Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Power Crisis : महापुरानंतर नेपाळमध्ये भीषण वीज संकट! भारताकडे मागितली मदत; पुरवठ्याबाबत केंद्र सरकारची भूमिका काय?

Nepal Power Crisis : नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी महापुरानंतर आता देशात भीषण वीज संकट निर्माण झाले आहे. पुरामुळे वीजनिर्मिती केंद्रे आणि ग्रिडचे मोठे नुकसान झालं आहे. नेपाळने विजेच्या आपत्कालीन पुरवठ्यासाठी भारताकडे मदत मागितली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 30, 2026 | 07:31 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • महापुरानंतर नेपाळमध्ये भीषण वीज संकट!
  • भारताकडे मागितली मदत
  • पुरवठ्याबाबत केंद्र सरकारची भूमिका काय?
Nepal Power Crisis : विनाशकारी पुर आला आणि नेपाळमधील परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. या विध्वंसामुळे नेपाळमधील पायाभूत सुविधांवर गंभीर परिणाम झाला आहे. त्यातील महत्त्वाच घटक म्हणजे वीज. नेपाळच्या अंदाजे ५५० मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेवर त्याचा परिणाम झाला आहे. विजेची टंचाई कमी करण्यासाठी नेपाळ मदतीच्या आशेवर आहे. नेपाळला वीजपुरवठ्यासाठी आवश्यक मंजुरी नेहमीपेक्षा लवकर द्यावी, अशी विनंती काठमांडूने भारताला केली आहे. नेमकी काय परिस्थिती आहे? आणि केंद्र सरकराची नेमकी भूमिका काय आहे? ( Nepal Power Crisis ) 

India Petrol Export To Russia : रशियावर का आली अशी वेळ? भारताकडे मागतोय पेट्रोल! काय नेमकं कारण?

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमधील वीज संकट अधिकच गडद होत आहे. नेपाळच्या दोन जिल्ह्यांमधील विद्यमान वीज प्रकल्प, तसेच सुरू असलेले अंदाजे नऊ जलविद्युत प्रकल्पांवर यामुळे मोठा परिणाम झाला आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते शालिग्राम भंडारी यांच्या म्हणण्यानुसार, ही समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी पथके कार्यरत आहेत, परंतु भारताच्या मदतीशिवाय हे शक्य होणार नाही.

पुरवठ्याबाबत भारत करतोय विचार

भारत सरकार सप्टेंबर महिन्यापासून नेपाळच्या पुरवठ्याच्या विनंतीवर विचार करत आहे. सध्याच्या वीज व्यापार प्रणालीअंतर्गत नेपाळला अधिक वीज पुरवठा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. इंडियन इलेक्ट्रिसिटी एक्सचेंजच्या डे-अहेड मार्केट म्हणजेच DAM आणि रिअल-टाइम मार्केट RTM यांसारख्या प्रणालींच्या माध्यमातून वीज पुरवठा केला जाण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती यासाठीही महत्त्वाची आहे, कारण नेपाळ साधारणपणे पावसाळ्यात आपल्या जलविद्युत प्रकल्पांमधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज भारताला निर्यात करतो. मात्र, यावेळी पूर आणि पायाभूत सुविधांच्या नुकसानीमुळे विजेचा प्रवाह उलटण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भारताला नेपाळला वीज पाठवावी लागणार आहे. दोन्ही देश एकमेकांना वीजपुरवठा करतात. त्यामुळे भारत ही तयारी दाखवणार हे निश्चित आहे.

नेपाळच्या वीजटंचाईचा भारतावर काय परिणाम?

वीज निर्मितीतील घटीचा परिणाम भारताला होणाऱ्या वीज निर्यातीवरही झाला आहे. अहवालानुसार, भारताला होणारा वीजपुरवठा अंदाजे ९५०-१००० मेगावॅट इतका असतो. म्हणजे अंदाजे ४०० मेगावॅटपर्यंत घसरला आहे. अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील व्यक्तींच्या मते, नेपाळमधील वीज निर्मितीतील घटीचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही.

अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय की भारताला ऊर्जेचे पर्यायी स्रोत शोधण्याची गरज नाही. आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारताची मोठी राष्ट्रीय ग्रीड क्षमता आणि मजबूत उत्पादन साठवणूक व्यवस्था ग्रीडच्या स्थिरतेशी तडजोड न करता किंवा किरकोळ पुरवठ्यात व्यत्यय न आणता ४०० मेगावॅटची तूट सहजपणे भरून काढू शकतो.

BRICS Digital Payment : 11 देशांमध्ये होणार थेट डिजिटल व्यवहार! ब्रिक्स परिषदेत भारताची मोठी योजना

Web Title: Nepal power crisis floods electricity supply shortage india response

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 07:31 PM

Topics:  

  • nepal
  • Nepal Flood
  • Power Supply

संबंधित बातम्या

Nepal Flood : नेपाळ-तिबेटमध्ये महापुराचा हाहाकार; मृतांचा आकडा 750 वर, 3 हजारांहून अधिक बेपत्ता
1

Nepal Flood : नेपाळ-तिबेटमध्ये महापुराचा हाहाकार; मृतांचा आकडा 750 वर, 3 हजारांहून अधिक बेपत्ता

China: नेपाळ-तिबेट सीमेवर 676 जणांचा बळी; चीनकडून पुराचे VIRAL VIDEO डिलीट, माहितीवर कडक सेन्सॉरशिप
2

China: नेपाळ-तिबेट सीमेवर 676 जणांचा बळी; चीनकडून पुराचे VIRAL VIDEO डिलीट, माहितीवर कडक सेन्सॉरशिप

नेपाळमधील पूरग्रस्त भागाचे जगाला गूढ आकर्षण! पुराचा धोका असूनही भारतासह परदेशी पर्यटकांची गर्दी इथे का?
3

नेपाळमधील पूरग्रस्त भागाचे जगाला गूढ आकर्षण! पुराचा धोका असूनही भारतासह परदेशी पर्यटकांची गर्दी इथे का?

Nepal Flood : नेपाळच्या महाप्रलयातून महाराष्ट्रातील भाविकांची सुटका; नागपूरचे 106 भाविक मायभूमीकडे रवाना, 37 जण मुंबईत परतणार
4

Nepal Flood : नेपाळच्या महाप्रलयातून महाराष्ट्रातील भाविकांची सुटका; नागपूरचे 106 भाविक मायभूमीकडे रवाना, 37 जण मुंबईत परतणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.