Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Medical Emergency असो वा लग्नकार्य! Bank देणार झटपट ‘Personal Loan’; कमी व्याजात कर्ज मिळवण्यासाठी वापरा ‘या’ Tips

अनेकदा आपण केलेली बचत अपुरी पडते आणि नातेवाईकांकडे आर्थिक मदतीची मागणी करणे प्रत्येकालाच सोयीचे किंवा योग्य वाटत नाही. अशा परिस्थितीत, ‘वैयक्तिक कर्ज’ म्हणजेच Personal Loan हाच सर्वात उपयुक्त उपाय ठरतो.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 15, 2026 | 07:50 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Bank देणार झटपट ‘Personal Loan
  • Pre-approved Personal Loan ची ऑफर
  • कमी व्याजात कर्ज मिळवण्यासाठी टिप्स महत्त्वाच्या
Personal Finance Loan : आयुष्यात सुख आणि संकटे दोघेही न बोलावलेल्या पाहुण्यांसारखी आपल्या आयुष्यात येतात आणि कल्लोळ करुन जातात. एका क्षणी, लाडक्या बहिणीच्या लग्नाची तारीख निश्चित होते; तर दुसऱ्याच क्षणी, एखादी अचानक उद्भवलेली वैद्यकीय अडचण दारावर येऊन उभी राहते. अशा वेळी पैशांची जुळवाजुळव करणे हेच सर्वात मोठे आव्हान असते. अनेकदा आपण केलेली बचत अपुरी पडते आणि नातेवाईकांकडे आर्थिक मदतीची मागणी करणे प्रत्येकालाच सोयीचे किंवा योग्य वाटत नाही. अशा परिस्थितीत, ‘वैयक्तिक कर्ज’ म्हणजेच Personal Loan हाच सर्वात उपयुक्त उपाय ठरतो. मात्र, कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि त्यावरील उच्च व्याजदर पाहून अनेकदा लोक घाबरतात. जर तुम्ही थोडासा स्मार्ट दृष्टिकोन वापरलात, तर तुम्हाला केवळ अत्यंत सोयीच्या व्याजदराने कर्ज मिळणार नाही तर तेच पैसे अगदी काही क्षणांतच तुमच्या बँक खात्यात जमा करून घेणंही शक्य होणार आहे. पण हे कसं साध्य करायचं नेमकी काय प्रोसेस आहे जाणून घेऊयात.

UPI Payment करणाऱ्यांची ‘मज्जाच मज्जा’, आता 100 रुपयांचं सामान मिळणार फक्त 95 रुपयांत, जाणून घ्या सविस्तर

Pre-approved Personal Loan ची ऑफर

लोक अनेकदा पैशांची गरज असताना Personal Loan घेतात. जर तुमच्याकडे बँकेकडून Pre-approved Personal Loan ची ऑफर असेल, तर ही Process आणखीनच सोपी होणार आहे. पूर्व-मंजूर कर्ज म्हणजे असे कर्ज, ज्यामध्ये बँकेने तुमचे उत्पन्न, क्रेडिट हिस्ट्री आणि व्यवहारांची नोंद म्हणजेच Transaction records यांची आधीच तपासणी केलेली असते; जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त किती रकमेचे कर्ज देता येईल, हे निश्चित करता येतं. परिणामी, एकदा कर्जासाठी अर्ज केला की, अवघ्या काही मिनिटांत किंवा तासांतच कर्जाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाऊ शकते.

व्याजदरांबाबत नेगोशिएट कसं करावं?

बहुतेक लोक बँकेने सुरुवातीला सांगितलेला व्याजदरच अंतिम प्रस्ताव म्हणून स्वीकारतात पण इथंच नेमकी त्यांच्याकडून मोठी चूक होते. खरंतर तुम्ही पूर्व-मंजूर कर्जावरील व्याजदराबाबत वाटाघाटी करू शकता. अनेकदा बँका त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देण्यास तयार असतात.

तुमच्या क्रेडिट स्कोअरचा संदर्भ द्या: जर तुमचा CIBIL स्कोअर ७५० पेक्षा जास्त असेल, तर तुम्ही बँकेशी ‘कमी व्याजदरा’साठी ठामपणे वाटाघाटी करू शकता. बँकांना आपले चांगले ग्राहक गमावणे आवडत नाही. त्यामुळे नक्कीच ते तुम्हाला सहकार्य करतील.
Salary Account ची मदत घ्या: ज्या बँकेत तुमचा पगार जमा होतो, ती बँक तुम्हाला व्याजदरात सवलत देण्याची सर्वाधिक शक्यता असते. त्यांना आठवण करून द्या की तुम्ही त्यांचे एक निष्ठावान ग्राहक आहात.
स्पर्धक बँकांच्या ऑफर्स दाखवा: जर एखादी दुसरी बँक तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज देऊ करत असेल, तर तुमच्या सध्याच्या बँकेला त्याबद्दल माहिती द्या. अनेकदा, ती बँक प्रतिस्पर्ध्याच्या व्याजदराशी बरोबरी करण्यास किंवा त्याहूनही कमी दराने कर्ज देण्यास तयार होतात.

प्रोसेसिंग फीस आणि हिडन चार्जेसवरही लक्ष द्या

कर्ज परवडण्याजोगे आहे की नाही, हे केवळ व्याजदरावरून ठरत नाही. अनेकदा बँका कमी व्याजदर देऊ करतात; पण त्याचबरोबर प्रोसेस फी आणि विम्याच्या नावाखाली मोठी रक्कम वसूल करुन घेतात. कर्जाच्या करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी, प्रक्रिया शुल्क माफ होऊ शकते का, याची चौकशी नक्की करा. सणासुदीच्या किंवा लग्नसराईच्या काळात, बँका अनेकदा हे शुल्क पूर्णपणे माफ करतात त्यामुळे त्याचा फायदा नक्की घ्या.

अक्षय तृतीयेला JioFinance चा धमाका! Digital Gold खरेदीवर मिळणार तब्बल ‘इतकं’ सोनं; पाहा काय आहे ऑफर?

Web Title: Personal finance lowest interest personal loan pre approved instant cash check more details marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 07:50 PM

Topics:  

  • Bank
  • Big Offer
  • Business News
  • Loan
  • Loan Issue
  • Marathi News
  • medical insurance
  • Salary

संबंधित बातम्या

Gaza War : गाझात पुन्हा रक्तपात! इस्रायली हल्ल्यांत पॅलेस्टिनींचा मृत्यू; युद्धविरामानंतरही हल्ले सुरू
1

Gaza War : गाझात पुन्हा रक्तपात! इस्रायली हल्ल्यांत पॅलेस्टिनींचा मृत्यू; युद्धविरामानंतरही हल्ले सुरू

Syria News : 16 वर्षांनी असालाचा दमास्कसमध्ये जल्लोष! ‘हाऊसफुल्ल’ कॉन्सर्टने पुन्हा गाजला सीरियाचा मंच
2

Syria News : 16 वर्षांनी असालाचा दमास्कसमध्ये जल्लोष! ‘हाऊसफुल्ल’ कॉन्सर्टने पुन्हा गाजला सीरियाचा मंच

Saudi Arabia Alert : रियाधच्या आकाशात रणशिंग! एअर-रेड अलर्टने थरार; विमानतळाजवळ धुराचे लोट
3

Saudi Arabia Alert : रियाधच्या आकाशात रणशिंग! एअर-रेड अलर्टने थरार; विमानतळाजवळ धुराचे लोट

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित
4

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.