Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PhonePe, Paytm की Google Pay? कोणत्या ॲपवरून भारतीय करतायत सर्वात जास्त UPI पेमेंट? पाहा ताजी आकडेवारी

देशातील युपीआय बाजारावर कोणाचे वर्चस्व आहे, याचे ताजे आकडे एनपीसीआयने जाहीर केले आहेत. फोनपे देशात अव्वल ठरले असून २,००० रुपयांवरील मोठ्या यूपीआय व्यवहारांवर शुल्क लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 16, 2026 | 09:14 PM
PhonePe, Paytm की Google Pay? कोणत्या ॲपवरून भारतीय करतायत सर्वात जास्त UPI पेमेंट? पाहा ताजी आकडेवारी
Follow Us
Follow Us:
  • PhonePe, Paytm की Google Pay?
  • कोणत्या ॲपवरून भारतीय करतायत सर्वात जास्त UPI पेमेंट?
  • पाहा ताजी आकडेवारी
मुंबई: आजच्या घडीला चहाच्या टपरीपासून ते मोठ्या व्यावसायिक मॉल्सपर्यंत प्रत्येक ठिकाणी आपण ‘स्कॅन अँड पे’ म्हणजेच युपीआय (UPI) पेमेंटचा वापर करत आहोत. मात्र, भारताच्या या अवाढव्य डिजिटल पेमेंट बाजारावर सध्या नक्की कोणत्या ॲपचे वर्चस्व आहे, असा प्रश्न अनेकांना पडतो. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) जारी केलेल्या ताज्या आकडेवारीवरून हे संपूर्ण चित्र आता स्पष्ट झाले आहे. देशातील डिजिटल पेमेंट क्षेत्रातील स्पर्धा आता एका नव्या आणि रंजक वळणावर येऊन ठेपली आहे.

एनपीसीआयने (NPCI) प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, ट्रान्झॅक्शन व्हॉल्युम म्हणजेच एकूण व्यवहारांच्या संख्येच्या बाबतीत ‘PhonePe’ हे ॲप भारतीय युपीआय बाजारात सर्वात मोठा खेळाडू म्हणून आघाडीवर आहे. एकूण बाजारपेठेत एकट्या फोनपेचा वाटा तब्बल 46.1 टक्के इतका प्रचंड आहे. याचा अर्थ देशातील जवळपास निम्मे डिजिटल व्यवहार एकट्या फोनपे ॲपवरून केले जात आहेत. या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर ‘Google Pay’ असून, 32.8 टक्के मार्केट शेअरसह ते बाजारात भक्कमपणे पाय रोवून उभे आहे. दुसरीकडे, एकेकाळी भारतात डिजिटल क्रांतीची सुरुवात करणारे आणि क्यूआर (QR) कोड घरोघरी पोहोचवणारे ‘Paytm’ हे ॲप आता मोठ्या घसरणीसह 7.8 टक्क्यांवर आले असून ते तिसऱ्या स्थानावर फेकले गेले आहे.

डिजिटल पेमेंट मार्केटमधील या वर्चस्वाच्या लढाईसोबतच दुसरीकडे एक मोठी बातमी समोर येत आहे. देशात युपीआय व्यवहार सुरक्षित, वेगवान आणि विनाशुल्क ठेवण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी 2020 पासून ‘मर्चंट डिस्काउंट रेट’ (MDR) म्हणजेच व्यवहार शुल्क पूर्णपणे शून्य केले होते. मात्र, आता ऑनलाईन पेमेंट क्षेत्रातील कंपन्या आणि बँकांचे आर्थिक गणित सुधारण्यासाठी एनपीसीआय (NPCI) मोठ्या व्यावसायिकांच्या युपीआय व्यवहारांवर पुन्हा एकदा शुल्क (MDR) लागू करण्याच्या तयारीत आहे.

10 मिनिट्समध्ये घरी पोहचणार गॅस सिलेंडर! Instmart आणि HPCL ने एकत्रित सुरू केली नवी सर्व्हिस, कशी नोंदणी कराल?

या नव्या प्रस्तावानुसार, सर्वसामान्य ग्राहकांवर किंवा छोट्या दुकानदारांवर याचा कोणताही बोजा पडणार नाही. हे व्यवहार शुल्क केवळ अशा मोठ्या कंपन्या आणि व्यावसायिक संस्थांवर लागू केले जाईल, ज्यांची वार्षिक उलाढाल (Turnover) 1.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तसेच, हे शुल्क केवळ 2,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मोठ्या आर्थिक व्यवहारांवरच आकारले जाण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा कुटुंबियांना वैयक्तिक पैसे पाठवत असाल (P2P), किंवा छोट्या भाजी विक्रेत्यांना व किरकोळ व्यापाऱ्यांना पैसे देत असाल, तर तुम्हाला यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.

यूपीआय व्यवहारांवर पुन्हा मर्यादित स्वरूपात शुल्क सुरू झाल्याने ‘वन 97 कम्युनिकेशन्स’ (Paytm) आणि ‘मोबिक्विक’ (MobiKwik) यांसारख्या पेमेंट गेटवे पुरवणाऱ्या फिनटेक कंपन्यांसह राष्ट्रीय बँकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत. यामुळे येत्या काळात डिजिटल पेमेंट क्षेत्रात नेमके काय बदल होतात, याकडे आता तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे.

स्विगी-फिटपासची नवी भागीदारी; ‘ईटराईट स्ट्रीक चॅलेंज’मधून जिंकता येणार फिटपास 360 सबस्क्रिप्शन

Web Title: Phonepe paytm or google pay which app are indians using the most for upi payments check out the latest figures

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 09:12 PM

Topics:  

  • Business News
  • Digital Payment
  • phonepe
  • UPI payment

संबंधित बातम्या

‘Maharashtra Energy Expo’ मध्ये पुणेकरांचे लक्ष! जेनस इनोव्हेशनकडून ‘हाय-फ्लो हायब्रिड सोलर इन्व्हर्टर’ सादर
1

‘Maharashtra Energy Expo’ मध्ये पुणेकरांचे लक्ष! जेनस इनोव्हेशनकडून ‘हाय-फ्लो हायब्रिड सोलर इन्व्हर्टर’ सादर

प्लांट-बेस्ड फूडची वाढती क्रेझ; KLAW Snacks ने Freshpik मध्ये Signature Series केली लॉन्च,चवीसोबत आरोग्यावरही भर
2

प्लांट-बेस्ड फूडची वाढती क्रेझ; KLAW Snacks ने Freshpik मध्ये Signature Series केली लॉन्च,चवीसोबत आरोग्यावरही भर

Chicken Price Hike : आधी भाजीपाला, मग अंडी अन् नंतर चिकनचा नंबर? श्रावण महिना संपताच खवय्यांच्या खिशाला बसणार मोठा झटका!
3

Chicken Price Hike : आधी भाजीपाला, मग अंडी अन् नंतर चिकनचा नंबर? श्रावण महिना संपताच खवय्यांच्या खिशाला बसणार मोठा झटका!

Best FD Interest Rates : काय सांगताय? सरकारी बँकांपेक्षाही जास्त रिटर्न, ‘या’ बँका FD वर देताहेत 8.5% पर्यंत व्याज
4

Best FD Interest Rates : काय सांगताय? सरकारी बँकांपेक्षाही जास्त रिटर्न, ‘या’ बँका FD वर देताहेत 8.5% पर्यंत व्याज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.