Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Real Estate Market 2025: देशभर घरविक्रीत घट; मात्र, ‘या’ शहरामध्ये घरविक्रीत झाली २९ टक्के वाढ 

रिअल इस्टेट क्षेत्राची स्थिती २०२५ मध्ये चांगली दिसून आली आणि मुंबई या क्षेत्रासाठी गतवर्ष आशादायी राहिले. २०२४ च्या तुलनेत देशभरात घरांच्या विक्रीमध्ये एक टक्क्याची घट झाली, मात्र मुंबईत घरविक्री यावर्षी जोमाने झाली.

  • By Priti Hingane
Updated On: Jan 13, 2026 | 01:15 PM
Real Estate Market: देशभर घरविक्रीत घट; मात्र, 'या' शहरामध्ये घरविक्रीत झाली २९ टक्के वाढ 

Real Estate Market: देशभर घरविक्रीत घट; मात्र, 'या' शहरामध्ये घरविक्रीत झाली २९ टक्के वाढ 

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रीमियम घरांच्या मागणीमुळे बाजारपेठेत घरखरेदी वधारली
  • मुंबई ही देशातील सर्वात मोठी गृहबाजारपेठ ठरली
  • यावर्षी मुंबईत तब्बल ९७,१८८ घरं विकली गेली
 

Real Estate Market: रिअल इस्टेट (real estate) क्षेत्राची स्थिती २०२५ मध्ये चांगली दिसून आली आणि मुंबईत तर या क्षेत्रासाठी गतवर्ष आशादायी राहिले. २०२४ च्या तुलनेत देशभरात घरांच्या विक्रीमध्ये एक टक्क्याची घट नोंदवली, मात्र मुंबईतील बाजारपेठेत मात्र घरविक्री जोमाने झाली. २०२५ मध्ये देशातील सर्वात मोठी गृहबाजारपेठ समोर येत देशाच्या तुलनेत २९ टक्के घरांची विक्री केवळ मुंबईतून झाली. नाईट फ्रैंक इंडियाच्या ‘इंडियाज रिअल इस्टेट-ऑफिस अँड रेसिडेन्शियल मार्केट २०२५’ या ताज्या अहवालानुसार, देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये एकूण अंदाजे ३,४८,००० घरे विकली गेली, जी मागील वर्षांच्या तुलनेत फक्त १ टक्क्यांनी कमी आहे. दरम्यान मुंबईत मात्र घरांच्या विक्रीचा जोर कायम राहिला. प्रीमियम घरांच्या मागणीमुळे किंमत वाढही दिसून आली. शहरात घरांच्या किंमतीही ७ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

हेही वाचा: US Tariffs Impact on TamilNadu: अमेरिकन टॅरिफचा फटका; तामिळनाडूमध्ये ३० लाख नोकऱ्या धोक्यात

अहवालानुसार, २०२५ चा दुसरा सहामाही रिअल इस्टेटसाठी महत्त्वाचा होता. जुलै ते डिसेंबर दरम्यान, १.७८ कोटी घरे विकली गेली, जी २०१३ नंतरच्या दुसऱ्या सहामाहीतील सर्वाधिक आहे. यावरून असे दिसून येते की, उच्च किमती असूनही खरेदीदारांचा विश्वास अबाधित आहे. मुंबईत ९७,१८८ घरे विकली गेली, जी वर्षांनुवर्षे १ टक्के वाढ दर्शवते. याउलट, एनसीआरमध्ये विक्री ९ टक्क्यांनी घसरून ५२,४५२ युनिट्सवर आली, तर नवीन लाँचमध्ये १६ टक्के लक्षणीय घट झाली.

परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रावर दबाव राहिला. ५० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांच्या विक्रीत १७ टक्क्यांनी घट झाली, ज्यामुळे त्यांचा वाटा फक्त २१ टक्क्यांवर आला. तरीही, बाजार संतुलित राहिला आहे, न विकल्या गेलेल्या घरांच्या यादीत थोडीशी वाढ झाली असली तरी, तिमाही-ते-तिमाही विक्री गुणोत्तर ५.८ टक्क्यावर स्थिर राहिले, जे मागणी पुरवता संतुलनाचे चागले संकेत देते. किमती बाबत, मुंबईतील घराच्या किमती वर्षानुवर्षे ७टक्क्यांनी वाढल्या आहेत. अहवालात असा अंदाज आहे की नियंत्रित पुरवठा आणि मजबूत मागणीमुळे २०२६ मध्ये मुंबईचा रिअल इस्टेट बाजार देशातील आघाडीचा राहील.

हेही वाचा: Retail Inflation in India: महागाई परत डोके वर काढतेय? नोव्हेंबरपेक्षा डिसेंबरमध्ये किरकोळ महागाईत पुन्हा उसळी

मुंबई (Mumbai) बाजारपेठेला बळकटी देणारा एक प्रमुख घटक म्हणजे प्रीमियम सेगमेटमधील मजबूत मागणी राहिली. २०२५ मध्ये देशभरात १ कोटीपेक्षा पेक्षा जास्त किमतीच्या घरांचा वाटा ५० टक्क्यांपर्यंत वाढला, या श्रेणीत एकूण १७.५ कोटी युनिट्स विकल्या गेल्या, जी वर्षानुवर्षे १४ टक्के वाढ दर्शवते. मुंबईसारख्या महानगरांमध्ये हा ट्रेंड आणखी स्पष्ट आहे, जिथे मोठ्या आणि चांगल्या सुसज्ज घरांची मागणी वाढत आहे.

Web Title: Mumbai sees strong housing sales despite national slowdown

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • Mumbai
  • real estate

संबंधित बातम्या

MHADA Lottery 2026: घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! ठाणे, कल्याण, डोंबिवलीत म्हाडाची २ हजार घरे; ‘या’ महिन्यात निघणार लॉटरी
1

MHADA Lottery 2026: घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! ठाणे, कल्याण, डोंबिवलीत म्हाडाची २ हजार घरे; ‘या’ महिन्यात निघणार लॉटरी

Education News: कॉपीमुक्त परीक्षांसाठी राज्यस्तरीय दक्षता समिती, परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी निर्णय
2

Education News: कॉपीमुक्त परीक्षांसाठी राज्यस्तरीय दक्षता समिती, परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी निर्णय

Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये गुंजला नवजात बाळाचा आवाज! RPF महिला अधिकाऱ्याच्या प्रसंगावधानाने डब्यातच सुखरूप प्रसूती
3

Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये गुंजला नवजात बाळाचा आवाज! RPF महिला अधिकाऱ्याच्या प्रसंगावधानाने डब्यातच सुखरूप प्रसूती

Aditya Thackeray on BJP: शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंची फटकेबाजी; फडणवीसांची नक्कल करत कोस्टल रोडवरून विचारले प्रश्न
4

Aditya Thackeray on BJP: शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंची फटकेबाजी; फडणवीसांची नक्कल करत कोस्टल रोडवरून विचारले प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.