Reliance Share Price Jumps: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
सोमवारचा दिवस रिलायन्ससाठी आणि शेअर मार्केटसाठी एकदम खास ठरला. सकाळी मार्केट उघडताच रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर रॉकेटसारखा वर गेला. जवळपास 8% वाढ झाली. हा शेअर आज निफ्टी 50 मधला सगळ्यात जास्त वाढणारा शेअर ठरला आणि सगळ्यात जास्त ट्रेडिंग पण याच शेअरमध्ये झाली, NSE आणि BSE दोन्हीकडे. Reliance Share Price Jumps:
सकाळी 10 वाजता रिलायन्स 7.5% वाढीसह 1,252 रुपयांवर ट्रेड करत होता. कंपनीचं मार्केट कॅप आता 16.94 लाख कोटींवर गेलंय. विचार करा, किती मोठा आकडा आहे.
रिलायन्स एकटा वाढला नाही, त्याने अख्ख्या मार्केटला वर खेचलं. सकाळी 10.45 वाजता सेन्सेक्स 1,050 अंकांनी वाढून 75,509 वर गेला, म्हणजे 1.4% वाढ. निफ्टी पण 290 अंकांनी वाढून 23,343 वर पोहोचला. आजची तेजी ही फक्त रिलायन्समुळेच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
Q2 चा रिझल्ट आला आणि सगळे थक्क झालेया वाढीमागचं खरं कारण आहे कंपनीचा तिमाही निकाल. जुलै-सप्टेंबर म्हणजे Q2 FY27 मध्ये रिलायन्सने आजपर्यंतचा सगळ्यात मोठा नफा कमावलाय. कमाई, नफा, सगळंच रेकॉर्डब्रेक.कंपनीची एकूण कमाई 28% वाढून 3.62 लाख कोटी झाली, जी आजपर्यंतची सर्वात जास्त आहे. EBITDA 24% वाढून 62,409 कोटी झाला. आणि निव्वळ नफा 34% वाढून 29,550 कोटींवर गेला. म्हणजे एका तिमाहीत जवळपास 30 हजार कोटींचा नफा.
Share Market Update: जागतिक बाजारात घसरणीचा हाहाकार, सेन्सेक्सची मात्र 1000 अंकांची भरारी
सगळ्यात मोठा हात हा ऑईल-टू-केमिकल म्हणजे O2C बिझनेसचा. या बिझनेसने तर कमालच केली. कमाई 44.2% वाढून 2.32 लाख कोटी झाली आणि EBITDA 67.9% वाढून 25,203 कोटी झाला. पेट्रोल, डिझेल बनवण्यावरचा नफा म्हणजे क्रॅक गेल्या वर्षीपेक्षा 3 ते 3.7 पट वाढला आहे, तो ऐतिहासिक उच्चांकावर आहे.
दुसरीकडे जिओचा पण धंदा जोरात आहे. जिओ प्लॅटफॉर्मची कमाई 11.3% वाढून 47,485 कोटी झाली. EBITDA 16.6% वाढून 21,879 कोटी झाला. नवीन ग्राहक जोडले गेले, दरडोई उत्पन्न वाढलं आणि डिजिटल सर्व्हिस वाढली त्याचा फायदा झाला.
रिझल्ट इतका भारी आल्यावर मोठ्या ब्रोकरेज कंपन्या पण खुश झाल्या आहेत. गोल्डमन सॅक्स आणि नोमुराने लगेच BUY रेटिंग दिलंय.गोल्डमन सॅक्सने टार्गेट प्राईस 1,840 रुपये दिलाय. शुक्रवारी 1,164 वर बंद झालेल्या शेअरपासून अजून 58% वाढ होऊ शकते. त्यांनी सांगितलं की कंपनीचा EBITDA त्यांच्या अंदाजापेक्षा 9% जास्त आहे, सगळं O2C मुळे.नोमुराने टार्गेट 1,560 रुपये ठेवलाय. त्यांनी पण सांगितलं की रिफायनिंगचा नफा अनेक दशकातला सर्वात जास्त आहे. कंपनीचा एकूण EBITDA सलग 19% वाढलाय.
पण दोघांनी एक गोष्ट सांगितली, डिसेंबरच्या तिमाहीत रिफायनिंगचा नफा थोडा कमी होऊ शकतो कारण कच्चं तेल आणायचा खर्च म्हणजे VLCC भाडं वाढलंय. आणि रिटेलचा बिझनेस थोडा कमकुवत आहे कारण सणासुदीची खरेदी पुढे ढकलली गेली आणि डिजिटलवर खर्च वाढलाय. पण तरीही टेलिकॉम आणि ऑईल बिझनेसच्या जोरावर रिलायन्स अजून जोरात पळणार आहे.
Ans: सोमवारी रिलायन्सच्या शेअरमध्ये जवळपास 8% पर्यंत वाढ झाली.
Ans: कंपनीची एकूण कमाई 28% वाढून 3.62 लाख कोटी रुपये झाली.
Ans: सेन्सेक्स 1,050 अंकांनी वाढून 75,509 वर, तर निफ्टी 290 अंकांनी वाढून 23,343 वर पोहोचला.






