Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता झोपेत स्टेशन सुटण्याची भीती संपली; रेल्वेने सुरू केली ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सेवा

Indian Railways News: प्रवाशांना अनेकदा रात्रीच्या वेळी त्यांचे डेस्टिनेशन स्टेशन चुकण्याची चिंता असते. IRCTC ची डेस्टिनेशन अलर्ट आणि वेक-अप अलार्म सेवा ही या समस्येवर उपाय आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 17, 2026 | 05:36 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

  • रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर!
  • आता झोपेत स्टेशन सुटण्याची भीती संपली
  • रेल्वेने सुरू केली ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सेवा
Indian Railway News: रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करताना अनेकदा प्रवाशांना एकच काळजी सतावत असते, ती म्हणजे झोप लागल्यामुळे आपले नियोजित स्टेशन तर सुटणार नाही ना? विशेषतः रात्रीच्या प्रवासात ही भीती अधिक असते. प्रवाशांची हीच अडचण ओळखून भारतीय रेल्वे आणि आयआरसीटीसीने (IRCTC) एक अत्याधुनिक तांत्रिक उपाय शोधला आहे. रेल्वेने आता ‘डेस्टिनेशन अलर्ट’ (Destination Alert) आणि ‘वेक-अप अलार्म’ (Wake-up Alarm) ही विशेष सेवा अधिक प्रभावीपणे कार्यान्वित केली आहे.

नेमकी काय आहे ही टेक्नॉलॉजी?

या सुविधेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे याची अचूक वेळ. जेव्हा तुमची ट्रेन तुमच्या गंतव्य (Destination) स्टेशनच्या अलीकडे बरोबर २० मिनिटे अंतरावर असेल, तेव्हा तुमच्या मोबाईलवर एक अलार्म किंवा कॉल येईल. यामुळे प्रवाशांना त्यांचे सामान आवरण्यासाठी आणि उतरण्याची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. रात्री एकटे प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक किंवा गाढ झोप लागणाऱ्या प्रवाशांसाठी हे फिचर एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही.

इंटरनेटशिवाय चालते ही यंत्रणा

या सेवेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही इंटरनेटवर आधारित नाही. ही सुविधा IVR (Interactive Voice Response) तंत्रज्ञानाचा वापर करून चालते. याचा अर्थ असा की, तुमच्या फोनमध्ये डेटा पॅक नसेल किंवा तुम्ही ग्रामीण भागात असाल जिथे नेटवर्कची समस्या आहे, तरीही ही यंत्रणा चोख काम करते. रेल्वेचे सर्व्हर थेट तुमच्या ट्रेनच्या लाइव्ह लोकेशनशी जोडलेले असल्याने हा अलर्ट अत्यंत अचूक असतो.

Indian Railways: रेल्वे क्षेत्रात मोठी क्रांती! स्वदेशी उत्पादनाला चालना देण्यासाठी ‘रेल्वे तंत्रज्ञान धोरण’ होणार जाहीर

अलर्ट कसा सक्रिय करायचा? (स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस)

१. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवरून रेल्वेचा हेल्पलाईन क्रमांक १३९ डायल करा.

२. तुमची सोयीची भाषा (मराठी, हिंदी किंवा इंग्रजी) निवडा.

३. मुख्य मेनूमध्ये गेल्यावर ‘डेस्टिनेशन अलर्ट’साठी ७ हा क्रमांक दाबा.

४. त्यानंतर तुमचा १० अंकी PNR क्रमांक अचूक नोंदवा.

५. माहितीची पडताळणी केल्यावर १ दाबून अलार्मची पुष्टी करा.

नोंदणी यशस्वी झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक पुष्टीकरण एसएमएस येईल. त्यानंतर तुम्ही निर्धास्तपणे झोपू शकता.

या सुविधेचे फायदे आणि शुल्क

  • तणावमुक्त प्रवास: तुम्हाला वारंवार खिडकीतून बाहेर पाहण्याची किंवा गुगल मॅप्सवर लोकेशन चेक करण्याची गरज उरणार नाही.
  • बॅटरीची बचत: हा अलर्ट इंटरनेटवर चालत नसल्यामुळे तुम्हाला प्रवासात मोबाईलचा डेटा सुरू ठेवण्याची गरज नाही, ज्यामुळे बॅटरीची बचत होते.
  • नाममात्र शुल्क: रेल्वेने या सुविधेसाठी अत्यंत अल्प शुल्क आकारले आहे. साधारणपणे ३ ते १० रुपयांच्या दरम्यान असणारे हे शुल्क तुमच्या मोबाईल बॅलन्समधून वजा केले जाते.

भारतीय रेल्वेने तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

मध्य रेल्वेची मोठी घोषणा ! अकोलामार्गे धावणार मुंबई-पुणे-नागपूर विशेष रेल्वे; प्रवाशांना फायदा होणार

Web Title: Now the fear of missing the station in your sleep is over railways launches destination alert service

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 05:36 PM

Topics:  

  • Indian Railway
  • IRCTC
  • passanger

संबंधित बातम्या

मराठवाड्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची अद्याप प्रतिक्षाच; प्रवासाची तिकिटे मिळणेही अवघड
1

मराठवाड्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची अद्याप प्रतिक्षाच; प्रवासाची तिकिटे मिळणेही अवघड

अतृप्त आत्म्यांचं सावट की…’असं’ एक स्टेशन जिथे ट्रेन पोहोचल्यावर लाईट्स जाते,  काय आहे याचं रहस्य ?
2

अतृप्त आत्म्यांचं सावट की…’असं’ एक स्टेशन जिथे ट्रेन पोहोचल्यावर लाईट्स जाते, काय आहे याचं रहस्य ?

रेल्वे पोलिसांची मोठी कामगिरी! ५ वर्षांत ५२,४९४ आरोपी अटकेत; ड्रोन, CCTVसह गुन्हेगारांवर दंडात्मक कारवाई
3

रेल्वे पोलिसांची मोठी कामगिरी! ५ वर्षांत ५२,४९४ आरोपी अटकेत; ड्रोन, CCTVसह गुन्हेगारांवर दंडात्मक कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.