Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Old Monk पिणाऱ्यांनो इथे लक्ष द्या… आता Rum विकली जाणार नाही? जाणून घ्या नेमका काय आहे वाद?

Old Monk Controversy : भारतातील सर्वात लोकप्रिय मद्य ब्रँडपैकी एक असलेल्या Old Monk बाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओल्ड मॉन्कची आता Rum म्हणून विक्री होणार नाही किंवा तिच्या लेबलिंगवरून मोठा वाद निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 04, 2026 | 06:13 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Old Monk पिणाऱ्यांनो इथे लक्ष द्या…
  • आता Rum विकली जाणार नाही?
  • नेमकं प्रकरण काय?
Old Monk Controversy :  भारतातील सर्वात लोकप्रिय मद्य ब्रँडपैकी एक असलेल्या Old Monk बाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओल्ड मॉन्कची आता Rum म्हणून विक्री होणार नाही किंवा तिच्या लेबलिंगवरून मोठा वाद निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. नेमकं काय आहे प्रकरण Fssai ची नेमकी काय भूमिका आहे? ( Old Monk Controversy ) 

50 कोटींची कंपनी विकून ‘हा’ Businessman घेणार संन्यास! जंगलात घालवणार उर्वरित आयुष्य

FSSAI ने मुंबई उच्च न्यायालयात म्हटले आहे की, ओल्ड मॉन्कची विक्री रम म्हणून केली जाऊ शकत नाही, कारण नियामकाच्या मते ते न्यूट्रल स्पिरिट्स आणि रम फ्लेवरिंगपासून बनवले जाते. पण याचा अर्थ असा नाही की देशभरात ओल्ड मॉन्कच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. सध्या, हे प्रकरण महाराष्ट्रातील उत्पादनाच्या विक्री आणि लेबलिंगशी संबंधित आहे. कंपनीने न्यायालयात सुधारित लेबल्सदेखील सादर केली आहेत.

नेमका वाद काय आहे?

FSSAI च्या मते, रम म्हणून विकल्या जाणाऱ्या या उत्पादनासंबंधीत नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियामक काय सांगतात? ओल्ड मॉन्कच्या उत्पादनांमध्ये न्यूट्रल स्पिरिट्स आणि रम फ्लेवरिंगचा वापर केला जातो. त्यामुळे, ते रम ऐवजी रम-फ्लेवर्ड स्पिरिट्स म्हणून विकले जाऊ शकते. याचा अर्थ, हा वाद केवळ बाटलीवरील शब्दापुरता फक्त मर्यादित राहिलेला नाही. तो मद्याच्या प्रकाराशी आणि लेबलवर ग्राहकांना अचूक माहिती कशी द्यावी याच्याशी देखील संबंधित आहे.

कंपनीने बदलले लेबल

सुनावणीदरम्यान, Old Monk कंपनीने सुधारित लेबल सादर केलं आहे. FSSAI ने या लेबलची तपासणी करण्यासाठी वेळ मागून घेतला आहे. न्यायालयाने कंपनीला पॅकेजिंगवर आवश्यक माहिती स्पष्टपणे प्रदर्शित करण्याचे निर्देशही दिले आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, अतिरिक्त फ्लेवर्सचे स्पष्ट लेबलिंग आणि पूर्वीच्या दाव्यांमधील बदल आढळून आले आहेत. न्यायालयाने ‘7 इयर्स ओल्ड ब्लेंडेड’ आणि ‘व्हेरी ओल्ड व्हॅटेड’ यांसारख्या दाव्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

तुम्हाला मार्केटमध्ये ओल्ड मॉन्क मिळणार नाही का?

अजून हे स्पष्ट झालेलं नाही. सध्या खटला न्यायालयात सुरू आहे आणि कंपनीने सुधारित लेबल सादर केले आहेत. पुढील सुनावणी ११ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे, ओल्ड मॉन्क पूर्णपणे बंद होईल की ब्रँडला ‘रम’ हे नाव कायमचे सोडावे लागेल का याबाबत स्पष्ट सांगता येणार नाही. अंतिम निर्णय पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि नियामक मंजुरींवर अवलंबून असणार आहे.

SBI बँकेत तुमचं अकाऊंट आहे का? तर आत्ताच Alert व्हा! बदलणार आहेत नियम; तुमच्या खिशावरही पडणार भार…

Web Title: Old monk rum controversy brand name dispute and details marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • controversy
  • FSSAI
  • High court

संबंधित बातम्या

काय सांगता? शाळेच्या आवारात आता मिळणार नाही चिप्स, कोल्ड ड्रिंक्स आणि….? FSSAI चा मोठा निर्णय
1

काय सांगता? शाळेच्या आवारात आता मिळणार नाही चिप्स, कोल्ड ड्रिंक्स आणि….? FSSAI चा मोठा निर्णय

50 कोटींची कंपनी विकून ‘हा’ Businessman घेणार संन्यास! जंगलात घालवणार उर्वरित आयुष्य
2

50 कोटींची कंपनी विकून ‘हा’ Businessman घेणार संन्यास! जंगलात घालवणार उर्वरित आयुष्य

‘पत्नीने पतीसोबत सर्वत्र जाणे गरजेचे नाही’; १६ वर्षे वेगळ्या राहणाऱ्या दाम्पत्यावर उच्च न्यायालयाचा निर्णय
3

‘पत्नीने पतीसोबत सर्वत्र जाणे गरजेचे नाही’; १६ वर्षे वेगळ्या राहणाऱ्या दाम्पत्यावर उच्च न्यायालयाचा निर्णय

Vidyanand Bapat Pune : विद्यानंद बापट कोण आहेत? त्यांचे शिक्षण किती झाले आहे? जाणून घ्या
4

Vidyanand Bapat Pune : विद्यानंद बापट कोण आहेत? त्यांचे शिक्षण किती झाले आहे? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.