
Dasara 2026: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
तुम्ही जर विचार करत असाल की दसऱ्याला काय खरेदी करावं म्हणजे घरात बरकत येईल, तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. चला पाहूया कोणत्या वस्तू घेणं शुभ असतं.
दसऱ्याला सोनं किंवा चांदी घेण्याची खूप जुनी परंपरा आहे. या दिवशी एक छोटं तरी सोन्याचं नाणं, अंगठी किंवा चांदीची वाटी, शिक्का काहीतरी घरी आणलं तर घरात लक्ष्मी टिकून राहते असं म्हणतात. तुमचं बजेट कमी असेल तरी चांदीचं छोटं नाणं तरी नक्की घ्या.
अनेक लोक वर्षभर गाडी घेण्यासाठी दसऱ्याची वाट पाहतात. कारण हा सिद्ध मुहूर्त आहे. या दिवशी कार, बाईक किंवा कोणतंही वाहन घेतलं तर ते अपघातापासून वाचतं आणि शुभ ठरतं. आजच्या दिवशी शोरूममध्ये पण मोठी गर्दी असते.
प्रत्येकालाच सोनं किंवा गाडी घेणं शक्य नसतं. अशा वेळी तुम्ही घरासाठी तांब्याची किंवा पितळेची भांडी घेऊ शकता. स्वयंपाकघरासाठी अशी भांडी घेणं पण खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे घरात आरोग्य आणि सुख राहतं.
हे ऐकायला थोडं वेगळं वाटेल पण दसऱ्याला नवीन झाडू घरी आणणं खूपच शुभ असतं. झाडू म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक. नवीन झाडू आणल्याने घरातली गरिबी, नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि स्वच्छता राहते.
शमीच्या झाडाला दसऱ्याच्या दिवशी खूप महत्त्व आहे. या दिवशी शमीचं रोप विकत आणून घरात लावणं किंवा त्याची पूजा करणं खूप फायदेशीर असतं. शमीची पानं सोनं म्हणून एकमेकांना दिली जातात. घरात शमी असेल तर वास्तुदोष पण दूर होतो असं म्हणतात.
लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी या दिवशी नवीन पुस्तकं, धार्मिक ग्रंथ, पेन किंवा वह्या घेणं चांगलं असतं. यामुळे मुलांची अभ्यासात प्रगती होते आणि ज्ञान वाढतं. सरस्वतीची कृपा राहते.
दसऱ्याला घरातल्या सगळ्यांसाठी नवीन कपडे घेण्याची पद्धत आहे. आई-वडील, मुलं यांच्यासाठी नवीन कपडे घेतले तर घरात आनंदाचं वातावरण राहतं.
फक्त वस्तू खरेदी करून होत नाही, घरी पण काही गोष्टी करायला हव्यात. सकाळी घर पूर्ण स्वच्छ करा. दारावर आंब्याच्या पानांचं तोरण बांधा आणि छान रांगोळी काढा.
देवघरात प्रभू श्रीराम आणि दुर्गा देवीची मनोभावे पूजा करा. शस्त्र असतील तर त्यांची पूजा करा. या दिवशी राम रक्षा स्तोत्र, दुर्गा चालीसा किंवा आदित्य हृदय स्तोत्र वाचणं खूप चांगलं मानलं जातं.
शमीच्या झाडाची पूजा करून त्याची पानं आणि आपट्याची पानं एकमेकांना देऊन शुभेच्छा द्या. संध्याकाळी घरात चतुर्मुखी दिवा लावा. यामुळे घरातला वास्तुदोष निघून जातो आणि सकारात्मक ऊर्जा येते. तुमची वाहनं, पुस्तकं, अवजारं असतील तर ती स्वच्छ करून त्यांना हळद-कुंकू लावून त्यांची पण पूजा करा.