Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MakeMyTrip Axis Bank Offer : फिरण्याचा प्लॅन करताय? मेकमायट्रिप अन् ॲक्सिस बँक देतंय मोठं डिस्काउंट, मिळणार बंपर सूट

MakeMyTrip Axis Bank Offer : सुट्ट्यांमध्ये फिरण्याचा प्लॅन करणाऱ्यांसाठी एक उत्तम बातमी आहे. MakeMyTrip आणि Axis Bank एकत्र येत लाँग वीकेंड्सच्या प्रवासावर विशेष ऑफर्स आणि सवलती देण्याची घोषणा केली आहे. नेमके काय आहेत प्लॅन?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 25, 2026 | 12:19 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • लाँग वीकेंडला फिरणं होणार स्वस्त!
  • मेकमायट्रिप आणि ॲक्सिस बँकेची मोठी पार्टनरशिप
  • बंपर ऑफर मिळणार बंपर सूट
MakeMyTrip Axis Bank Offer : MakeMyTrip आणि भारतातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या Axis Bank ने आज एका भागीदारीची घोषणा केली आहे. याअंतर्गत, आज महत्त्वाच्या लाँग वीकेंड्स आणि ऐन सुट्ट्यांच्या काळात विशेष ट्रॅव्हल बेनिफिट्स देण्यासाठी भागीदारीची घोषणा केली आहे.  त्यामुळे आता तुम्हाला बेस्ट ऑफर मिळणार आहेत. नेमकी काय आहे ऑफर आणि या भागिदारीमुळे ग्राहकांना काय फायदा होणार आहे? सविस्तर जाणून घेऊयात. ( MakeMyTrip Axis Bank Offer ) 

Sugar Price : काय सांगताय? 13-14 रुपयांना मिळतेय इथे 65 रुपयांची साखर, कोण खरेदी करु शकतं? जाणून घ्या

आजकाल प्रवास हा केवळ अधूनमधून केली जाणारी चैन राहिली नाही. तर आता ही सवय वर्षभर जोपासावी अशी सवय बनवी आहे. पर्यटक आता वर्षभरात लहान-लहान सुट्ट्यांमध्ये कमी कालावधींच्या सुट्ट्यांना फिरायला जाण्यासाठी पसंती देत आहेत. विशेषतः त्यात लाँग वीकेंड्स हे ट्रॅव्हल बुकिंगसाठी सर्वाधिक लोकप्रिय कालावधी ठरत आहेत.

‘लाँग वीकेंड कॅलेंडर’साठी नवा प्रोग्राम

भारतातील ‘लाँग वीकेंड कॅलेंडर’ लक्षात घेऊन या साठी फायदेशीर ठरणारा नवा प्रोग्राम तयार करण्यात आला आहे. ज्यामुळे या प्रोग्राममधून वर्षभरातील विविध सणांच्या आणि सुट्ट्यांच्या काळात वारंवार ट्रॅव्हल बेनिफिट्स देईल. यामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स, हॉटेल्स, हॉलिडेज, टुअर्स आणि ॲटॅक्शन्स, बस आणि कॅब बुकिंगचा समावेश आहे. यामुळे अचानक ठरवलेले किंवा पूर्वनियोजित प्रवास करणे अधिक सहज, सोपा आणि परवडणारा ठरणार आहे. यामुळे प्रवाशांनाही अचानक ठरवलेल्या सहलींचा देखील पुरेपूर आनंद घेता येईल. प्रत्येक वेळी लाँग वीकेंडच्या अगोदर एक विशेष बुकिंग विंडो खुली केली जाईल, ज्याद्वारे ग्राहकांना वेगवेगळ्या ट्रॅव्हल कॅटेगरीवर एक्सक्लुझिव्ह ऑफर्सचा लाभ घेता येईल.

ॲक्सिस बँकेसोबतची भागीदारी बदलाची सुरुवात

MakeMyTrip चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर राज ऋषी सिंग म्हणाले,, “आजकाल मार्केटिंग म्हणजे फक्त मोठ्या मोठ्या घोषणा करणं नसून त्या घोषणा योग्य वेळी करुन त्यांची संधी उपलब्ध करुन देणं आहे. ॲक्सिस बँकेसोबतची ही भागीदारी याच बदलाची सुरुवात आहे. जेव्हा प्रवासी ट्रिपचा निर्णय घेतल असतात तेव्हा त्यांना त्याच क्षणी त्यांना खरा आर्थिक फायदा मिळवून देणे हा आमचा उद्देश आहे. आणि त्यांनी घेतलेला निर्णय योग्य ठरवणं गरजेचं आहे.”

‘लॉन्ग वीकेंड्स’ ही प्रवासासाठी उत्तम संधी

Axis Bank चे ग्रुप हेड – ॲक्वायरिंग अँड कार्ड्स, विनीत बजाज म्हणाले, “प्रवास हा नेहमीच महत्त्वाचं क्षेत्र राहिलं आहे, कारण ग्राहक त्यांच्या दैनंदिन खर्चातून अर्थपूर्ण अनुभव मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. ‘लॉन्ग वीकेंड्स’ ही प्रवासासाठी उत्तम संधी असते आणि लोक वर्षभरात छोट्या सहलींचे नियोजन करून त्याचा पुरेपूर लाभ घेत असतात. हेच लाभ MakeMyTrip सोबतच्या जोडल्यामुळे अधिक योग्य आणि सुखद होणार आहेत. ज्यामुळे आमच्या कार्डधारकांसाठी प्रवासाचे नियोजन अधिक फायदेशीर आणि सुलभ होईल. हा सहयोग वेगळे प्रवास अनुभव देण्याच्या आणि Axis Bank क्रेडिट कार्ड्सद्वारे ग्राहकांना मिळणारे मूल्य वाढवण्याच्या आमच्या वचनबद्धतेला अधिक बळकट करतो.”

मिळणार इतकी सुट

या ऑफरचा भाग म्हणून, MakeMyTrip वर बुकिंग करताना Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरणाऱ्या प्रवाशांना देशांतर्गत विमान प्रवासावर थेट १०% सूट (१,८०० रुपयांपर्यंत) आणि देशांतर्गत हॉटेल बुकिंगवर १५% पर्यंत थेट सूट (५,००० रुपयांपर्यंत) मिळेल. आंतरराष्ट्रीय उड्डाणे, हॉटेल्स, बसेस, कॅब्ज, टूर्स आणि पर्यटन स्थळांच्या बाबतीतही असेच फायदे उपलब्ध असतील. ‘मेक-माय-ट्रिप’च्या सध्याच्या हॉलिडे ऑफर्सव्यतिरिक्त, ॲक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्ड्सचा वापर केल्यास हॉलिडे पॅकेजेसवर अतिरिक्त ५% त्वरित सवलत मिळेल; ही सवलत जास्तीत जास्त २०,००० रुपयांपर्यंत मर्यादित असेल.

ही ऑफर ‘मेक-माय-ट्रिप’ प्लॅटफॉर्मवर ‘चेकआउट’ करताना उपलब्ध असेल. प्रत्येक ‘लॉन्ग वीकेंड’च्या आधी, पेमेंट पेजवर संबंधित फायदे आणि ऑफरचा तपशील दिसून येईल. किमान बुकिंग मूल्यांसह अटी व शर्तींचा संपूर्ण तपशील प्रत्येक ऑफर सुरू होण्याच्या तारखेपूर्वी ‘मेक-माय-ट्रिप’ ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाईल.

लॉन्ग वीकेंडच्या तारखा

गांधी जयंती २ ते ४ ऑक्टोबर २०२६
दसरा १८ ते २० ऑक्टोबर २०२६
दिवाळी ७ ते ९ नोव्हेंबर २०२६
ख्रिसमस २५ ते २७ डिसेंबर २०२६
नवीन वर्ष १ ते ३ जानेवारी २०२७
प्रजासत्ताक दिन २४ ते २६ जानेवारी २०२७
होळी २० ते २२ मार्च २०२७
गुड फ्रायडे २६ ते २८ मार्च २०२७

Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा दुसरा हप्ता खात्यात, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती

Web Title: Makemytrip axis bank offer for long weekends travel discounts marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 12:19 PM

Topics:  

  • axis bank
  • Big Offer
  • travel news

संबंधित बातम्या

Travel News : पिंकपासून ब्लू आणि ऑरेंजपर्यंत… या ठिकाणांच्या नावात दडलीये रंजक कहाणी
1

Travel News : पिंकपासून ब्लू आणि ऑरेंजपर्यंत… या ठिकाणांच्या नावात दडलीये रंजक कहाणी

Swiggy Financial Services : अन्न उद्योजकांसाठी सुवर्णसंधी! Swiggy Instamart कडून ₹5 कोटींपर्यंत कर्ज; NOICE ब्रँडचा मेगाप्लॅन
2

Swiggy Financial Services : अन्न उद्योजकांसाठी सुवर्णसंधी! Swiggy Instamart कडून ₹5 कोटींपर्यंत कर्ज; NOICE ब्रँडचा मेगाप्लॅन

Navratri 2026 : या ठिकाणी आहेत देवीच्या 9 रूपांची मंदिरे, नवरात्रीत भरते भक्तांची गर्दी
3

Navratri 2026 : या ठिकाणी आहेत देवीच्या 9 रूपांची मंदिरे, नवरात्रीत भरते भक्तांची गर्दी

हनिमूनसाठी कुठे जावं? बर्फापासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत हे रोमँटिक ठिकाण ठरतात कपल्सची पहिली पसंत
4

हनिमूनसाठी कुठे जावं? बर्फापासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत हे रोमँटिक ठिकाण ठरतात कपल्सची पहिली पसंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.