Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्राहकांनो लक्ष द्या! 11 September ला Bank ची कामे अडकणार, कर्मचारी Strike वर; ‘या’ बँका राहणार बंद

Bank Strike 11 September : बँक ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी देशभरात बँक संपाची हाक देण्यात आली आहे. संपामुळे सरकारी आणि काही खाजगी बँकांमधील पैशांचे व्यवहार, चेक क्लिअरन्स आणि पासबुक प्रिंटिंग यांसारख्या सेवांवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 07, 2026 | 03:30 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • बँक ग्राहकांनो लक्ष द्या!
  • 11 September ला बँकेची कामे अडकणार
  • संपूर्ण देशात ‘या’ Bank राहणार बंद
Bank Strike 11 September : बँक ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी 11 सप्टेंबर रोजी देशभरात बँक संपाची हात देण्यात आली आहे. या संपामुळे सरकारी आणि खाजगी बँकांचे कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. नेमकं काय प्रकरण आहे? कर्मचाऱ्यांच्या काय मागण्या आहेत आणि याचा बँकांवर तसेच ग्राहकांवर काय परिणाम होणार? ( Bank Strike 11 September ) 

सगळं शक्य होणार… भारताचा सर्वात मोठा Water Project! समुद्रात उभारणार 64 किमी लांब Dam; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

वास्तविक पाहता, बँकांमध्ये ५ दिवस कामकाज लागू करण्याच्या मागणीवरून बँक युनियन्स आणि इंडियन बँक्स असोसिएशन यांच्यातील वाद अजून संपलेला नाही. खरे तर, ४ सप्टेंबर रोजी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) आणि इंडियन बँक्स असोसिएशन यांच्यात झालेल्या बैठकीत मुख्य मागण्यांवर एकमत होऊ शकले नाही. याच कारणामुळे बँक कर्मचारी ११ सप्टेंबर रोजी संपावर जाणार आहेत. याचा अर्थ असा की, शुक्रवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो.

या बँकांच्या कामकाजावर होणार परिणाम?

बँक संपाचा परिणाम प्रामुख्याने सरकारी बँकांवर दिसून येईल. खासगी बँकांच्या शाखांमध्ये नेहमीप्रमाणे काम सुरू राहील. यामध्ये प्रामुख्याने युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स UFBU आणि इंडियन बँक्स असोसिएशन यांच्यात ४ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत बँक ऑफ इंडिया BOI, स्टेट बँक ऑफ इंडिया SBI, पंजाब नॅशनल बँक PNB, युनियन बँक UB, इंडियन बँक Indian Bank, बँक ऑफ बडोदा BON, सेंट्रल बँक आणि कॅनरा बँकेचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या सरकारी बँकांच्या शाखांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पण या बँकांनी संप किंवा त्याच्या परिणामाबद्दल काहीही सांगितलेले नाही.

बँक असोसिएशनने काय सांगितलं?

UFBU ने स्पष्ट केले आहे की, ११ सप्टेंबर २०२६ रोजी नियोजित असलेला देशव्यापी बँक संप पुढे ढकलला जाणार नाही. बैठकीनंतर, UFBU ने म्हटले की, पाच दिवसांचा कामकाजाचा कालावधी इतर प्रलंबित मुद्द्यांवर कोणताही विचार विनिमय झालेला नाही. त्यामुळे संप मागे घेण्यास किंवा पुढे ढकलण्याचा प्रश्नच नाही.

बँकांचे संप केव्हा होतील?

UFBU च्या सध्याच्या वेळापत्रकानुसार,
११ सप्टेंबर, २०२६: एक दिवसाचा देशव्यापी बँक संप
२८ ते ३० सप्टेंबर, २०२६: तीन दिवसांचा देशव्यापी संप
२६ ऑक्टोबर, २०२६ पासून: अनिश्चित काळासाठी देशव्यापी संप
जर त्यापूर्वी कामगार संघटना, इंडियन बँक्स असोसिएशन आणि सरकार यांच्यात कोणताही करार झाला नाही, तर ११ सप्टेंबर रोजी नियोजित असलेला संप वाढवला जाऊ शकतो. संपादरम्यान अनेक कर्मचारी सहभागी होणार असल्याने बँक शाखांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो. मात्र, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि एटीएम यांसारख्या डिजिटल सेवा उपलब्ध राहतील.

बल्ले बल्ले… NSE IPO चा बाजारात धुमाकूळ! ग्रे मार्केटमध्ये ₹300 चा प्रीमियम; सरकारी विमा कंपन्यांना जॅकपॉट

Web Title: Nationwide bank strike on friday 11 september branches closed details marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Bank
  • bank close
  • Employees Strike

संबंधित बातम्या

DCC Bank Bharti 2026 : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ‘या’ पदांसाठी भरती! अर्ज प्रक्रिया पहा एका क्लिकवर
1

DCC Bank Bharti 2026 : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ‘या’ पदांसाठी भरती! अर्ज प्रक्रिया पहा एका क्लिकवर

Senior Citizens Bank FDs : एफडीवर छप्परफाड रिटर्न! ‘या’ बँकांचे दर नक्की पाहा, 2 वर्षांत 10 हजारांचे होतील तब्बल ‘इतके’
2

Senior Citizens Bank FDs : एफडीवर छप्परफाड रिटर्न! ‘या’ बँकांचे दर नक्की पाहा, 2 वर्षांत 10 हजारांचे होतील तब्बल ‘इतके’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.