
आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा जगात डंका! ( सौजन्य - सोशल मीडिया )
नाइट फ्रैंकच्या ताज्या ‘प्राइम ग्लोबल सिटीज इंडेक्स’ अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. यात 2026 च्या दुसऱ्या तिमाहीचे आकडे प्रकाशित करण्यात आले. यात जगातील ४६ प्रमुख रिअल इस्टेट शहरांची यात घोषित करण्यात आली. या आकडेवारीत मुंबईतील लक्झरी आणि प्रीमियम निवासी मालमत्तांच्या किमतींमध्ये वार्षिक 6.2 टक्क्यांची दमदार वाढ नोंदवली आहे. यामुळे मुंबईने जगातील ४६ प्रमुख रिअल इस्टेट शहरांच्या यादीत पहिल्या १० नंबरात स्थान पटकावलं आहे. मुंबई यात ८ व्या क्रमांकावर आहे. हे स्थान मिळवून पहिल्या १० क्रमांकामध्ये मुंबईने आपले स्थान मजबुत केले आहे.
तिमाही आधारावरही मुंबईचा विकासदर बराच वाढला आहे. हा आकडा १.७ टक्के वाढ झाली असून, हा दर जागतिक सरासरीच्या दुप्पट आहे. जगाच्या तुलनेने मुंबईचा विकासदर बऱ्याच वेगाने वाढला आहे. अहवालाचा विचार करता, सर्वेक्षणामधील ४६ शहरांपैकी ३२ शहरांमधील किमती झपाट्याने वाढत आहे. भारताच्या इतर शहरांमध्येही हा बदल दिसून आला आहे. यात बेंगळुरु शहराचा दर हा 4.5 टक्के असून वार्षिक वाढीसह हे शहर 12 व्या क्रमांकावर आहे. तर दिल्लीचाही यात नंबर लागतो 3.9 टक्के वाढी दर्शवत हे शहर 17 व्या स्थानावर आहे.
भारतातील ३ महत्त्व्याच्या शहरांचा सहभाग असलेल्या या यादीत पहिला क्रमांक टोकियोचा लागतो. जागतिक क्रमवारीत 50.7 टक्के वार्षिक वाढ दर्शवत हे शहर पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर नंबर लागतो 14.6 टक्क्यांसह मनीला शहराचा नंबर लागतो. अनुक्रमे मनीला (१४.६%), दुबई (१०.९%), सिंगापूर (९.५%) आणि नैरोबी (८.५%) यांचा क्रमांक लागतो. तसेच ख्राइस्टचर्च (६.९%) सहाव्या, सोल (६.४%) सातव्या, व्हिएन्ना (५.९%) नवव्या आणि सॅन फ्रान्सिस्को (५.०%) दहाव्या स्थानावर राहिले आहे.
नाइट फ्रैंक इंडियाचे अध्यक्ष शिशिर बैजल यांनी स्वतः स्पष्ट केलं की, जागतिक स्तरावर मंदावलेली परिस्थिती असताना मात्र मुंबईने या यादीतील पहिल्या १० मध्ये स्थान मिळवणं फार महत्त्वपूर्ण ठरतं. मुंबईचं मार्केट हे फार महत्त्वपूर्ण ठरतं. रिअल इस्टेटच्या अनुषंगाने दीर्घकालीन संपत्तीच्या निर्मितीसाठी आणि मजबूत मागणीशी जोडलेला आहे. त्यामुळे जागतिक लक्झरी हाऊसिंग मार्केटच्या अनुषंगाने विचार केला तर स्थानिक पुरवठ्यासह परकीय चलन आणि व्याजदर या घटकांचा परिणाम शहरांच्या कामगिरीवरही दिसून येऊ शकतो.