Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा! १.५१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा

Wardha Farmer Drought Relief Compensation News: दुष्काळग्रस्त वर्धा जिल्ह्यातील १ लाख ५१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपये जमा करण्यात आले असून, आतापर्यंत ७५ कोटी ५० लाख रुपयांची मदत वितरित झाली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 08, 2026 | 05:25 PM
Wardha Farmer Drought Relief Compensation

Wardha Farmer Drought Relief Compensation

Follow Us
Follow Us:
  • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची मदत
  • शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात
  • वर्ध्यात १.५१ लाख खात्यांत ५ हजार रुपये जमा
वर्धा: कमी पर्जन्यमान आणि भूगर्भातील कमी जलसाठ्यामुळे यावर्षी दुष्काळस्थिती निर्माण झाली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत दुष्काळ घोषित करण्यात आला. कमी पर्जन्यमानाचा खरीप पिकांवर देखील परिणाम झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिवाळीपूर्वी शासनाने प्रत्येकी ५ हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार आतापर्यंत १ लाख ५१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे.

Karjat Saidongar Deforestation : ‘पर्यावरण मंत्र्यांना खात्याचं ज्ञान आहे का?’ कर्जतमधील वृक्षतोड पाहून सयाजी शिंदे संतापले!

अल-निनोच्या प्रभावामुळे यावर्षी पर्जन्यमान कमी झाले. त्याचा परिणाम कापूस, सोयाबीन, तूरसह अन्य पिकांवर झाला. बहुतांश भागात शेतकऱ्यांना उत्पन्नात घट आली. पुढे रब्बी आणि उन्हाळी पिकांवर देखील विपरीत परिणाम होणार आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने दुष्काळी परिस्थिती जाहीर करून उपाययोजना सुरू केल्या. त्यात विविध दिलासादायक बाबींचा समावेश आहे.

दुष्काळीस्थितीमुळे हवालदिल शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी शासनाने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपये जमा करण्याची घोषणा केली होती. जिल्ह्यात सोमवारपासून शेतकऱ्यांच्या आधारलिंक खात्यात रक्कम जमा केली जात आहे. तालुका व जिल्हास्तरावर आतापर्यंत १ लाख ८८ हजार १९७ शेतकऱ्यांची खाती स्वीकृत करण्यात आली आहे. त्यापैकी १ लाख ५१ हजार खात्यांमध्ये प्रत्येकी ५ हजार याप्रमाणे ७५ कोटी ५० लाख रुपये जमा करण्यात आले आहे.

दुष्काळी मदतीची रक्कम थेट आधारलिंक बँक खात्यांमध्ये जमा केली जात असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत आहे. मात्र, अद्याप मंजूर झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यांत पैसे जमा झालेले नाहीत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही लवकरात लवकर मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पाऊस कमी पडल्यामुळे खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी ही मदत महत्त्वाची ठरणार आहे.

खात्यात वळत्या रक्कमेची तालुकानिहाय स्थिती

  • आर्वी- १७,१९७ – शेतकरी, ८ कोटी ५९ लाख
  • आष्टी ११,५२५ – शेतकरी, ५ कोटी ७६ लाख
  • देवळी १९,५८२ – शेतकरी,९ कोटी ७९ लाख
  • हिंगणघाट २८,०९१ – शेतकरी, १४ कोटी ०४ लाख
  • समुद्रपूर २६,२०२ – शेतकरी, १३ कोटी १० लाख
  • सेलू १७,८९६ – शेतकरी, ८ कोटी ९४ लाख
  • वर्धा १५,१०७ – शेतकरी, ७ कोटी ५५ लाख
Satara News: ‘शेतकऱ्यांच्या नरड्यावर पाय देऊ नका, साखर सम्राटांची मस्ती उतरवू’; ऊसदरावरून राजू शेळके आक्रमक, तीव्र आंदोलनाचा इशारा
💡

Frequently Asked Questions

  • Que: वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती आर्थिक मदत मिळत आहे?

    Ans: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे.

  • Que: वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत किती शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले?

    Ans: आतापर्यंत १ लाख ५१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झाली आहे.

  • Que: वर्ध्यात शेतकऱ्यांना आतापर्यंत किती कोटींची मदत मिळाली?

    Ans: आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ७५ कोटी ५० लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

Web Title: Wardha farmer drought relief 5000 rupees 1 51 lakh farmers 2026 pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • Benefit to farmers
  • drought news
  • Farmer Crisis
  • wardha News

संबंधित बातम्या

दुष्काळाच्या सावटातही बाजारपेठेत उत्साह; वाशिम-बुलढाण्यात दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी, व्यापाऱ्यांना दिलासा
1

दुष्काळाच्या सावटातही बाजारपेठेत उत्साह; वाशिम-बुलढाण्यात दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी, व्यापाऱ्यांना दिलासा

Buldhana News: दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा द्या; पालकमंत्री मकरंद जाधव पाटलांचे प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश
2

Buldhana News: दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा द्या; पालकमंत्री मकरंद जाधव पाटलांचे प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश

दुष्काळग्रस्तांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता थेट तालुक्यात, गरजू रुग्णांना मिळणार मोठा दिलासा
3

दुष्काळग्रस्तांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता थेट तालुक्यात, गरजू रुग्णांना मिळणार मोठा दिलासा

Farmer News : शेतकऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! सरकारकडून 2 मोठे निर्णय; तब्बल 2 लाख 60 हजार शेतकऱ्यांना होणार फायदा
4

Farmer News : शेतकऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! सरकारकडून 2 मोठे निर्णय; तब्बल 2 लाख 60 हजार शेतकऱ्यांना होणार फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.