Pankaj Tripathi (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
मॅककॅन इंडियाने संकल्पित केलेली ही मोहीम पोट फुगणे, शौचासाठी जोर लावावा लागणे आणि कडक शौचास होणे या बद्धकोष्ठतेशी संबंधित तीन समस्या सोडवण्यासाठी न्यू डल्कोफ्लेक्स लिक्विडचा ‘वन स्मार्ट सोल्यूशन’ पर्याय प्रभावीपणे मांडते. Pankaj Tripathi Features:
मुंबई, नोव्हेंबर, २०२६: बद्धकोष्ठता ही केवळ पोट साफ न होण्यापुरती मर्यादित नसते. अनेकांसाठी याचा अर्थ दैनंदिन दिनचर्या विस्कळीत करणाऱ्या संबंधित अनेक समस्यांना तोंड देणे असा असू शकतो. या परिचित, पण फारशी चर्चा न होणाऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रित करत ऑपेलाच्या न्यू डल्कोफ्लेक्स लिक्विडने प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांची मुख्य भूमिका असलेली नवीन #1SmartSolution मोहीम जाहीर केली आहे.
ऑम्निकॉम अॅडव्हर्टायझिंग इंडियाचा भाग असलेल्या मॅककॅन इंडियाने ऑपेला टीमच्या सहयोगाने संकल्पित केलेली ही मोहीम बद्धकोष्ठतेवर उघडपणे बोलण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि सोप्या उपायावर भर देण्यासाठी हलकाफुलका विनोद, तसेच कामाच्या ठिकाणच्या ओळखीच्या प्रसंगाचा वापर करते. हा उपाय म्हणजे: बद्धकोष्ठता आणि तिच्याशी संबंधित पोट फुगणे, शौचासाठी जोर लावावा लागणे व कडक शौचास होणे या तीन समस्यांसाठी स्मार्ट सोल्यूशन.
पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयाने सजलेली नवीन जाहिरात या मोहिमेच्या केंद्रस्थानी आहे. आपल्या खास आपुलकीच्या आणि सहज विनोदी शैलीत त्रिपाठी नवीन डल्कोफ्लेक्स लिक्विड सादर करतात, ज्यामुळे ब्रँडचा #1SmartSolution विचार अत्यंत प्रभावीपणे समोर येतो.
Delhi Mega Rally: रॅलीचा फटका व्यापाऱ्यांना! अडीच लाख दुकाने बंद, 11 हजार कोटींचे नुकसान
ग्राहकांसाठी बद्धकोष्ठता हा नेहमी केवळ लक्षणाचा अनुभव नसतो. सोबत होणाऱ्या त्रासामुळे योग्य आराम मिळवणे अनेकदा गोंधळात टाकणारे ठरते. डल्कोफ्लेक्स लिक्विडचे ट्विन-पॉवर फॉर्म्युला ही निवड सोपी करते, ज्यामुळे खात्रीशीर आणि प्रभावी आराम देण्याचे ब्रँडचे वचन पूर्ण होते. बडीशेपच्या (फेनेल) चवीची अनोखी जोड आणि १५० मिली पॅकसाठी १५० रुपये या परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असलेले डल्कोफ्लेक्स लिक्विड भारतातील अधिकाधिक ग्राहकांपर्यंत स्वतःची काळजी घेण्याची साधने पोहोचवण्याच्या ऑपेलाच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करते.
मोहिमेची जाहिरात येथे पहा:
या मोहिमेबाबत मत व्यक्त करत ऑपेला (इंडिया) च्या ब्रँड अँड इनोव्हेशन प्रमुख नुपूर गुरबक्सानी म्हणाल्या, “दररोज भारतातील २७६ दशलक्ष व्यक्तींना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. तरीही यापैकी एक तृतीयांश व्यक्ती कधीही वैद्यकीय मदत घेत नाहीत आणि जवळपास निम्मे व्यक्ती अप्रभावी घरगुती उपायांवर अवलंबून राहतात. अनेक वर्षांपासून पॉप्युलर कल्चर आणि जाहिरातींनी बद्धकोष्ठतेला थट्टेचा विषय बनवून ठेवले आहे, ज्यामुळे या समस्येने त्रस्त असलेल्या व्यक्तींचे खरे हाल दुर्लक्षित झाले. या श्रेणीतील अग्रगण्य ब्रँड म्हणून आम्ही केवळ प्रभावी उपाय देण्यापलीकडे आमची भूमिका असल्याचे मानतो.
Reliance Share Price Jumps: निकालांचा धमाका अन् शेअरचा ठसका! रिलायन्सची बाजारात ८ टक्क्यांची भरारी
बद्धकोष्ठतेवर अधिक मोकळेपणाने चर्चा घडवून आणण्याची जबाबदारीही आमच्यावर आहे. डल्कोफ्लेक्स लिक्विडच्या नवीन मोहिमेद्वारे आम्ही समस्येचे गांभीर्य कमी न करता ग्राहकांच्या खऱ्या त्रासाची जाणीव ठेवण्यासाठी सहानुभूती आणि ओळखीच्या प्रसंगांचा प्रभावी वापर केला आहे.”
सनोफी कंझ्युमर हेल्थकेअर इंडिया लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर हिमांशू बक्षी म्हणाले, “ऑपेलामध्ये आमचा विश्वास आहे की, स्वतःची काळजी घेणे अगदी साधे आणि सुलभ असायला पाहिजे. म्हणून डल्कोफ्लेक्स लिक्विड लाँच करताना आम्हाला आनंद होत आहे. हा सोपा आणि प्रभावी उपाय असून ग्राहकांना आरोग्याच्या या दैनंदिन गरजेवर नियंत्रण मिळवण्यास मदत करतो.”
मॅककॅन इंडियाचे एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट सक्षम कोहली म्हणाले, “समस्येचे महत्त्व कमी न करता बद्धकोष्ठतेवरील चर्चा अधिक हलकीफुलकी आणि सर्वांना आपलीशी वाटेल अशी करणे हे आमच्यासमोरील सर्जनशील आव्हान होते. आम्ही मनमिळावू बॉसची भूमिका साकारणारे पंकज त्रिपाठी आणि त्यांचे कनिष्ठ सहकारी यांच्यातील जिव्हाळ्याच्या संवादाभोवती ही कथा गुंफली आहे. पंकज यांच्यामुळे या कथेत आपुलकी निर्माण होते, तर परिस्थिती हलकाफुलका विनोद घेऊन येते. याच्या केंद्रस्थानी अतिशय सोपा विचार आहे: बद्धकोष्ठता एकापेक्षा जास्त समस्या घेऊन येते, तेव्हा डल्कोफ्लेक्स लिक्विड वन स्मार्ट सोल्यूशन देते.”v
Ans: या मोहिमेत अभिनेता पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहेत.
Ans: या मोहिमेचे नाव #1SmartSolution आहे.
Ans: मॅककॅन इंडियाने ऑपेला टीमच्या सहयोगाने ही मोहीम संकल्पित केली आहे.






