाती येथे कार पकडली. यावेळी कारची तपासनी केली असता दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. दोन पंचांना बोलावून जागेवरच पंचनामा करून कार चालक मुकेश परमार राहणार वापी याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
कर्जत तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी करणार, गटविकास अधिकाऱ्यांचा विश्वास
सदर गुन्ह्यात 6 लाख 15 हजार 990 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सुचनेनुसार प्रभारी पोलीस अधिकारी प्रेमनाथ ढोले यांनी केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत दहिफळे करीत आहेत.