Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! पेनटाकळी धरणाचे पाणी शेतीसाठी सोडण्याचे आदेश; पालकमंत्री मकरंद पाटलांचा निर्णय

Makarand jadhav Patil decision Pentakli Dam Water Supply: पेनटाकळी धरणातील शिल्लक पाणी खरीप पिकांच्या सिंचनासाठी सोडण्याचे निर्देश पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे पाण्याअभावी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 09, 2026 | 10:03 PM
Pentakli Dam Water Supply

Pentakli Dam Water Supply

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार
  • पेनटाकळी धरणातून पाणी सोडण्याची तयारी
  • पालकमंत्री मकरंद पाटलांचे प्रशासनाला निर्देश
बुलढाणा : पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील पीक वाचवायचं कसं, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला होता. पाण्याअभावी खरीप पिकं सुकण्याच्या मार्गावर असताना आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. पेनटाकळी धरणातील उपलब्ध शिल्लक पाणीसाठा सिंचनासाठी तातडीने सोडण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिले आहेत.

Buldhana News: वीजजोडणीसाठी ग्रामस्थांचा पंचायत समितीत ठिय्या; ८ दिवसांत होणार पाणीपुरवठा, लेखी आश्वासनाने आंदोलन मागे

पेनटाकळी धरणातून खरीप पिकांसाठी पाणी सोडणार

पावसाच्या अनियमिततेचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसला आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने उगवलेलं पीक पाण्याअभावी धोक्यात आले होते. त्यामुळे पेनटाकळी धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात यावं, अशी मागणी शेतकरी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून सातत्याने केली जात होती. अखेर या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून धरणातील उपलब्ध पाणीसाठा पिकांसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासंदर्भात पालकमंत्री मकरंद पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे तसेच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. पाणीवापर समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्यात येत आहे. यासाठी आवश्यक असलेली महावितरणची वीजजोडणी प्रक्रिया पूर्ण करून पाण्याअभावी सुकत असलेल्या खरीप पिकांना वेळेत पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

दोन्ही भागांतील शेतकऱ्यांना समान न्याय देण्याच्या सूचना

पेनटाकळी धरणाच्या वरील बाजूला आणि धरणाखालील भागातही अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. धरणाच्या वरील बाजूस तसेच धरणाखालील भागातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या गरजांचा समतोल विचार करून पाणीवाटपाचे नियोजन करावे. पाणीवाटप करताना कोणत्याही भागातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या खरीप पिकांचे संरक्षण करणे आणि गरजेच्या वेळी सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे याला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे. पाणी सोडण्याच्या प्रक्रियेत कोणताही विलंब होणार नाही, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असेही पालकमंत्री मकरंद पाटील यांनी स्पष्ट केले.या निर्णयामुळे पाण्याअभावी संकटात सापडलेल्या पेनटाकळी धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

Washim News: २४७ गावांना पाणीटंचाईचा धोका; दुष्काळमुक्तीसाठी ‘सीएसआर’चे बळ, जलसंधारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे कंपन्यांना आवाहन

💡

Frequently Asked Questions

  • Que: पेनटाकळी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय कोणी घेतला?

    Ans: बुलढाण्याचे पालकमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत.

  • Que: पाणी सोडण्याची प्रक्रिया कधी सुरू होणार?

    Ans: पाणीवापर समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार सिंचनासाठी पाणी सोडण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्यात येत आहे.

  • Que: पेनटाकळी धरणाच्या कोणत्या भागातील शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळणार आहे?

    Ans: धरणाच्या वरील बाजूला आणि धरणाखालील भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या सिंचनाच्या गरजेनुसार पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

Web Title: Buldhana pen takli dam water release makarand patil farmers relief pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 10:03 PM

Topics:  

  • Benefit to farmers
  • buldhana news
  • kharif crops
  • Makrand Patil

संबंधित बातम्या

Buldhana News: वीजजोडणीसाठी ग्रामस्थांचा पंचायत समितीत ठिय्या; ८ दिवसांत होणार पाणीपुरवठा, लेखी आश्वासनाने आंदोलन मागे
1

Buldhana News: वीजजोडणीसाठी ग्रामस्थांचा पंचायत समितीत ठिय्या; ८ दिवसांत होणार पाणीपुरवठा, लेखी आश्वासनाने आंदोलन मागे

Wardha News: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा! १.५१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा
2

Wardha News: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा! १.५१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा

दुष्काळाच्या सावटातही बाजारपेठेत उत्साह; वाशिम-बुलढाण्यात दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी, व्यापाऱ्यांना दिलासा
3

दुष्काळाच्या सावटातही बाजारपेठेत उत्साह; वाशिम-बुलढाण्यात दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी, व्यापाऱ्यांना दिलासा

Buldhana News: दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा द्या; पालकमंत्री मकरंद जाधव पाटलांचे प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश
4

Buldhana News: दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा द्या; पालकमंत्री मकरंद जाधव पाटलांचे प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.