Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झुकरबर्गचा AI प्लॅन फसला! 60% कर्मचारी कपातीपासून यू-टर्नपर्यंत, काय होता ‘Project OT’?

झुकरबर्गचा गुप्त 'प्रोजेक्ट ओटी'... एआयमुळे ६० टक्के कर्मचारी कपात होणे अपेक्षित होते, पण एका चुकीमुळे संपूर्ण योजनाच उलटली. पण तरीसुद्धा हा धोका आता टळला असला तरीसुद्धा पुढेही याची टांगती तलवार कायम राहणार आहे असे दिसते. हा प्रोजेक्ट नक्की काय होता ते पाहूयात..

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 27, 2026 | 12:40 PM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • झुकरबर्गचा गुप्त ‘Project OT’ नेमका काय होता?
  • काही टीम्समध्ये 60% पर्यंत कर्मचारी कपातीचा विचार
  • AI एजंट्समुळे तांत्रिक आणि सुरक्षाविषयक समस्यांमध्ये वाढ
 

मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्गने मेटाच्या कर्मचाऱ्यांच्या जागी एआय (AI) आणण्यासाठी एक सुप्त ‘प्रोजेक्ट ओटी’ तयार केला होता. हा प्रोजेक्ट एवढा विशाल होता की, त्यामुळे ६० टक्क्यांपर्यंत कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची योजना शक्यता होती. पण याला प्रचंड विरोधा झाला आणि त्याचबरोबर हे सुप्त तंत्रज्ञान अयशस्वी ठरल्यामुळे झुकरबर्गला ही योजना गुंडाळण्यास भाग पडले. हा प्रोजेक्ट यशस्वी झाला असता तर आयटी क्षेत्रात मोठी बेरोजगारी आली असती. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया

मार्क झुकरबर्गने त्याच्या ‘मेटा‘ या कंपनीत एक असा प्रयोग करण्याची योजना आखली होती, जी जागतिक तंत्रज्ञान उद्योगासाठी एक आदर्श ठरू शकली असती. यात हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून त्यांचे काम कृत्रिम बुद्धिमत्तेकडे (AI) सोपवण्याची ही योजना होती. पण ‘एआयच्या भविष्या’चे हे स्वप्न काही महिन्यांतच भंगले. झुकरबर्गला त्याच्याच कर्मचाऱ्यांच्या बंडाचा सामना करावा लागला. इतकेच नव्हे, तर हे टोकाचे पाऊल उचलण्यासाठी ज्या एआयवर तो अवलंबून होता, तिनेही त्याचा विश्वासघात केला. म्हटले जाते.

इकॉनॉमिक टाइम्समधील एका अहवालानुसार, या वर्षी जानेवारीमध्ये झुकरबर्गने हवाईमधील आपल्या घरी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक गुप्त बैठक घेतली होती. तिथेच “प्रोजेक्ट ओटी” (ऑर्गनायझेशनल ट्रान्सफॉर्मेशन) चा पाया घातला गेला. या योजनेचा उद्देश मेटाला पूर्णपणे “एआय नेटिव्ह” कंपनीमध्ये रूपांतरित करणे हा होता. अंतर्गत माहितीनुसार, व्यवस्थापन काही टीम्समधील ६० टक्क्यांपर्यंत कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या तयारीत होते. व्हर्च्युअल वर्कर्स, किंवा एआय एजंट्सवर देखरेख करण्यासाठी सर्वोत्तम प्रतिभा निवडण्याकरिता उर्वरित कर्मचाऱ्यांची निवड केली जाणार होती. कंपनीने पूर्वीची व्यवस्थापकीय पदे रद्द केली आणि “टेक पॉड्स” तयार करण्यास सुरुवात केली. ही मोठी कर्मचारी कपात मे ते नोव्हेंबर या दोन टप्प्यांत राबवली जाणार होती.

Egg Price Hike: दुष्काळात तेरावा महिना! अजून काय काय बघावं लागणार? साखर, कांद्यानंतर आता अंड्यांच्या दरात वाढ

माउस ट्रॅकिंगमुळे कर्मचारी संतप्त

मार्च महिन्यात संभाव्य कर्मचारी कपातीची बातमी बाहेर फुटल्याने कंपनीत खळबळ उडाली. जेव्हा व्यवस्थापनाने अमेरिकेतील कर्मचाऱ्यांच्या सिस्टीमवर ट्रॅकिंग सॉफ्टवेअर स्थापित केले, तेव्हा परिस्थिती आणखी चिघळली. माणसांप्रमाणे कामे करण्यासाठी एआयला (AI) प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने, त्यांच्या कीबोर्ड आणि माऊसच्या क्लिक्सची नोंद करणे हा त्यामागील हेतू होता. कर्मचाऱ्यांना असे वाटू लागले की ते एआयला त्यांची नोकरी घेण्यासाठी प्रशिक्षित करत आहेत. परिणामी, कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य ७४ टक्क्यांवरून ५५ टक्क्यांपर्यंत घसरले. कंपनीच्या अंतर्गत नेटवर्क, वर्कप्लेसवर मीम्स दिसू लागले आणि कर्मचाऱ्यांनी मुख्य तंत्रज्ञान अधिकारी अँड्र्यू बॉसवर्थ यांच्याशी थेट वादविवादात भाग घेतला.

एआय प्रणालीने स्वतःहून चुका केल्या

या उठावादरम्यान, झुकरबर्गने ज्या तंत्रज्ञानावर विश्वास ठेवला होता तेदेखील अयशस्वी होऊ लागले. एआयच्या वापरामुळे कोडिंगचा वेग २२० टक्क्यांनी वाढला असला तरी, वापरकर्त्यांपर्यंत पोहोचणाऱ्या नवीन वैशिष्ट्यांची संख्या केवळ ३६ टक्क्यांनी वाढली. अनियंत्रित एआय एजंट्समुळे मोठ्या प्रमाणावर तांत्रिक समस्या निर्माण झाल्या. मागील वर्षाच्या तुलनेत तांत्रिक आणि सुरक्षाविषयक घटनांमध्ये ४० टक्क्यांनी वाढ झाली. त्याचा सर्वात मोठा तोटा तेव्हा दिसून आला, जेव्हा हॅकर्सनी मेटाच्या नवीन एआय सपोर्ट बॉटचा गैरफायदा घेऊन अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे जुने इंस्टाग्राम अकाउंट हॅक केले.

Business Loan : सरकारचा महत्त्वाचा निर्णय! MSME ला मिळणार मोठा निधी! ग्रामीण भागात सहज कर्ज होणार उपलब्ध

अचानक संपूर्ण निर्णय बदलावा लागला

कंपनीमधील दबाव वाढतच राहिला. १९ मेच्या रात्री, कर्मचारी कपातीच्या पहिल्या फेरीच्या काही तास आधी, झुकरबर्गने आपल्या अधिकाऱ्यांसोबत एक तातडीची बैठक घेतली. त्यांनी नोव्हेंबरमध्ये नियोजित असलेली दुसरी मोठी कर्मचारी कपात तात्काळ रद्द केली. दुसऱ्या दिवशी, २० मे रोजी, केवळ १० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले. त्यानंतर लगेचच, झुकरबर्गने जाहीर केले की या वर्षी कोणतीही मोठी कर्मचारी कपात होणार नाही. झालेले नुकसान नियंत्रणाचा एक भाग म्हणून कर्मचाऱ्यांचे माऊस ट्रॅकिंग बंद करण्यात आले. मेटा आता स्वतःला एक अशी कंपनी म्हणून सादर करते जी लोकांना मदत करण्यासाठी एआयचा वापर करते. तथापि, १३० अब्ज डॉलर्सच्या प्रचंड एआय बजेटमुळे झुकरबर्गवर गुंतवणूकदारांकडून तीव्र दबाव कायम आहे.

Web Title: Meta project ot zuckerberg ai employee cuts plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 12:40 PM

Topics:  

  • Business News
  • meta
  • Meta AI

संबंधित बातम्या

Social Media Time Limit: आता फक्त 2 तासच Facebook आणि Instagram वापरता येणार, Meta चा नवीन नियम आहे तरी काय?
1

Social Media Time Limit: आता फक्त 2 तासच Facebook आणि Instagram वापरता येणार, Meta चा नवीन नियम आहे तरी काय?

Egg Price Hike: दुष्काळात तेरावा महिना! अजून काय काय बघावं लागणार? साखर, कांद्यानंतर आता अंड्यांच्या दरात वाढ
2

Egg Price Hike: दुष्काळात तेरावा महिना! अजून काय काय बघावं लागणार? साखर, कांद्यानंतर आता अंड्यांच्या दरात वाढ

‘Maharashtra Energy Expo’ मध्ये पुणेकरांचे लक्ष! जेनस इनोव्हेशनकडून ‘हाय-फ्लो हायब्रिड सोलर इन्व्हर्टर’ सादर
3

‘Maharashtra Energy Expo’ मध्ये पुणेकरांचे लक्ष! जेनस इनोव्हेशनकडून ‘हाय-फ्लो हायब्रिड सोलर इन्व्हर्टर’ सादर

प्लांट-बेस्ड फूडची वाढती क्रेझ; KLAW Snacks ने Freshpik मध्ये Signature Series केली लॉन्च,चवीसोबत आरोग्यावरही भर
4

प्लांट-बेस्ड फूडची वाढती क्रेझ; KLAW Snacks ने Freshpik मध्ये Signature Series केली लॉन्च,चवीसोबत आरोग्यावरही भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.