Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी

Plastic Currency : RBI आणि केंद्र सरकार चलनातील नोटांचे आयुष्य वाढवण्यासाठी आणि बनावट नोटांना आळा घालण्यासाठी एक मोठा प्रयोग करत आहे. या योजनेअंतर्गत १० आणि २० रुपयांच्या १ अब्ज प्लास्टिक नोटांच्या ट्रायलला मंजुरी देण्यात आली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 11, 2026 | 06:39 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार
  • RBI चा मोठा निर्णय
  • 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी
Plastic Currency Notes In India : लवकरच प्लास्टिकचं चलन बाजारात येणार अशा बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून प्लास्टिकचं चलन भारताच्या करंन्सीमध्ये घेऊन येणार असल्याबाबत RBI मध्ये बैठका सुरु होत्या. काही काळापूर्वी अशी बातमी आली होती की पॉलिमर नोट्स लवकरच बाजारात येणार आहेत, त्यानंतर नोटाबंदी पुन्हा होणार की नाही अशी चर्चा सुरू झाली होती. पण, नंतर RBI ने त्यास मंजुरी दिली आणि नोटाबंदीसारखे काहीही होणार नाही असं स्पष्ट देखील सांगितलं. त्यानंतर आता RBI ने प्लास्टिक नोटांच्या चाचणीचा प्रस्ताव सरकारला दिला होता, त्याला आता सरकारने मंजुरी दिली आहे. प्रत्येकजण वाट बघत असलेल्या प्लास्टिकच्या नोटा लवकरच तुमच्या हातात असणार आहेत.

Ethanol Stove : महागड्या LPG सिलिंडरपासून होणार सुटका? एथेनॉलने स्वयंपाक करणं शक्य? सरकारची काय आहे योजना?

प्लास्टिकच्या नोटांची चाचणी होणार

खरं तर, अलीकडेच सरकारने 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा बाजारात आणण्यापूर्वी त्यांची चाचणी घेण्यासाठी मान्यता दिली आहे. या अंतर्गत दोन्ही नोटांच्या 100-100 कोटी पॉलिमर नोटा तयार केल्या जाणार आहेत. मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत याबाबत लेखी उत्तर दिलं आहे. ज्यात त्यांनी या सगळ्या संदर्भातील संपूर्ण माहिती दिली आहे.

अर्थमंत्री नेमकं काय म्हणाले?

सदरमध्ये दिलेल्या आपल्या लेखी उत्तरात अर्थमंत्र्यांनी स्पष्ट करत सांगितलं की, सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. RBI च्या म्हणण्यानुसार, या पॉलिमर नोटा आधीपासूनच चलनात असलेल्या कागदी नोटांसोबतच जारी केल्या जातील. त्यांनी असेही सांगितले की, RBI ने म्हटलं आहे की या पॉलिमर नोटा खरेदी करण्याची प्रक्रिया अजूनही प्राथमिक टप्प्यात आहे. त्यामुळे, पॉलिमर नोटा बाजारात कधी उपलब्ध होतील किंवा त्यांच्या उत्पादनासाठी किंवा खरेदीसाठी किती खर्च येईल, याचा अंदाज वर्तवणे सध्या शक्य नाही.

प्रथम मर्यादित प्रमाणात चाचणी

हे लक्षात घ्यावे की, काही दिवसांपूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आपल्या केंद्रीय मंडळाच्या शिफारशीनुसार हा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. या प्रस्तावात असे म्हटले होते की, या नोटांची प्रथम मर्यादित प्रमाणात चाचणी घेतली जाईल. जर ही चाचणी यशस्वी झाली, तर भविष्यात १० आणि २० रुपयांच्या पॉलिमर नोटा नियमितपणे जारी केल्या जाऊ शकतील.

आता, सरकारच्या मंजुरीमुळे, या नोटा लवकरच बाजारात उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे. तथापि, हे देखील स्पष्ट आहे की कागदी नोटा जशा आहेत तशाच चलनात सुरू राहतील; सध्या तरी त्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही, तसेच ते बंदही केले जाणार नाहीत.

ChatGPT Advice : ChatGPT च्या एका सजेशनने कमवून दिले तब्बल 1.2 लाख कोटी रुपये, नक्की काय घडलं? पाहा सविस्तर

Web Title: Plastic currency notes trial approved in india details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 06:39 PM

Topics:  

  • bank RBI
  • Business News
  • currency
  • Marathi News
  • Nirmala Sitaraman
  • RBI
  • RBI news
  • RBI Rule

संबंधित बातम्या

Tumbadchi Manjula: तुंबाडची मंजुळामधील गोंधळाला रंगत आणणारी ५ पात्रे
1

Tumbadchi Manjula: तुंबाडची मंजुळामधील गोंधळाला रंगत आणणारी ५ पात्रे

Hybrid Home Loan : होम लोनचा हप्ता वाढण्याची भीती? हायब्रिड होम लोनचा पर्याय ठरेल फायदेशीर; वाचतील लाखो रुपये
2

Hybrid Home Loan : होम लोनचा हप्ता वाढण्याची भीती? हायब्रिड होम लोनचा पर्याय ठरेल फायदेशीर; वाचतील लाखो रुपये

Ethanol Stove : महागड्या LPG सिलिंडरपासून होणार सुटका? एथेनॉलने स्वयंपाक करणं शक्य? सरकारची काय आहे योजना?
3

Ethanol Stove : महागड्या LPG सिलिंडरपासून होणार सुटका? एथेनॉलने स्वयंपाक करणं शक्य? सरकारची काय आहे योजना?

ChatGPT Advice : ChatGPT च्या एका सजेशनने कमवून दिले तब्बल 1.2 लाख कोटी रुपये, नक्की काय घडलं? पाहा सविस्तर
4

ChatGPT Advice : ChatGPT च्या एका सजेशनने कमवून दिले तब्बल 1.2 लाख कोटी रुपये, नक्की काय घडलं? पाहा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.